MFOI 2024 Road Show
  1. कृषीपीडिया

आता टाळा कीटकनाशकांवरचा खर्च आणि शेतात लावा इको लाईट ट्रॅप, चिकट सापळे जाणून घ्या का लावावे ट्रॅपच?

शेतीचा उत्पादनावर फरक पडणारा पिकांचा एक महत्त्वाचा शत्रू म्हणजे किडी

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
आता टाळा कीटकनाशकांवरचा खर्च आणि शेतात लावा  इको लाईट ट्रॅप, चिकट सापळे जाणून घ्या का लावावे ट्रॅपच?

आता टाळा कीटकनाशकांवरचा खर्च आणि शेतात लावा इको लाईट ट्रॅप, चिकट सापळे जाणून घ्या का लावावे ट्रॅपच?

शेतीचा उत्पादनावर फरक पडणारा पिकांचा एक महत्त्वाचा शत्रू म्हणजे किडी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या रासायनिक फवारण्यांचा वापर करायचा असतो त्यातूनही शेतकऱ्यांना पाहिजे तसे समाधान मिळत नाही. त्यामुळे ईको स्टिकी लाईट ट्रॅप किंवा पिवळे वनवे सापळे वापरल्यामुळे शेतकऱ्यांना बराचसा फायदा होऊ शकतो कमी खर्चात जास्त फायदा.

पिवळे सापळे- मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फळमाशी, पतंग.निळे सापळे- फुलकिडे आणि नागअळी.Yellow Traps- Mawa, Tudtude, Whitefly, Fruit Fly, Moth. Blue Traps- Flower Bugs and Weevils.सापळे शेतात वापराचे फायदे माहिती करून घ्या.१.रस शोषणाऱ्या किडी आणि त्यांच्यापासून प्रसारित होणाऱ्या रोगांसाठी अत्यंत उपयोगी२.टोमॅटो, मिरची, वांगी सर्व शोषणाऱ्या किडी आणि त्यापासून प्रसारित होणा-या रोगापासून संरक्षण कोबी,फ्लॉवर रस शोषणाऱ्या किडी आणि पतंगवर्गीय किडींपासून संरक्षण काकडी, कारले

(वेलवर्गीय पिके) - रस शोषणाऱ्या किडी आणि फळमाशी पासून संरक्षण.३.आंबा, पेरू, केळी (फळवर्गीय पिके) रस शोषणान्या किडी आणि फळमाशी पासून संरक्षण • कांदा, बटाटा, लसूण (कंद वर्गीय पिके) रस शोषणाऱ्या किडींपासून संरक्षण.सापळे चा वापर शेतात कसा करावा आणि का करावा ?१.चिकट सापळे चे पाकीट कापावे.२. चिकट भागाला हात लावण्यापूर्वी हाताला खोबरेल तेल चोळावे.३.सापळे एकमेकांपासून वेगळे करावेत.

४.भाजीपाला पिकांमध्ये रोपाच्या उंचीच्या दुप्पट उंचीची काठी घेऊन त्याला सापळा लावावा. सापळयाची उंची हि पिकाच्या उंची पेक्षा १ फुट उंच ठेवावी.५.फळपिकांमध्ये सापळे हे झाडाच्या मध्यभागी लावावेत.६.सापळे शक्यतो पूर्व-पश्चिम जास्त उजेड पडून चमकतील असे लावावेत.सापळे का वापरावे आणि फायदा काय होतो?१. निसर्गातील ब-याच हानिकारक किडी निळ्या आणि पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात. हे एक नैसर्गिक किड नियंत्रणाचे उपयुक्त साधन आहे.

२.पूर्णतः बिनविषारी असून चिकटपणा बराच काळ टिकून राहतो.३.पर्यावरणास अनुकूल आणि वापरास अत्यंत सोपे आहे.४.किड नियंत्रणासाठी सर्वच ऋतुंमध्ये उपयुक्त असून पावसातही चिकटपणा टिकून राहतो.कीटक नियंत्रणसाठी जास्त फायदा मिळाला पाहिजे या साठी हे नक्की करा.१.सापळे पिकाच्या लागवडीनंतर लगेच पहिल्या आठवड्यात लावावेत.२.चांगल्या परिणामासाठीफ एकरी २० ते ३० सापळे वापरावेत ३.सापळे ९० टक्के किटकांनी किंवा धुळीने भरल्यास त्वरित बदलावेत.

English Summary: Avoid spending on pesticides now and apply eco light traps in the field, learn about sticky traps Why use traps? Published on: 30 July 2022, 02:44 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters