मका आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मक्याची लागवड बहुतेक शेतकरी करतात. महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जातेव त्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला नफा देखील मिळतो.
या वर्षी जर मका पिकाचा विचार केला तर हमी भावापेक्षाही जास्तीचा भाव मक्याला मिळत आहे. मक्याचा वापर हा जास्तीत जास्त पोल्ट्री उद्योगासाठी म्हणजेच 55 टक्के याच्यापेक्षा जास्त मका पोल्ट्री उद्योगाला लागतो. त्यामुळे विविध प्रकारे शेतकऱ्यांसाठी मक्याची लागवड फायद्याची ठरते. मक्याच्या प्रकारांमध्ये बेबी कॉर्न ची लागवड केली तर शेतकऱ्यांना दुप्पट फायदा मिळून चांगला नफा मिळू शकतो. या लेखामध्ये आपण बेबीकॉर्न नेमके काय आहे? याबद्दल माहिती घेऊ.
बेबी कॉर्न नेमके काय आहे?
संपूर्ण जगामध्ये बेबीकॉर्न मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. कारण त्याची पौष्टिक गुणधर्म आणि चव यामुळे त्याला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. याची पाने गुंडाळली असल्यामुळेत्यामध्ये कीटकनाशकांचा कोणताही परिणाम होत नसल्यामुळे त्याची मागणी जास्त आहे. बेबीकॉर्न म्हणजे मक्याचा प्रारंभिक टप्पा असतो. ज्याला आपण आपल्या भाषेत अपरिपक्व मक्का असेही म्हणू शकतो.
याचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असून लागवडीनंतर 50 ते 55 दिवसांत बेबीकॉर्न तयार होतो. अशाप्रकारे शेतकरी एका वर्षामध्ये चार वेळाबेबी कॉर्न ची पिके घेऊ शकतात. या माध्यमातून शेतकऱ्यांना एकरी चार ते सहा क्विंटल उत्पादन मिळते. तसेच मका पिकातून बेबी कॉर्न काढल्यानंतर जनावरांना चाऱ्याची देखील उत्तम सोय होऊन पौष्टिक चारा उपलब्ध होतो. या माध्यमातून शेतकऱ्यांनाजनावरांसाठी 80 ते 160 क्विंटल हिरवा चारा मिळू शकते.
बेबी कॉर्न ची कापणी कालावधी आणि बियाणे
बेबी कॉर्न ची लागवड संपूर्ण भारतात केली जाते.यामध्ये दक्षिण भारताचा विचार केला तर दक्षिण भारतात संपूर्ण वर्षभरात बेबीकॉर्न लावता येतो तर उत्तर भारतामध्ये फेब्रुवारी ते नोव्हेंबर या महिन्याच्या दरम्यान बेबीकॉर्न ची लागवड करता येते.
याच्या लागवडी बाबतीत विचार केला तर मका संशोधन संचालनालय पुसा त्यांचा अहवाल सांगतो की बेबी कॉर्नचे उत्पादन सामान्य मक्याच्या लागवडी सारखे असून काही विशेष खबरदारी घेणे आवश्यक असते. ज्या अंतर्गत बेबीकॉर्न चा उत्पादनासाठी मक्याच्या एकाच क्रॉस हायब्रीड जाती ची पेरणी करावी व यासाठी शेतकरी हेक्टरी 20 ते 24 किलो बियाणे वापरू शकता.
बेबी कॉर्न चा उपयोग
यामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असल्यामुळे तसेच कार्बोहाइड्रेट, कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. खाताना ते कच्चे किंवा शिजवून खाता येते.
त्याच्या पोस्ट गुणधर्मामुळे बेबीकॉर्न ने स्वतःची एक बाजारपेठ काबीज केली आहे. कॅनडा सरकारने भारत सरकारची बेबी कॉर्न आयातीसाठी करार केला आहे. (किसानराज)
महत्वाच्या बातम्या
Share your comments