बुलडाणा जिल्ह्यासह महाराष्ट्र मध्ये मुसळधार पाऊस पडलेला असतांना तरी देखील हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रति आस्था दाखवत नाही. शेतकरी देशोधडीला लागला असतांना अनेक संकटाचा सामना शेतकरी करत आहे त्यासाठी शेगाव तहसीलवर स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी शेतमजुरांचा विराट आसूड मोर्चा काढण्यात आला, सत्ताधाऱ्यांच्या अधिपत्याखाली असलेले प्रशासकीय योजना
शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे म्हणून आज पीक नुकसान भरपाई व विम्याच्या लाभ मिळण्यासाठी अडचणी येत आहेत,Difficulties in availing insurance benefits, त्यानी पडलेला पाऊस व पिक उत्पन्नाचा खोट्या नोंदी घेऊन
या पद्धतीने हरभरा पिकातील तणनियंत्रण खर्च होईल कमी
शेतकऱ्यांना आर्थिक मदती पासून वंचित ठेवले जाते, ही सारी व्यवस्था सरळ करण्यासाठी आता शेतकऱ्यांनीच रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असे आवाहन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत
डिक्कर यांनी शेगाव येथे पार पडलेल्या भव्य जाहीर सभेत केले, मोर्चाचे रूपांतर भव्यसभेत झाल्यानंतर ते बोलत होते, पिक विमा नुकसान भरपाई व शेतमजुरांसाठी महामंडळ स्थापन करण्यासाठी, आज शेगाव तहसील कार्यालयावर स्वाभिमानीच्या वतीने शेतकरी शेतमजुरांचा भव्य आसुड मोर्चा नेण्यात आला आज जे सत्तेत आहेत ते आपले लोक प्रतिनिधी पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणानेला देतात पण काल म्हणजे एक वर्ष अगोदर
हेच लोकप्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात होते तेव्हा ते सरसकट पिक नुकसान भरपाईची मागणी करत होते, आता बोला असा सवाल करत प्रशांत डिक्कर यांनी विद्यमान आमदार संजय कुटे यांच्यावर टोला लगावला. यावेळी स्वाभिमानीच्या युवती प्रदेशाध्यक्षा पुजाताई मोरे यांनी सरकारला सज्जड दम देत शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली तर मंत्र्याची दिवाळी साजरी होऊ देणार नाही असे बोलतांना सांगितले. यावेळी
मराठवाडा अध्यक्ष गजानन पाटील बंगाळे,सांगली जिल्हा युवा नेते सम्यद पाटील,सौरभ वडवले यानी आपल्या भाषणातून सरकारवर प्रहार करत ओला दुष्काळ जाहीर करा,पीक विमा विना अट अदा करा, शेतमजुरांना दरमहा मानधन द्या.ह्या मागण्या प्रामुख्याने रेटण्यात आल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या मोर्चा ला सुरवात करण्यात आली या मोर्चा मध्ये हजारो शेतकऱ्यांसह महिला शेतकऱ्यांनी
उपस्थिती दर्शविली शेगाव तहसील वर हा मोर्चा धडकला असून मागण्या जर मान्य झाल्या नाही तर सरकारला शेतकऱ्यांच्या असंतोषाला सामोर जावं लागेल असा इशारा विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी यावेळी सरकारला दिला. यावेळी प्रमुख उपस्थिती शेगाव शहर अध्यक्ष गोपाल तायडे,उज्वल पाटील, विजय ठाकरे,राजु उमाळे,संतोष खेर्डे,पि एम घाटोळ,सुपेश वाघ,सौरभ उपाध्य,प्रविण
पोपळनारे, उज्वल खराटे,गोपाल भिसे, उपस्थित होते. शेगाव तहसीलच्या मुख्य रस्त्यावर सभा पार पडली यावेळी सभेतील शेतकरी शेतमजूरांसह मचांवरील मान्यवरांनी संघटनेची शपथ घेतली. तसेच तहसीलदार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांचे अर्ज सुपूर्द करण्यात आले. हा मोर्चा न भूतो न भविष्यती पार पडलेल्या आजच्या मोर्चात महिलांची तळपत्या उन्हात लहान मुलाबाळासह उपस्थिती उल्लेखनीय ठरली.
Share your comments