हे सर्व आपण बघत आणि ऐकत आलो आहोत. सध्या कोरोना मुळे जगातील आर्थिक स्थिती काही चांगली नाही आहे तरीही आपल्या देशाची आर्थिक स्थिती ही चांगली राहावी असेच तुम्हा आम्हाला वाटत असेल तर हे होणेही शक्य आहे पण केव्हा जेव्हा आपला शेत करणार शेतकरी सुखी आणि संपन्न होईल तेव्हा. ज्यावेळी आपल्या शेतकरी मित्राचे आत्महत्येची वेळ येणे थांबेल तेव्हा. त्यामुळे हा विषय जास्त गांभीर्याने घेण्याची वेळ आहे आणि ती टाळण्याचे किंवा त्यातून बाहेर निघण्याचे उपाय काय? या सर्व गोष्टींचे चिंतन आपल्याला आणि आजची तरुण पिढी यांनी केल्यास, नक्की शेतीला एक उत्तम व्यवसाय म्हणून चांगले दिवस आल्या शिवाय राहणार नाहीत. आपला अन्नदाता शेतकरी देखील सुखी व संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी सुखी तर पूर्ण देश सुखी हे विसरता कामा नये.
सध्या शेती मधे आधुनिक क्रांती होणे हि काळाची गरज बनली आहे. यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय शेतीचा वापर करणे. ज्यामधून आपल्याला निरोगी व विषाणू मुक्त शेत जमीन, हवामान व उत्पादन मिळेल. या सगळ्यात महत्वाची बाब येते ती म्हणजे सेंद्रिय शेती मध्ये खत औषधे कोणती द्यावीत. मग ती पिकांच्या व जमिनीच्या पोषणासाठी असोत किंवा पिकांवर येणाऱ्या कीड व रोगांच्या निवारण्यासाठी असोत. आपल्या निसर्गाने याचीहि सोय करून ठेवली आहे आपल्यासाठी. जनावरांपासून मिळणारे शेन, गोमुत्र इत्यादींचा वापर. यामध्ये शेणखत या खताचा वापर करा सेंद्रिय शेती करताना, असे सांगितल्यावर असेही वाटते कि शेण सुकवून त्याचा वापर करावा म्हणजे शेणखत होय तर असे होत नाही. शेणखत बनविणे हि एक पद्धत आहे आणि त्या पद्धतीनेच ते बनविले गेले पाहिजे. तेव्हा त्याचा हवा तसा उपयोग होण्यास मदत होते.
आपल्या जनावरांचे गोठे हे कोणत्या पद्धतीचे आहेत हे देखील यात बघितले पाहिजे. त्यामुळे शेणखत बनविण्यास अनेक गोष्टींची मदत होवू शकते. म्हणजे काही गोठे हे डोक्याजवळ डोके अशा पद्धतीचे असतात. तर काही गोठे हे शेपटीकडे शेपूट असलेल्या पद्धतीचे असतात.
तर काही गोठे हे मुक्त संचार पद्धतीचे असतात जिथे जनावरांना बांधलेले नसते. यातील पक्के गोठे आहेत कि कच्चे असेही बरेच भाग आहेत. यातला महत्वाचा मुद्दा हा कि, गोठ्यात जनावरांचे शेण, शेतातील व गोठ्यातील काडीकचरा, उरलेले वैरण, व गोमुत्र इत्यादींचा उपयोग शेणखत बनविण्यासाठी केला जातो. शेणखत हे विशिष्ट जागी ढिगारा पद्धतीने किंवा खड्डा पद्धतीने बनविले जाते म्हणजे कंपोस्ट म्हणा की नाडेफ यासाठी जी पद्धत ज्यांना बनविण्यासाठी सोयीस्कर आहे तिची निवड केली जावू शकते. नंतर हा ढीग किंवा खड्डा शेण मातीच्या काल्याने लीपणे आवश्यक आहे. कारण यातील सर्व गोष्टी या कुजणे( कंपोस्ट) महत्वाचे असते, ते जेव्हा चांगल्या पद्धतीने कुजतात तेव्हा जे खत तयार होते ते खरे शेणखत होय.
यामध्ये देखील शेतीला उत्तम जोडव्यवसायाची संधी आहे. चांगल्या प्रकारच्या शेणखताची निर्मिती केली जावू शकते व त्याची उपलब्धता वाढवली जावू शकते. ज्यामुळे ज्यांना हे बनविणे शक्य नाही त्यांच्यापर्यंत खत पोहचेल. तसेच जे शेणखत बनवू इच्छिता किंवा ज्यांना बनविणे शक्य आहे
त्यांच्यासाठी चांगला व्यवसाय म्हणून उपयोग होईल. शेणखताचा वापर हा जमिनीसाठी मोलाचा आहे. त्यातून जमिनीला व पिकांना पोषक असे पदार्थ तर मिळतातच, जमिनीचा पोत सुधारतो, जमिनी भुसभुशीत होतात, जमीनीतील पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. उत्पादनात देखील चांगली वाढ होते. असे एक नाही अनेक फायदे हे शेणखतापासून होत असतात... धन्यवाद मित्रांनो
Share your comments