1. कृषीपीडिया

बियाणे खरेदी करण्यापूर्वी सर्वसाधारणपणे ही काळजी घ्यावी, ना तोटा फक्त नफा

जून महिना जवळ येत आहे. जवळपास सर्वच शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
बियाणे खरेदी करण्यापूर्वी सर्वसाधारणपणे ही काळजी  घ्यावी, ना तोटा फक्त नफा

बियाणे खरेदी करण्यापूर्वी सर्वसाधारणपणे ही काळजी घ्यावी, ना तोटा फक्त नफा

शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ही आपल्या संताने आपल्या सर्वांना दिलेली अत्यंत मौल्यवान शिकवण आहे. या शिकवणीचे स्मरण ठेवून आपण बियाणे खरेदी करताना वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून आणि काळजी घेऊन बियाण्यांची खरेदी करणे गरजेचे आहे. शेतकरी बंधूंनो तुम्ही जे केले तेच मी करावे या अट्टाहासापोटी दुसऱ्याची नक्कल करून बियाणे खरेदी करणे टाळावे. आगामी खरीप हंगामात आणि नेहमी फळ,फुल भाजीपाला व सर्वसाधारण पिकाची बियाणे तसेच पिकांची रोपे व कलमा , बेन इत्यादी खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या व कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात काही टिप्स आपल्या समोर मांडत आहे.(१) सर्वात महत्वाचे म्हणजे बियाणे खरेदी करताना कुणी कितीही चांगलं वान सांगितलं तर कुणाच्या सांगण्यावर न जाता आपल्या स्वतःच्या शेतात संबंधित पिकात आपल्या गरजा व समस्या काय आहेत व आपण खरेदी करत असलेल्या वानात आपल्या गरजा पूर्ण करणारी किंवा समस्या निराकरण करणारी वैशिष्ट्ये आहेत का व संबंधित वाणाच्या बियाण्याची आपल्या भागाकरिता शिफारस आहे का या सर्व बाबीचा विचार करू विचार करून बियाण्याची खरेदी करणे गरजेचे असते. 

नवीन वाणाच्या संदर्भात सोयाबीन सारख्या महत्त्वाच्या स्वयम् परागीकरण होत असलेल्या पिकात पहिल्याच वर्षी मोठ्या प्रमाणात नवीन वाणाचे बियाणे फार मोठ्या प्रमाणात खरेदी करून सोयाबीन पिकाचा उत्पादन खर्च न वाढवणे केव्हाही चांगली याउलट पहिल्या वर्षी सोयाबीन सारख्या पिकात शिफारशीप्रमाणे व आपल्या गरजेनुसार संबंधित वाणाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन तसेच संबंधित वाणाच्या शिफारशी लक्षात घेऊन नवीन सोयाबीनच्या सरळ वानाचे बियाणे तुलनात्मक दृष्ट्या कमी प्रमाणात विरजण म्हणून खरेदी करा व आपल्या स्वतःच्या शेतातल्या अनुभवावर व गरजेनुसार घरचे बी तयार करून तयार करून नंतरच त्या वानाचा आपले स्वतःचे पीक परिसंस्थेतील चांगला अनुभवाच्या आधारावर पुढच्या वर्षी त्या बियाण्यांचा पेरा वाढवू शकता. शेतकरी बंधूंनो जसे मी सोयाबीनचे उदाहरण दिलं तसेच बऱ्याच वेळा तुरीचे बियाणे बाबतीत अमुक एक तुरीचे बियाणे घ्या व एकरी पंधरा ते वीस पोती उत्पादन घ्या असे आपण ऐकत असतो बंधुंनो तुरी सारख्या पिकात टोकण

,ठिबकचा वापर, शेंडा खुडणी एकात्मिक अन्नद्रव्य व किड रोग व्यवस्थापन या बाबीमुळे उत्पादन वाढते त्यात वान फक्त एक महत्त्वाचा घटक असतो म्हणून सल्ला असा राहील बियाणे किंवा वान खरेदी करताना जे बियाणे किंवा वान आपल्या भागासाठी कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले आहे अशा वानाच्या बियाण्याची खरेदी करण्यासाठी प्राधान्य द्या व यासाठी वेळोवेळी गरजेनुसार तज्ञांचा व चांगल्या अनुभवी प्रयोगशील शेतकरी शेतकऱ्यांचा सल्ला घ्या.(२) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भागात महत्त्वाच्या पिकावर कोणते कीड-रोग येतात व त्यासाठी नवीन अद्यावत शिफारस केलेल्या कीड व रोग प्रतिकारक वानांना बियाणे म्हणून खरेदी करताना प्राधान्य द्या यासाठी गरजेनुसार संबंधित विषयाचे तज्ञांचा सल्ला घ्यावा.(३) शेतकरी बंधूंनो आपण बऱ्याच वेळा मोहाला बळी पडून अशिफारशीत व कीड रोगाला बळी पडणाऱ्या वाणाचे बियाणे व रोपे खरेदी करतो व त्यामुळे ज्या कीडी व रोग आपल्या भागात नाहीत त्याचा आपल्या भागात प्रसार होऊ शकतो त्यामुळे अशी बाब टाळणे केव्हाही हितावह असते. (४) शेतकरी बंधूंनो कोणतेही प्रमाणित बियाणे बियाणे खरेदी करताना विक्रेत्याकडून पक्की पावती घ्या त्यावर बियाण्याचा प्रकार, लॉट क्रमांक, पॅकिंग किती वजनाचा आहे, पॅकिंग ची तारीख, वापरण्याची अंतिम तारीख इत्यादी गोष्टी नमूद केल्या आहेत का ते पहा व हे पाहूनच बियाणे खरेदी करणे गरजेचे आहे.

(६) शेतकरी बंधूंनो खरेदी केलेल्या बियाण्याची पावती , बियाण्याचे रिकामे पॅकिंग ह्या गोष्टी व्यवस्थित जपून ठेवा.(६) शेतकरी बंधूंनो बाजारात सीलबंद बियाण्याच्या पिशवीवर प्रमाणित बियाण्याच्या पिशवीला दोन टॅग असतात अशा निळ्या रंगाचा डबल लेबल पाहूनच प्रमाणित बियाणे खरेदी करावे (७) शेतकरी बंधुंनो प्रमाणित बियाण्याची पिशवी तिन्ही बाजूने आतून व्यवस्थित शिवलेली आहे का ते पहा व बियाण्याची पिशवी शिलाई च्या बाजूने न फोडता त्याच्या विरुद्ध बाजूने फोडावी.(८) शेतकरी बंधूंनो आपण भाजीपाला पिकात अनेक बियाणे उत्पादक कंपन्याचे संकरित वाण वापरत असतो हे वान खरेदी करण्यापूर्वी संबंधित बियाणे उत्पादनाची माहिती असलेली तांत्रिक पुस्तिका असेल तर ती मिळवावी व संबंधित वाणाची वैशिष्ट्ये तसेच संबंधित बाबतीत संबंधित बियाणे उत्पादक कंपनीने दिलेल्या सूचना याचे वाचन करून वापर करावा.(८) शेतकरी बंधूंनो आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवत चालवत असलेल्या अनेक शेतकरी बीज उत्पादक कंपन्या बियाणे विक्रीसाठी समोर आल्या आहेत. या सर्व शेतकऱ्याच्या बीज उत्पादक कंपनीची माहिती कृषि विभाग यांच्याकडून घेऊन नामांकित आणि शेतकरी हितात काम करणाऱ्या शेतकरी बिजोत्पादन कंपन्यांना बियाणे खरेदीसाठी प्राधान्य द्यावे.शेतकरी बंधूंनो आगामी खरीप हंगामात बियाणी खरेदीपूर्वी या सर्व सूचनांचा गरजेनुसार वापर करावा.

 

राजेश डवरे तांत्रिक समन्वयक कृषि महाविद्यालय रिसोड (करडा) तथा कीटकशास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र करडा वाशिम.

English Summary: Before buying seeds in general this should be taken care of, no loss only profit Published on: 08 May 2022, 07:11 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters