देशातील शेतकऱ्यांमध्ये औषधी पिकांची लागवड (Cultivation of medicinal crops) अधिक लोकप्रिय होत आहे. सरकार सुगंध मिशन अंतर्गत (Under Sugandha Mission) पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन देत असते. अपराजिता हे देखील असेच पीक आहे ज्याला फुलपाखरू वाटाणा असेही म्हणतात.
अपराजिता (Aparajita) फुलांपासून निळा चहा बनविला जातो. हा ब्लू टी मधुमेहासारख्या आजारांवर फायदेशीर आहे. शेतकरी या वनस्पतीचा उर्वरित भाग पशुखाद्य म्हणून वापरू शकतात, म्हणजे एका पिकातून तिप्पट नफा कमवू शकता.
अपराजिताचे पीक उष्मा ते दुष्काळ अशा परिस्थितीत चांगले विकसित होते. माती आणि हवामानाचा त्यावर विशेष परिणाम होत नाही. लागवडीपूर्वी बियाण्यांवर प्रक्रिया करावी. तज्ज्ञांच्या मते, पेरणी 20 ते 25 × 08 किंवा 10 सेमी अंतरावर आणि अडीच ते तीन सेंटीमीटर खोलीवर करावी.
शेतकरी इतके उत्पादन घेऊ शकतो
कृषी तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही एक हेक्टरमध्ये लागवड केली तर तुम्हाला 1 ते 3 टन कोरडा चारा आणि 100 ते 150 किलो बियाणे प्रति हेक्टरी सहज मिळू शकते. बागायती भागात 8 ते 10 टन कोरडा चारा आणि 500 ते 600 किलो बियाणे उत्पादन घेता येते.
Tur Producer Farmers: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; तुरीच्या दरात वाढ, जाणून घ्या बाजारभाव
तसेच अपराजिता फुले आणि उत्पादने अनेक देशांमध्ये निर्यात केली जातात. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला (farmers) त्याच्या लागवडीतून चांगला नफा मिळू शकतो. भारत व्यतिरिक्त अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि चीन यांसारख्या देशांमध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
महत्वाच्या बातम्या
Strawberry Farming: 'या' फळाच्या लागवडीने बदलणार शेतकऱ्यांचे नशीब; जाणून घ्या सविस्तर माहिती
Agricultural Business: शेतकरी मित्रांनो 'या' पिकाची करा लागवड; कमी कालावधीत व्हाल मालामाल
भाजीपाला लागवडीतून शेतकरी कमवतात भरघोस नफा; जाणून घ्या उत्पन्नाची सोप्पी पद्धत
Share your comments