1. कृषीपीडिया

Basil cultivation! कमी खर्चात करा या औषधी वनस्पतीची लागवड आणि मिळवा लाखात उत्पन्न

तुळशी सर्वात पवित्र वनस्पती असून पूजाअर्चा साठी तुळशीच्या पानांचा उपयोग होतो. धार्मिक कामात सोबतच तुळशीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. म्हणून औषधी वनस्पती म्हणून तुळशीची एक वेगळी जागा आहे. तसेच प्राणवायू देण्यासाठी ही तुळशी महत्त्वाची भूमिका निभावते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
basil crop

basil crop

तुळशी सर्वात पवित्र वनस्पती असून पूजाअर्चा साठी तुळशीच्या पानांचा उपयोग होतो. धार्मिक कामात सोबतच तुळशीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. म्हणून औषधी वनस्पती  म्हणून तुळशीची एक वेगळी जागा आहे. तसेच प्राणवायू देण्यासाठी ही तुळशी महत्त्वाची भूमिका निभावते.

सर्वाधिक ऑक्सिजन सोडणाऱ्या वनस्पतींपैकी तुळशी एक आहे.सौंदर्य प्रसाधने आणि औषध बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये तुळशीचे मोठी मागणी असते. एका बिघ्यातपंधरा हजार रुपये खर्च करून तुम्ही लाख रुपये कमवू शकता.या लेखात आपण तुळशीची लागवड व व्यवस्थापनयाबद्दल माहिती घेऊ.

तुळशी लागवड कशी करावी?

जुलै महिना हा तुळशीच्या लागवडीसाठी योग्य काळ असतो. तुळशीची रोपे साधारणतः 45× 45 सेंटिमीटर अंतराने लावली पाहिजेत. तर RRLOC 12 आणिRRLOC 14 वानाच्या रोपांना 50 बाय 50 सेंटिमीटर अंतरावर लावले पाहिजे.रोपे लावल्यानंतर त्यांना थोडे पाणी द्यावे.एका आठवड्यात कमीत कमी एकदा तरी पाणी द्यावे.जेव्हा या पिकाची कापणी करायचे असेल तर साधारणतः दहा दिवसांपूर्वीच पाणी देणे बंद करावे.

कापणी कधी होते?

जेव्हा तुळशीची पाने मोठी होतात तेव्हा त्याची कापणी होत असते. याची योग्य वेळी कापणी करणे आवश्यक असतं.जर  कापणी योग्य वेळी झाली नाही तर त्याला फुले येऊ लागतात.फुले आल्यानंतर त्यातील तेलाचे प्रमाण कमी होत जाते.त्यामुळे फुले येण्याआधीच याची पाने तोडली पाहिजे.

तुळशीच्या शेतीला खर्च किती येतो?

 जर तुम्ही एका बिघ्यात तुळशीची शेती करणार असाल तर एक किलो तुळशीच्या बियांची गरज भासते. बाजारात याची किंमत पंधरा हजार रुपये आहे. यासह आपल्याला तीन ते पाच हजार रुपयांचा खतलागेल.

एका हंगामात दोन क्विंटल पर्यंत या पिकाचे उत्पन्न होत असते.बाजारात याला साधारणता तीस ते चाळीस हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतो.

 विक्री कशी करावी?

बाजारात आडत्यांच्या मदतीने आपण त्यांची विक्री करू शकता.तसेच थेट तुळशीच्या खरेदी करणाऱ्यांना भेटू शकता किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायलासांगणाऱ्या औषध कंपन्या किंवा एजन्सीला तुम्ही आपलामालविकू शकतात.

English Summary: basil cultivation is important for farmer basil crop cultivation technique Published on: 27 October 2021, 03:44 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters