Agriculture News: लसूण हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक उत्तम स्रोत मानला जातो आणि मिरची हे व्हिटॅमिन सीचे भांडार आहे. या दोन्ही गोष्टी प्रत्येक किचनचे सौंदर्य वाढवतात. कोणत्याही पदार्थाची चव या दोघांशिवाय अपूर्ण राहते. त्यामुळेच ऋतू कोणताही असो, लसूण आणि मिरचीची मागणी तशीच असते. त्यामुळेच आजकाल शेतकरी (Farmer) नोकरीला राम देऊन शेतीला जास्तीत जास्त प्राधान्य देऊ लागले आहेत.
आजकाल शेतीत (Farming) नवनवीन प्रयोग होत आहेत. पूर्वी शेती (Agriculture) हे केवळ उपजीविकेचे साधन मानले जात असे परंतु आता ते दिवस गेलेत.
शेतीमध्ये नवनवीन शोध लावले जात आहेत. या नवकल्पनांमुळे अनेक तरुण नोकरीला राम देऊन शेती कामात सहभागी होऊन चांगला नफा कमवू लागले आहेत. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला लसूण (Garlic Farming) आणि मिरचीच्या (Chilli Farming) मिश्र लागवडीबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे कमी गुंतवणुकीत तुम्हाला अधिक नफा मिळणार आहे.
Business Idea: शेतकरी पुत्रांनो नोकरींची गरजचं नाही…! 'या' पिकाची शेती करा पाच महिन्यात 30 लाख कमवा
लसूण आणि मिरचीला अधिक मागणी आहे
लसूण आणि मिरची या दोघांनाही आज जास्त मागणी आहे. त्यांच्याशिवाय कोणत्याही घरात कोणताच पदार्थ तयार होत नाही आणि या दोघांची एकत्र शेती केली तर सोन्याहून पिवळे अशी परिस्थिती होणार आहे. या दुहेरी शेतीतून दुप्पट नफा मिळणार आहे. लसूण आणि मिरचीची मिश्र शेती करणारे शेतकरी बांधव सांगतात की, ही मिश्र लागवड खूप सोपी आहे आणि कोणीही ही मिश्र शेती थोड्याशा ज्ञानाने करू शकते.
लसूण आणि मिरचीची लागवड कशी करावी
सर्वप्रथम लसणाची लागवड आपण करत आलो आहोत त्याप्रमाणे पारंपारिक पद्धतीने करावी लागते. लसणाच्या मध्यभागी जागा ठेवावी लागेल तिथे मिरचीच्या पिकाची लागवड करता येईल. ज्या पद्धतीने आपण लसणाच्या बिया टाकल्या आहेत, त्याच पद्धतीने मिरचीच्या बियाही टाकायच्या आहेत.
एकरी पन्नास हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते
लसूण आणि मिरचीच्या मिश्र लागवडीतून एकरी पन्नास हजार रुपयांपर्यंत उत्पन्न सहज मिळू शकते, असे जाणकार सांगतात. लसणाच्या तुलनेत मिरच्या लवकर खराब होतात, त्यामुळेच मिरची वेळेवर बाजारात पोहोचवण्याची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे. लसूण हे दीर्घकाळ टिकणारे पीक असल्याने ते साठवता येते. मिश्र शेतीमध्ये तुलनेने उत्पादन कमी असले, तरी दोनपैकी एका पिकाचा भाव जास्त असल्यास त्याची भरपाई होऊन चांगला नफा मिळण्याची शक्यता असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
Share your comments