कोरफडची शेती ही अलीकडे खुप प्रचलित होत आहे. तसें तर कोरफडची शेती ही खुप फायदेमंद बाब आहे बरेचसे शेतकरी हे कोरफडची शेती करून चांगले उत्पन्न घेत आहेत.असे असले तरी बरेचसे शेतकरी कोरफडची शेती करायची खूणगाठ तर बांधतात पण शेती करत नाहीत कारण की भारतात कोरफडच्या विक्रीसाठी अजूनही चांगला बाजार उपलब्ध नाही आहे.
मागच्या काही वर्षांपासून कोरफडच्या प्रॉडक्टची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कॉस्मेटिक, ब्युटी प्रॉडक्टस पासून खाण्या पिण्याच्या हर्बल प्रॉडक्ट आणि टेक्सटाइल मध्ये पण कोरफडची मागणी वाढतेय.हे तर खरं आहे की कोरफडची मागणी वाढली आहे परंतु अजूनही बऱ्याचस्या शेतकऱ्यांना कोरफड विक्रीविषयी पुरेशी माहिती नाहीय.
म्हणून आज आम्ही आपणास ह्या विषयी माहिती उपलब्ध करून देत आहोत.
Aloe Vera (कोरफड ) दोन प्रकारे विकली जाऊ शकते
- कोरफडची पाने विकली जाऊ शकतात.
- कोरफडचा पल्प (gel) देखील विक्री केला जाऊ शकतो.
बहुतांश शेतकरी जे कोरफडची शेती करतात त्यांनी अगोदरच एखाद्या कंपनीशी करार केलेला असतो त्यानुसार त्यांचे पीक तयार झाल्यानंतर ती कंपनी त्यांच्याकडून कोरफडची पाने खरेदी करून घेते.काही शेतकरी असेही आहेत ज्यांनी कोरफड साठी प्रोसेसिंग युनिट उभारले आहेत त्यामध्ये ते स्वतः कोरफडचा पल्प काढून कंपनीना कच्च्या मालाच्या स्वरूपात विकतात.
अशा कोणत्या कंपन्या आहेत ज्यांना कोरफड (aloe vera ) ची आवश्यकता असते
1 पतंजली, डाबर, बैद्यनाथ,रिलायंस सारख्या नामी कंपनीना याची खुप मोठ्या प्रमाणात गरज असते तसेच, अशा अनेक छोट्या कंपन्या आहेत जे aloe vera चा पल्प काढून इतर मोठ्या कंपनीना प्रोव्हाईड करतात.
- आजकाल आयुर्वेदिक औषधी बनवणाऱ्या कंपनीत याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातं आहे.
3.एलोवेरा हेल्थकेअर, कॉस्मेटिक आणि टेक्सटाईलमध्येही वापरला जातो.
सुरुवातीच्या काळात कराराची शेती करून शेती करणे अधिक फायद्याचे आहे.कंपन्या थेट शेतकऱ्याकडून कोरफडची पाने किंवा पल्प खरेदी करतील हे शेतकरी आणि कंपनी यांच्यातील करारावर अवलंबून असते.
तसे, जर शेतकरी बांधव इच्छित असतील तर ते लगदा पल्प स्वत: काढू शकतात किंवा स्वतः प्रॉडक्ट तयार करून थेट काम करू शकतात.
पल्प काढून विकला तर 4 ते 5 पट अधिक नफा देखील मिळेल.केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती (सीआयएमएपी) कडून कोरफडचे प्रक्रिया युनिट स्थापन करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते सीएसआयआर-मध्यवर्ती औषधी व सुगंधी वनस्पती देखील प्रशिक्षण देते.तसेच संबंधित राज्यातील विविध संस्था वेळोवेळी प्रशिक्षण देतात.
अनुमाणित खर्च व उत्पन्न
1.पहिल्या एक वर्षात एकरी अंदाजे 80 हजार ते 1 लाख इतका खर्च येतो.
2.कोरफडची पाने प्रति किलो 4 ते 7 रुपयांना विकली जातात, हा दर शेतकरी आणि कंपनी यांच्यातील करारावर अवलंबून असतो, तर रोपवाटिकामध्ये प्रत्येक रोपासाठी 3 ते 4 रुपये मध्ये उपलब्ध असतात आणि लगद्याची अंदाजित किंमत 20 ते 30 रुपये प्रति किलो असते.
3.जर संपूर्ण वैज्ञानिक पद्धतीने शेती केली गेली तर तज्ञांच्या मते एका एकरात सुमारे 15 हजार ते 16 हजार झाडे लावली जातात.
Share your comments