सोयाबीनचे पिकाने आता एक महिन्याचा टप्पा पार केला. झाडाचा घेर वाढू लागतो. पानांची संख्या ही वाढू लागते. ह्याच दरम्यान झाडांवर किडींचा प्रादुर्भाव वाढू लागतो. मागील महिन्यात आपण किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी निंबोळी तेलाची फवारणी करण्यास सांगितले. पण बऱ्याच ठिकाणी निंबोळी तेलाचे चांगले परिणाम दिसून आले नाहीत. कीड निंबोळी तेलास प्रतिकारक्षम झाली की निंबोळी तेलाची गुणवत्ता चांगली नाही ह्यावर मनात संभ्रम आहे. तरीही आम्हास निंबोळी अर्काचाखुप चांगला परिणाम जाणवला(१०लिटर पाणी मध्ये २किलो निंबोळीचा पाला घालून त्याला उकळावे. तयार द्रावण प्रति पंप अर्धा लिटर घालून फवारावे).
पीक ज्यावेळेस दुसऱ्या आठवड्यात पदार्पण करते त्यावेळेस त्याची फुटव्यांची अवस्था सुरू होते. फुटव्यांची संख्या जेवढी जास्त तेवढी फुलांची संख्या आपणास जास्त मिळते. इथून पुढे दर दहा दिवसानंतर ००:५२:३४ ह्या विद्राव्य खताचा प्रति एकर १किलो ह्या प्रमाणात एकूण ३ फवारण्या कराव्यात. प्रत्येक फवारणी मध्ये एखादे जैविक कीटकनाशकाचा वापर करावा. आम्ही ह्या दिवसात निर्गुडीचा अर्काची(१०लिटर पाणी मध्ये २किलो निर्गुडीचा पाला घालून त्याला उकळावे. तयार द्रावण प्रति पंप अर्धा लिटर घालून फवारावे) ही फवारणी करतो.
जर किडीवर नियंत्रण मिळवणे अवघड जात असेल तर इमामेकटीन बेंझोइट+क्लोरोपायरीफोस २०% ह्या कीटकनाशकांची फवारणी करावी. ००:५२:३४चा फवारणी मुळे प्रथम सोयाबीनची वाढ नियंत्रित होते व अवास्थव कायिक वाढ होत नाही. ह्या तीन फवारणी मुळे फुलांची संख्या आणि फळधारने वर खुप चांगला परिणाम दिसून येतो. इथून पुढे वेळोवेळी सुष्मअन्नद्रव्याची फवारणी गरजेनुसार करत रहावी.
ह्या महिन्यात फवारणी करण्यास थोडाही आळस करू नये. ह्या महिन्यात चूक झाल्यास त्याचा मोठा नुकसान होतो.
जर आपण ह्या अन्नद्रव्यांची फवारणी वेळोवेळी करत असू तर आपल्याला कोणत्याही टॉनिकची गरज भासत नाही. पण टॉनिकचा वापर करून अन्नद्रव्यांचा फवारणी कडे दुर्लक्ष झाल्यास झाडांची वाढ चांगली होईल त्याचा फुलोराही चांगला होईल पण दाणे भरतील किंवा त्याचा उत्पादन वाढेल ह्याची शाश्वती नाही. इथून पुढचा महिना शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक नियोजन करावे.
Share your comments