1. कृषीपीडिया

आधी समजून घ्या रासायनिक खत आहे तरी नेमकं काय?

आज आपण सगळे रासायनिक खत वापरतो. कधी विचार केलाय, पेट्रोल सारख्या गोष्टींपासून तयार केलेले

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
आधी समजून घ्या रासायनिक खत आहे तरी नेमकं काय?

आधी समजून घ्या रासायनिक खत आहे तरी नेमकं काय?

आज आपण सगळे रासायनिक खत वापरतो. कधी विचार केलाय, पेट्रोल सारख्या गोष्टींपासून तयार केलेले खत जिवंत असलेले पीक कसे खाऊ शकते? हे रासायनिक खत पिकला खायला घालायला जमिनीतील जीवाणू प्रक्रिया करतात व ते पिकला खाण्यायोग्य करून देतात. 

जरा आठवा २०-३० वर्षा पूर्वी एक पोत रासायनिक खत टाकून मिळणारा रिझल्ट आज मिळवायला आपल्याला कमीत कमी २-३ पोती टाकायला लागतात.. आता विचार करा असे का झाले? याचे कारण असे,पूर्वी आपल्या जमिनीत जीवाणूंची संख्या भरपूर होती त्याचे कारण म्हणजे आपण वापरात असलेले सेंद्रिय पदार्थ. आठवा पूर्वी आपल्या घरी भरपूर गाई म्हशी असायच्या त्यांचे शेण काढून साठवले जायचे

घरातील चुलीतील राख शेतात टाकली जायची, घरातला प्राणी मेला तर त्याला शेतात पुरायचे. या सगळ्यामुळे जमीनित जीवाणूंची संख्या भरपूर असायची. यालाच आपण म्हणायचो की जमीन जिवंत आहे. 

आता आपण सेंद्रिय खतांचे प्रमाण कमी कमी करत गेलो काही जणांनी तर सेंद्रिय पूर्ण बंद केलं. या मुळे जमिनीतील जीवाणूंची संख्या कमी होत गेली व रासायनिक खताला मिळणारा रिझल्ट कमी कमी होत गेला.

आपल्या खातात जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. हे जीवाणू जमिनीत दिलेल्या रासायनिक खातला एकत्र करून पिकला खायला घालतात. या मुळे न वापरले जाणारे रासायनिक खत वापरले जाते. 

तुम्हाला माहितीये की समजा युरिया ची गोणी बघितली तर त्या वर ४६:००:०० लिहिले असते. याचा अर्थ या गोणी मध्ये ४६% नत्र आहे, स्फुरद व पालाश ०% आहे. म्हणजे ५० किलोच्या गोणी मध्ये २३ किलो नत्र असते. हा युरिया टाकल्यानंतर त्यातला जवळपास १२-१४ किलो युरिया पटकन वापरला जातो व उरलेला युरिया जमिनीत पुरेशे जीवाणू नसल्या कारणाने वाया जातो व पिकला वापरता येत नाही. पहिल्या ७ दिवसात पीक जोमाने वाढते व नंतर वाढ खुंटली की काय अशी शंका येते. या मुळे आपण महागडी मायक्रोन्युट्रीयन्ट्स वापरतो. खरी गोष्ट अशी असते कि टाकलेले खत संपूर्णपणे वापरले न गेल्याने आपल्याला वाटते की पिकाची वाढ खुंटलीये. आपल खत वापरल्यास रासायनिक खत पिकला योग्य प्रमाणात व भरपूर काळ खायला घातले जाते.

आपल्या खातात स्वतःचे नत्र स्फुरद व पालाश असल्यामुळे पिकला नेहमी पेक्षा जास्त प्रमाणात खायला मिळते, या मुळे वाढ व उत्पादनात लक्षणीय वाढ होते.

जमिनीमध्ये जिवाणू चा काऊंट वाढवण्यासाठी सेद्रीय,जैविक,ऑरगॅनिक शिवाय पर्याय नाही

रासायनिक खताचे प्रकार : १. नत्रयुक्त खते : युरिया, अमोनियम सल्फेट २. स्फुरदयुक्त खते : सुपर फॉस्फेट, डायकॅल्शियम फॉस्फेट ३. पालाशयुक्त खते : म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पोटॅश ४. दुय्यम खते : चुना, गंधक, मॅग्नेशियम ५. सूक्ष्म अन्नद्रव्ये : जस्त सल्फेट, मोरचूद, हिराकस, मँगनीज सल्फेट, बोरॅक्स, अमोनियम मॉलिब्डेट रासायनिक खतांची निवड करतांना खालील बाबींचा आवश्य विचार करावा. १. दीर्घकालीन पिकांसाठी संयुक्त खतांचा वापर करावा (नायट्रो फॉस्फेट १५:१५:१५) (अमोनियम फॉस्फेट २८:२८:०) २. स्फुरदाची उपलब्धता सुकर होण्यासाठी पूर्णपणे विद्राव्यशील खतांची निवड करावी. उदा. सिंगल सुपर फॉस्फेट, डाय अमोनियम फॉस्फेट ३. डाळवर्गीय व तेलबियांसाठी गंधकयुक्त खतांचा समावेश करवा. उदा. अमोनियम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, अमोनियम फॉस्फेट, सल्फेट ४. स्फुरदाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्फुरद विद्राव्य करणारे जिवाणू (पि.एस.बी.) खतांचा वापर करावा. 

English Summary: Before know about what is chemical fertilizers Published on: 14 March 2022, 02:02 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters