आपन शेतीच वाटोळं करून ठेवलं आहे आता तरी बंद करा या शेत माउलीला विषारी करायचं! आपल्या पीक उत्पादनांवर या जहराचा खुप परीनाम होत आहे याला एकप्रकारे अत्याचार म्हणावे लागेल.ज्या मातीमायने आपल्याला हजारो वर्षांपासून वंशजांच व पिढ्याचं पालन पोषन केले तीच अस्तित्व धोक्यात आणले.मृताअवस्था व नापिक करून टाकलं!ना समज लोकांचं मार्गदर्शकांने तिचे शोषन करून तिला कुपोषित व विषारी करून टाकले तिला पण वेळ दवडू नका तिला जिवाणू ची संजीवनी द्या ती पुन्हा मरनाच्या दारातून बाहेर येईल व कुपोषित मधुन काढुन तिला पोषक तत्व बहाल करा. आधी तिच्या पोषनाची झीज भरून काढायची तयारी ठेवा!बंद करा आता त्या माय मातीची विषाने ओटी
भरने,आता तिची ओटी कर्बाने ने भरा.तिचे मन या विषाक्त रसायनांनी धगधगते आहे,तीला प्रथम शांत करन्याचा मार्ग शोधा ते बिमार तर आपन बिमार रहानारच शेतकरी बांधवनो ति पुण्यभूमी आपल्या लेकराला असे तडफडताना पाहू शकनार नाही.आपलं काम आहे पहिले तिला शुद्धीकरण करण्याचं, एकदा का ती मायमाती सुपिक झाली की धर्तिपुत्रांचे ऐश्वर्य पुन्हा मिळवून देईन अरे मित्रांनोआता सगळीकडे फक्त केमिकलचे राज्य दिसतेय .आता जिकडे तिकडे जाहिरात दिसतात,दिखाऊ प्रचार,व भपका यांच्या मागे पळनारे मला आश्चर्य वाटते ,विकृत मानसिकतेचे अपयश मिळाले की दुसर्यांमुळे आले व यश आले की माझ्यामुळे मिळालं, हे शुद्ध अज्ञानपणा आहे एकीकडे अभ्यासपुर्वक शेती करनारा मोठा वर्ग तयार होतोय जो शेतीत मोठे यश मिळवतोय , लोक
नोकर्या सोडून नियोजनपुर्वक शेती करून यशस्वी शेती करतात.कोटींच्या उलाढाली करत आहेत व त्याच भागात एक वर्ग असा आहे जो सतत उधारी , रसायने यांनी गांजून गेला आहे.परिस्थीती प्रत्येकावर येते परंतू बिनडोक नियोजन , इतरांचा प्रभावाखाली निर्णय फक्त रिझल्ट मिळतो म्हनून प्रोडक्ट वापरने , तात्पुरता रिझल्ट मिळतोय म्हनून भुरट्या जादूंना भुलने , पिकनारे पिक फक्त बाजारापर्यंत कसे पोहोचेल एवढीच माफक अपेक्षा ठेवने मग तो माल एकदा व्यापार्याच्या गळ्यात मारला की खुश मग त्याचे पुढच्याचे काय हाल होतील याचा विचारही न करने ह्या गोष्टी अपयशाला कारनीभूत असतात. मित्रहो एक लक्षात घ्या जर त्या मालामध्ये टिकवन क्षमता नसेल तो प्रवासात खराब होत असेल व
Share your comments