बांबू हा एक गवताचा प्रकार असून सर्वात जलद गतीने वाढतो.महाराष्ट्रात बांबूच्या 121 जाती असून त्यापैकी कळक, काटेरी,मानगा, चिवा, चिवारी, मोठा बांबू ,पिवळा बांबू इ कोकणात आढळून येतात.बांबू पिक लागवड मध्ये पर्यावरण,आर्थिक उन्नती,व रोजगाराच्या भरपूर संधी तयार होत आहेत.ठिंबक सिंचन ओलित वर बांबूची लागवड करून 70 मे टन उत्पादन मिळत.विदर्भात प्रामुख्याने कंटग,माणवेल,व पिवळा बांबू ची लागवड आढळून येते.पूर्वीं बांबू वन वृक्ष कायद्यामध्ये अंतर्भूत होते परंतु
अलीकडे बांबू चा समावेश गवत वर्ग पीक लागवडीत केल्याने च बांबू लागवड आता शेतात किंवा बांधावर करता येईल व तोडनि ला सुद्धा टी. पी लागणार नाही, त्यासंबंधी सरकारी बंधने काढली आहेत या संबंधी रिझोल्युशन बी बी एस 2017/सी .न.501/एफ 9 दि.11.4.2017.हा आहे.
हे ही वाचा - कृषी दुतांनी केले मार्गदर्शन, फवारणीच्या वेळी घ्यावयाची काळजी
आधुनिक पद्धतीने ऊती संवर्धित तंत्र पासून तयार केलेली बांबूची रोपांची लागवड ठिंबक संचावर केल्यास ,वाढ फार झपाट्याने होत असते आणि 3 ते 4 वर्ष्यात कापणीला येतो.प्रति वर्षी 5500 ते 12000 बांबू प्रति वर्षी प्रति हे. क्षेत्रातून उत्पादन सलग 35 वर्ष पर्यंत मिळत राहते.Production from the area continues for 35 consecutive years.
बांबू लागवड का?व फायदे:-१)सर्व प्रकारच्या जमिनीत लागवड करता येते.2)आंतर पीक जसे की अद्रक,हळद,भाजीपाला यांची पिके लागवड करता येते.३)जमिनीची धूप व पर्यावरण समतोल राखण्यास मदत होते.४)बांबू पासून घर,छप्पर,चटई, टेबल,पंखा हातमाग वस्तू,प्लाई, दागिने ,टाईल्स,वाद्य यंत्र ,अगरबत्ती कपडे,एक्स्पोर्ट दर्जाचे कपडे , इ बनविण्यात उपयोग होतो.५)बांबू पासून इथेनॉल बनविता येत .आता पेट्रोलियम मंत्रालय ,भारत सरकार यांनी 20% इथेनॉल पेट्रोल मध्ये मिश्रण करण्यास परवानगी दिलेली आहेत.
६) बांबु पासून आता इंधन गॅस तयार करता येतो.लागवड:- बांबूचिं लागवड जून जुलै मध्ये न करता सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधी मध्ये करावी.जून, ऑगष्ट (भरपूर पाऊस) जानेवारी(थंडी) मार्च, एप्रिल(उष्ण)या महिन्यात लागवड करू नये.जाती:- वेगाने वाढणाऱ्या व अधिक उत्पादन देणाऱ्या आणि काटे नसणाऱ्या जाती.टिश्यू कल्चर :- या तंत्र ज्ञानापासून तयार केलेले बांबू एकसमान वयाची ,उंचीची असतात ,मुळाला जोमदार फुटवा असल्याने शेतात लवकर सेटल होतात व एकसमान वेळी कापणीला येतात.
अ)बायोमास व पेपर इंडस्ट्री साठी:- १)बांबू बालकोवा 2)बांबू स्ट्रिक्टस.ब)अगरबत्ती साठी:-बांबू टूलडा,नुटन्स.क)घर बांधणी स्ट्रक्चर :-नुटन्स,कटांग.ड)फर्निचर आर्ट व क्राफ्ट:-स्टोक्सील ,गिगनटिअस.वरील १व २या जाती बायोमास चे उत्पादन 42 ते 45 मे टन /हे.मिळत.खड्डा आकार:-१)उथळ जमीन- 2*2*2 फूट. २)मध्यम जमीन-1.5 1.5 1.5 फूट.अंतर:- १)सलग लागवड:-4 मी*2.5मी.२)कृषी आणि वन पद्धत लागवड:-6मी*2मी.३)बांधावर लागवड :-2मी*2मी.लागवड करताना 2 घमेले शेणखत,100 ग्रॅम सि .सु
.फॉ व बुरशी नाशक आणि फॉरेट खड्डे मध्ये टाकावे.सिंचन:- भरपूर ,निरोगी व उत्तम व झपाट्याने वाढीसाठी बांबू पिकास ठिंबक संच बसविणे फार आवश्यक आहेत.पहिल्या 2 वर्ष पर्यंत 8 लिटर /झाड हिवाळ्यात महिन्यातून 2 वेळ आणि उन्हाळ्यात 3 वेळ ठिंबक संच ने पाणी द्यावे.लागवड केल्यानंतर बांबू झाडाची विरळणी,कीड व रोग व्यवस्थापण,आंतर पीक लागवड,बांबू तोड पद्धती,ग्रेडिंग व बाजारपेठ इ. विषयी संपूर्ण मार्गदर्शन बळीराजा इरिगेशन व सर्विसेस आणि ऍग्रो सोल्युशन,काटोल मो न. 9975115254 कडून करण्यात येईल.
श्री.गुणवन्त एस. डफरे(मुख्य कृषी तज्ञ). एम.एस्सी(कृषी),एमबीए,पुणे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शेती मधील ,उच्च कृषीतंत्राचा ,सुमारे 21 वर्षीचा प्रत्यक्ष अनुभव.
9765403911
Share your comments