एकत्मिक फलोत्पादन विकास व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवनासाठी अनुदान मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांनी केले आहे.
विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या जुन्या बागांचे पुनरुज्जीवन या बाबींचा या योजनेत समावेश आहे.Revival of old fruit orchards is included in the scheme.
हे ही वाचा - शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देऊन शेतमजुरांना दरमहा ४ हजार मानधन लागु करा! राजु शेट्टी
मसाला पिकांसाठी अनुदान - मसाला पिकांमध्ये बिया व कंदवर्गीय मसाला पिकांसाठी प्रति हे. 30 हजार खर्च मर्यादा असून एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 12 हजार रु. अनुदान मिळेल. बहुवार्षिक मसाला पिकांसाठी 50 हजार प्रति हे.
खर्च मर्यादा असून एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 20 हजार रु. अनुदान मिळेल.फळांसाठी अनुदान - विदेशी फळ पिकांमध्ये ड्रॅगनफ्रुट, अंजीर व किवी या फळांसाठी प्रति हे. 4 लक्ष मर्यादा असून एकूण खर्चाच्या 40 टक्के किवा कमाल 1 लक्ष 60 हजार रु. अनुदान मिळेल. स्ट्रॉबेरी या फळ पिकासाठी प्रति हे. 2 लक्ष 80 हजार मर्यादा
असून एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 1 लक्ष 12 हजार रु. अनुदान मिळेल. पॅशनफ्रुट, ब्लूबेरी, तेंदुफळ व अवॅकडो या फळांसाठी प्रति हे. 1 लक्ष खर्च मर्यादा असून एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा 40 हजार प्रति हे. अनुदान मिळेल.जुन्या बागांचे पुनरुज्जीवन
जुन्या बागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 40 हजार प्रति हे. ऐवढी खर्च मर्यादा असून खर्चाच्या 50 टक्के किंवा कमाल 20 हजार रु. अनुदान मिळेल.अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी (mahadbtmahait.gov.in) पोर्टलवर फलोत्पादन या टॅबखाली अर्ज करावा. अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
Share your comments