1. कृषीपीडिया

गारपीट झाली तर अशा प्रकारे करा विविध पिकांचे संरक्षण,जाणून घेऊ कृषी तज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

मागील दोन तीन दिवसांपूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट सोबत पाऊस झाला. केदार पट्टीचा सर्व परिणाम हा रब्बी हंगामातील पिकांवर अस नव्हे तर फळबागांवर देखील मोठ्या प्रमाणात झाला. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस किमान तापमानात फारसा फरक जाणवणार नाही.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
courtesy-times of india

courtesy-times of india

मागील दोन तीन दिवसांपूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट  सोबत पाऊस झाला. केदार पट्टीचा सर्व परिणाम हा रब्बी हंगामातील पिकांवर अस नव्हे तर फळबागांवर देखील  मोठ्या प्रमाणात झाला. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून  प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस किमान तापमानात फारसा फरक जाणवणार नाही.

विस्तारित अंदाजानुसार मराठवाडा दिनांक 5 जानेवारी ते 11 जानेवारी 2022 दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची व किमान तापमान सरासरी एवढे राहण्याची शक्यता आहे.यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषी हवामान आधारित कृषी सल्ला याची शिफारस केली आहे.

 पीक व्यवस्थापन

  • कापूस- काही ठिकाणी पडत असलेल्या पावसामुळे तसेच औरंगाबाद व जालना जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे भिजलेला कापूस वाळल्यानंतरच वेचणीकरावी व या कापसाचे साठवणूक वेगळी करावी. कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड घेऊ नये.
  • तुर- तुरळक ठिकाणी पडत असलेल्या हलक्या पावसामुळे व औरंगाबाद व जालना जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे भिजलेल्या तूर पिकाची वाळल्यानंतरच कापणी व मळणी करावी.मळणी केलेले बियाणे उन्हात वाळवून साठवणूक करावी.
  • हरभरा- सध्याचे ढगाळ वातावरणामुळे वेळेवर पेरणी केलेल्या हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी शेतामध्ये इंग्रजी टी आकाराचे प्रति एकर वीस पक्षी थांबे लावावेत.घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी दोन कामगंध सापळे लावावेत व पाच टक्के निंबोळी अर्क किंवा  इमामेक्टिन बेंजोएट पाच टक्के साडे चार ग्रॅम किंवा क्लोरट्रानीलीप्रोल18.5 तीन मिली किंवा फ्लूबेंडामाईड 20 टक्के पाच ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • गहू- सध्याचे ढगाळ वातावरणामुळे गहू पिकात खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी सायपरमेथ्रीन 10 एसी 11 मिलि प्रति दहा लिटर  पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • करडई- सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे करडई पिकातमाव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 टक्के तेरा मिली किंवा एसीफेट75 टक्के 15 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ढगाळ व दमट वातावरणामुळे  करडई पिकात पानावरील ठिपके रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब+ कार्बन्डेझीम संयुक्त बुरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळबागांचे व्यवस्थापन

द्राक्ष- सध्याचे ढगाळ व दमट वातावरणामुळे द्राक्ष बागेत डाऊनी मिल्ड्यू चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.त्याच्या व्यवस्थापनासाठी ॲमिसूलब्रूम 17.5 टक्के एस्सी 0.375 मिली किंवा फ्युयोपीकोलाइड 4.44 टक्के+ फोसेटील एएल

  • 66.67 टक्के संयुक्त बुरशीनाशक अडीच ग्रॅम किंवा डायमिथोमोर्फ50% डब्ल्यू पी 0.50 ते 0.75ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • केळी- ढगाळ वातावरण, आद्रता व काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे मूर्ग बाग लागवड केलेल्या केळी बागेत सिगाटोका रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकॉनाझोल 10 मिली + स्टिकर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • डाळिंब, संत्रा/ मोसंबी आणि आंबा- वादळी वारा तसेच पाऊस औरंगाबाद व जालना जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमुळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावेत.तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करून त्यावर एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. सध्याचे ढगाळ व दमट वातावरणामुळे फळबागेत रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बागेत मॅन्कोझेब 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुती रेशीम उद्योग

 रेशीम कोशाचा प्रत्येक पिकांमध्ये वीस टक्‍क्‍यांपर्यंत कोष उत्पादनात कीटका वरील येणाऱ्या रोगांमुळे घट येऊ शकते. रोगकारक जिवाणू, विषाणू किंवा बुरशी चा संगोपन गृहातून पूर्णपणे नायनाट होणे आणि संगोपन साहित्याचे नियमित निर्जंतुकीकरण होणे गरजेचे असते. त्यामुळे भिंती किंवा शेडनेटवर 200 मिलि प्रति चौरस मीटर या प्रमाणात ब्लिचिंग पावडर 02 टक्के आणि 0.3 टक्के विरी गेलेला चुना द्रावणात सोबत फवारणी करावी व नंतर 24 तासांनी अस्त्र निर्जंतुक  पावडर 50 ग्रॅम 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारलेले उर्वरित पाणी रोगकारकसोबत नालीतून संगोपन गृह बाहेर वाहून जाणे गरजेचे आहे. त्यामुळे चारी बाजूने 22.5 सेंटीमीटर बाय 15 सेंटिमीटर आकाराचे नाली असणे आवश्यक आहे.

 (संदर्भ -हॅलो कृषी)

English Summary: agriculture expert give advice for take precaution and management in hail and rain Published on: 02 January 2022, 09:19 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters