निरगुडसर येथील मोरया मंगल कार्यालयामध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने कांदा पिकातील रोग व किडी तसेच बदलत्या वातावरणामध्ये कांदा पिकाची चांगली काळजी घेऊन उत्पादन कसे वाढवावे यावर सविस्तर चर्चा झाली. कार्यक्रमाला राष्ट्रपती पुरस्कार विजेते प्रगतशील शेतकरी श्री. संदीप विश्राम घोले सर यांची उपस्थिती लाभली ज्यांनी शेतकऱ्यांना अतिशय उत्तमरीत्या मार्गदर्शन केले. त्यासोबतच के. बी. बायो ऑरगॅनिक्सच्या कृषीतज्ञ अनिता राय यांनी कांदा पिकातील रोग व किडींच्या व्यवस्थापनामध्ये के. बी. बायो ऑरगॅनिक्सची उत्पादने कश्या प्रकारे काम करतात
याची सविस्तर माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली व या उत्पादनांच्या मदतीने रोग व किडमुक्त तसेच भरघोस कांदा उत्पादन घेणे सहज शक्य आहे हे उपस्थितांना पटवून दिले. ही उत्पादने रसायनमुक्त असून फक्त ४८ तासात सक्षमपणे रोग व किडींवर प्रभावी नियंत्रण मिळवतात ही बाब शेतकऱ्यांना अतिशय प्रभावशाली वाटली.
या कार्यक्रमाला के. बी. बायो ऑरगॅनिक्सतर्फे श्री. महेश आगम, श्री. मयूर भोसले, श्री. सचिन गवारे, श्री. ओंकार गुलदगड हे उपस्थित होते व यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांसोबत संवाद साधून
कांदा पिकातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व कांद्यामध्ये खास व जमिनीतील बुरशी नियंत्रणासाठी उपयुक्त ‘रूट फिट’, थ्रिप्स म्हणजेच फुलकिडींच्या नियंत्रणासाठी ‘थ्रिप्स रेझ’, करपा तसेच इतर बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी ‘फंगो रेझ’, कांद्यावरील डाऊनी नियंत्रणासाठी डाऊनी रेझ या उत्पादनांची सविस्तर माहिती दिली. उपस्थित शेतकऱ्यांना मोलाचे व महत्वपूर्ण माहिती मिळाल्यामुळे त्यांनी के. बी. बायो ऑरगॅनिक्स कंपनीचे व कृषीतज्ञांचे आभार मानले.
कृषी मार्गदर्शनासाठी व उत्पादनांच्या माहितीसाठी आमचा टोल फ्री क्रमांक 1800 5725 788 वर त्वरीत संपर्क साधा.
Share your comments