बहुराष्ट्रीय ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉन लवकरच हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील शेतकरी आणि फळबागा दाराकडून उत्पादित केलेला शेतीमाल सरळ शेतकऱ्यांकडून खरेदी करतील. या कामासाठी एपीएमसी कडून ॲमेझॉन या कंपनीला ना हरकत प्रमाणपत्र अर्थात एनओसी ही देण्यात आली आहे. आता अमेझॉन कृषी विभागाकडूनसंबंधित परवाना आणि ठियोग बाजूला पहिले खरेदी केंद्र स्थापन करण्याची तयारी करीत आहेत.
जे शेतकरी फळ भाजीपाल्याची हात विक्री करत होते अशा शेतकऱ्यांना जागेवरच त्यांच्या माला ची चांगली किंमत देखील मिळेल आणिवाहतूक खर्चही वाचेल.
अमेझॉन भाजीपाला खरेदी करण्यासोबतच व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात शिमला जिल्ह्यात अर्धा डझन पेक्षा जास्त खरेदी केंद्र स्थापन केली जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात फळांची खरेदी करण्यात येईल.
स्थानिक एजंट च्या माध्यमातून फळे आणि भाजीपाला खरेदी करून त्या मालाला हरियाणामधील वेअर हाउस असलेल्या ठिकाणी पोहोचवला जाईल आणि या वेअर हाऊस मधून हा माल नंतर देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये
पाठविला जाईल. यामध्ये ॲमेझॉन फ्रेश च्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत फळ आणि भाजीपाल्याची डिलिव्हरी सुद्धा दिली जाईल. अमेझॉनने पुणे इथून शेतकऱ्यांकडून त्यांचा शेतमाल खरेदी करण्याचा पायलट प्रोजेक्ट आधीच सुरू केलेला आहे आणि तो यशस्वी झाला आहे.
या बाबतीत बोलताना एपीएमसी चेअरमन नरेश शर्मा यांनी सांगितले की, अमेझॉन ला या व्यवसायासाठी एनओसी दिली गेली आहे. कृषी विभागाचा परवाना घेतल्यानंतर कंपनी त्यांचं काम सुरू करेल. शेतकऱ्यांकडून फळ आणि भाजीपाला खरेदी करण्याच्या स्पर्धेत ॲमेझॉन उतरल्यामुळे
प्रति स्पर्धा वाढेल व त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.
अमेझॉन च्या अगोदर रिलायन्स फ्रेश आणि बिग बास्केट सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या फळ आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी या कंपन्यांनी सोलन आणि शिमला जिल्ह्यात खरेदी केंद्र स्थापन केले आहे. सोलन जिल्ह्यातील कंडा घाट आणि सलो गडातसेच शिमला जिल्ह्यातील नारकण्डा,कोट गड, थानधार येथे या कंपन्यांनी खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांकडून फळ आणि भाजीपाल्याची खरेदी करीत आहेत.
Share your comments