1. कृषीपीडिया

कृषि महावि्यालय अकोला येथे मोठ्या थाटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

डॉ. पंदेकृवी अंतर्गत कृषी महाविद्यालय अकोला, येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
कृषि महावि्यालय अकोला येथे मोठ्या थाटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  साजरी.

कृषि महावि्यालय अकोला येथे मोठ्या थाटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

 डॉ. पंदेकृवी अंतर्गत कृषी महाविद्यालय अकोला, येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले .सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ प्राध्यापक यादव रामचंद्र गायकवाड. प्राचार्य नूतन महाविद्यालय सेलू जिल्हा परभणी तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय डॉ.व्ही. के. खर्चे सर(संशोधन संचालक, डॉ. पं. दे. कृ. वि अकोला ) यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला डॉ. वाय बी तायडे सर(अधिष्ठाता कृषी)

डॉ .एस बी. वडतकर सर (अधिष्ठाता अभियांत्रिकी) डॉ काळपांडे सर (रजिस्टार), डॉ. नागरे सर (अधिष्ठाता उद्यान विद्या) डॉ. एस एस माने सर (सहयोगी अधिष्ठाता कृषी महािद्यालय .अकोला) डॉ. कुबडे सर(विद्यार्थी कल्याण अधिकारी) डॉ हरणे सर (अधिष्ठाता वनविद्या), तसेच सर्व प्राध्यापक वृंद यांची विशेष उपस्थिती लाभली. 

प्राध्यापक रामचंद्र गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व बाबासाहेब यांच्या जीवनातून विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे प्रेरणा घ्यावी सांगितले

त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतकऱ्यांसाठी दिलेल्या योगदानावर सुद्धा प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाची सूत्रसंचालन प्रा. चिकटे मॅडम , व आभार प्रदर्शन हे डॉ. तांबे सर यांनी केले.

यावर्षी महाविद्यालय मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन (दु.१ ते ४) या वेळेत सलग चार तास वाचन करून बाबासाहेबांना मानवंदना अर्पण केली. 

या कार्यक्रमामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला.

या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिल खाडे सर यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक राम चांडक, स्वस्तिक प्रधान, वैभव अढाऊ, श्रुती निचत, कन्हैया गावंडे, मयुरी खांबलकर, रेणुका आमले, मनाली धवसे आणि योगेश उगले यांनी परिश्रम घेतले.

प्रतिनिधी- गोपाल उगले

English Summary: At the College of Agriculture, Akola, Dr. Babasaheb Ambedkar's birthday celebration. Published on: 15 April 2022, 11:36 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters