आपल्या भारताचा नावलौकिक कृषिप्रधान देश म्हणुन केला जातो आणि आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे आपल्या रांगड्या महाराष्ट्राचं यात खुप मोठं योगदान आहे. आपल्या महाराष्ट्राच्या शेतकरी राजांनी आपल्या राज्याच नाव खूपच गाजवलंय. महाराष्ट्रात कांदा, द्राक्षे, केळी इत्यादी पिकांचे बम्पर उत्पादन घेतले जाते आणि विशेष म्हणजे केळी उत्पादनात महाराष्ट्र खूपच अग्रेसर आहे. केळी लागवड ही शेतकऱ्यांसाठी एक फायद्याचा सौदाच आहे असंच म्हणावं लागेल.
. केळी लागवडीत आपला देश खूपच जलद गतीने विकास करीत आहे आणि जेव्हा जेव्हा केळीच्या लागवडीचा विषय येईल तेव्हा तेव्हा महाराष्ट्राचं नाव घेणं सर्व्यांना भागच पडेल. ह्या सदाबहार पिकाची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत आहे.कृषी वैज्ञानिक यांच्या म्हणण्यानुसार केळी उत्पादनात आता जगात नंबर वन बनला आहे. तसेच भारतात महाराष्ट्राचा केळी उत्पादनात तिसरा क्रमांक लागतो.परंतु जेव्हा केळीच्या निर्यातीचा विषय येतो तेव्हा महाराष्ट्राचा हिस्सा सर्वाधिक आहे. कृषी खात्याच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 44000 हेक्टिअर क्षेत्र केळी लागवडीखाली असल्याचे नमूद केले आहे.
खान्देशरत्न जळगाव जिल्ह्याचा वाढता दबदबा
ज्यात निम्म्याहून अधिक क्षेत्र तर खान्देश प्रांतातील एकट्या जळगाव जिल्ह्यात आहे. खान्देश रत्न म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्याला केळीच गोदाम असे संबोधले जाते. आपल्या जळगाव जिल्ह्यातील केळीना 2016 मध्ये जीओग्राफिकल इंडिकेशन (GI) टॅग भेटला होता. यानंतर तर वैश्विक व्यापारत जळगावच्या शेतकऱ्यांनी बाजीच मारली आणि आपली पकड अजूनच घट्ट केली.
जळगावातून मोठ्या प्रमाणात केळीची निर्यात केली जात आहे आणि जेव्हापासून येथील केळीना जिआय टॅग भेटलाय तेव्हापासून तर केळी निर्यातीत जळगाव 'दिन दोगुणी रात चौगुणी' प्रगती करत आहे. जळगाव जिल्ह्यातून केळी सौदी अरब, इरान, कुवैत, दुबई, जपान, आणि युरोपिय देशात निर्यात केले जातात. यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणात पैसा आपल्या तिजोरीत जमा होतोय. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारताने 2020-21 मध्ये 619 करोड रुपयाचे तब्बल 1.91 लाख टन जिआय प्रमाणित केळी निर्यात केले. यातून जवळपास 22 टन केळी जळगाव जिल्ह्यातील तांदळवाडी ह्या एका छोट्याश्या गावातील प्रगतीशील शेतकऱ्यांनी निर्यात केलेत.
केळी लागवडीसाठी हवामान कसे असावे बरं?
कृषी शास्त्रज्ञ म्हणतात की केळी एक उष्णकटिबंधीय फळ आहे जे सामान्य समशीतोष्ण आणि दमट हवामानात चांगले येते. या पिकासाठी 15 ते 40 अंश सेल्सिअस तापमान सर्वोत्तम असल्याचे सांगितले जाते. हिवाळ्यात 12 ° C पेक्षा कमी आणि उन्हाळ्यात 40 ° C पेक्षा जास्त तापमान जर राहिले तर केळी पिकावर विपरीत परिणाम होतो.
तापमान 44 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असल्यास केळीची पाने पिवळी पडतात. उन्हाळ्यात वाहणारे गरम वारे आणि हिवाळ्यात असलेली प्रचंड थंडी पिकासाठी हानिकारक असते. जळगाव जिल्ह्याचे हवामान दमट नसले तरी, काळी माती, चांगला पाणी पुरवठा आणि केळीच्या मोठ्या क्षेत्रामुळे उत्तर भारतातील बाजारपेठांची सहज उपलब्धता यामुळे येथील शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा होतो.
केळीच्या लागवडीबद्दल जाणून घेऊया
केळी लागवडीची वेळ हंगामानुसार वेगवेगळी असते. याचे कारण असे की हवामान केळी पिकाच्या वाढीवर, केळी झाडाला लागण्यासाठी वेळ आणि केळी पिकण्यास लागणारा वेळ या गोष्टीवर खुप परिणाम करते, जळगाव जिल्ह्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला केळीच्या लागवडीचा हंगाम सुरू होतो. यावेळी या भागातील हवामान उष्ण आणि दमट असते. जून-जुलैमध्ये लावलेल्या केळीला बाग म्हणतात. सप्टेंबर ते जानेवारी या कालावधीत लावणीला कांदेबाग म्हणतात. लागवड जून-जुलैमध्ये करण्यापेक्षा फेब्रुवारीमध्ये केल्यास जास्त उत्पन्न मिळते. या महिन्यात लागवड केल्याने केळी 18 महिन्यांऐवजी 15 महिन्यांत काढता येतात.
खत व्यवस्थापन
या झाडाची मुळे उथळ असतात. केळी पिकाला अन्नाची व पोषणतात्वाची जास्त गरज असते. म्हणून, केळी लागवडीनंतर व वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात (पहिले बारा महिने) नायट्रोजनचा चांगला वापर केला जातो. लागवडीनंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात 200 ग्रॅम नायट्रोजन प्रति वनस्पती 3 हप्त्यांमध्ये समान प्रमाणात टाका. प्रत्येक झाडाला एका वेळी खतासह 500 ते 700 ग्रॅम एरंड पावडर द्यावी. लागवडीच्या वेळी 400 ग्रॅम अमोनियम सल्फेट खतासह लावावे अशी वैज्ञानिक शिफारस करतात.
पाणी व्यवस्थापन
केळीला भरपूर पाणी लागते. खोडाजवळ पाणी साचायला नको याची शेतकऱ्यांनी खात्री करणे महत्वाचे आहे. मातीचे वय आणि झाडांचे वय लक्षात घेऊन झाडांमधील अंतर निश्चित केले जाते. जड सुपीक आणि खोल माती असलेल्या जमिनीतील पिकांना 7 ते 10 सेंटीमीटर पाणी प्रत्येक वनस्पतीसाठी लागते. उन्हाळ्यात 6 ते 8 दिवस आणि हिवाळ्यात 9 ते 15 दिवस पाणी देणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात खुप जास्त उष्णता असल्यास 5 ते 6 दिवसांनी पाणी देणे आवश्यक आहे.
Share your comments