1. कृषीपीडिया

अश्वगंधा लागवड ठरतेय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर, जाणुन घ्या अश्वगंधा लागवडिविषयी बहुमूल्य माहिती

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
ashwagandha plant

ashwagandha plant

देशात आता पारंपारिक पीकपद्धतीला फाटा देत शेतकरी आता औषधी पिकांच्या लागवडिकडे वळताना दिसत आहेत. औषधी पिकांची लागवड ही शेतकऱ्यासाठी फायद्याचा सौदा ठरत आहे. आज अशाच एका औषधी पिकांच्या लागवडिविषयी अर्थातच अश्वगंधा लागवडिविषयी (Ashwagandha Farming) आपण जाणुन घेणार आहोत.

अश्वगंधा किंवा अस्गंध हे सरळ वाढणारे, लहान मुळे असलेले एक झाड आहे.

 अश्वगंधा एक कठोर आणि कमी पाण्यात देखील वाढू शकणारी वनस्पती आहे. अश्वगंधा ह्या वनस्पतीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते जसे की, 'इंडियन जिनसेंग', 'विषारी गुसबेरी/विष गोसबेरी' किंवा 'हिवाळी चेरी'. अश्वगंधा आपल्या भारताच्या उत्तर-पश्चिम आणि मध्य भागात येणारी स्वदेशी औषधी वनस्पती म्हणुन ओळखली जाते.

 अश्वगंधा ही खुप प्राचीन काळापासून सनातन हिंदु धर्मात आपल्या औषधी गुणांसाठी ओळखली जाते. अश्वगंधाची मुळे भारतात पूर्वीपासून आयुर्वेद आणि युनानी सारख्या भारतीय पारंपारिक औषधीपद्धतीमध्ये औषधे म्हणून वापरली जातात. अश्वगंधा वनस्पतीचे वैज्ञानिक नाव 'Withania somnifera' आहे.  अश्वगंधाची पाने थोडी हिरवी, अंडाकृती, साधारणपणे 10 ते 12 सेमी लांब असतात.  साधारणपणे त्याची फुले लहान, हिरवी आणि घंटाच्या आकाराची असतात. अश्वगंधाचे पिकलेले फळ केशरी आणि लाल रंगाचे असते. अश्वगंधाची लागवड करून शेतकरी बांधव चांगली कमाई करू शकता. अश्वगंधाची बियाणे (Ashwagandha Seed),मुळे, पाने इत्यादी औषधे म्हणुन वापरली जातात.

अश्वगंधा पिकाच्या लागवडीसाठी नेमक हवामान कसं असावे बरं?

अश्वगंधाची लागवड समुद्रसपाटीपासून 1500 मीटर उंचीपर्यंत असलेल्या जमिनीत करता येते.  उप-उष्णकटिबंधीय भागात जेथे 500 ते 800 मिमी वार्षिक पाऊस पडतो अशा ठिकाणी अश्वगंधा लागवड करणे योग्य मानले जाते, या पिकाला त्याच्या वाढीदरम्यान कोरडे हवामान आणि 20 अंश से. ते 38 अंश से.  दरम्यानचे तापमान सर्वात जास्त मानवते. तसेच हे पीक 10 अंश से.पर्यंत कमी तापमान असले तरी वाढू शकते.

 अश्वगंधा पिकासाठी कशी जमीन हवी?

अश्वगंधा पीक रेताड चिकणमाती किंवा हलक्या लाल मातीमध्ये लावता येते पण जमीन ही चांगला निचरा होणारी पाहिजे आणि जमिनीचा पीएच मूल्य 7.5 ते 8.0 पर्यंत असावा. ह्या सर्व्या गोष्टींची जमीन निवडतांना काळजी घेणे आवश्यक असते.

 

अश्वगंधा लागवडीसाठी पूर्वमशागत

पावसाळ्याच्या आधी ज्या जमिनीवर आपणांस अश्वगंधा लागवड करायची आहे ती जमीन नांगरून घ्यावी जमीन ही दोन ते तीन वेळेस नागरावी ज्यामुळे अश्वगंधाचे उत्पादन हे जास्त होईल. पिकाच्या चांगल्या उत्पादणासाठी शेतात तबेल्याच्या शेणखताचा अवश्य वापर करा हे एक मास्टरकार्ड सारखे काम करते असे सांगितले जाते. साधारणतः असे निर्दरशणास आले आहे की ज्या भागात कमी पाऊस होते तिथे ह्याची लागवड फायदेशीर ठरते उत्पादन चांगले होते आणि गुणवत्ता पण मस्त राहते.

 अश्वगंधाची रोपनिर्मिती

अश्वगंधा हे डायरेक्ट बियाणे लावून देखील पेरली जातात परंतु उत्पादन ह्यामुळे कमी होते त्यामुळे अश्वगंधाचे रोप तयार करून वावरात लागवड करावी असा सल्ला वैज्ञानिक देतात. नर्सरीत रोप निर्मिती करताना रोपांचे बेड हे जमिनीपासून थोड्या उंचीवर तयार करावे आणि त्यात रेती आणि कंपोस्ट खत घालावे.

जर आपणांस एक हेक्टर क्षेत्रात अश्वगंधा लागवड करायची असेल तर आपण 5 किलो बियाण्याची रोप निर्मिती करा. बियाण्याला बिजप्रक्रिया करण्यासाठी सुमारे 1 किलो बियाण्यासाठी तीन ग्राम थिरम लावून बिजप्रक्रिया करा. नर्सरी ही जून जुलै मध्ये तयार करून घ्या. अश्वगंधाची बियाणे हे 5 ते 7 दिवसात अंकुरतात. सरासरी 40 दिवसांची रोपे लागवडीसाठी वापरली जातात.

 अश्वगंधा लागवड Ashwagandha Farming

वावरात पूर्वमशागत झाल्यावर आणि शेणखत टाकल्यानंतर 50 ते 60 सेमी. अंतरावर गादे/गोट तयार करून घ्या. आणि तयार झालेली रोपे 30 सेमी अंतर राखून लावली पाहिजेत. एका एकरासाठी जवळपास 55 हजार रोपांची आवश्यकता असते.

 

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters