शिंदे-फडणवीस सरकारन राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आता राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार येवढी रक्कम अनुदान दिलं जाणार आहे. कृषी विभागासोबत झालेल्या बैठकीत या योजने बाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या आर्थिक वर्षात
अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद केली जाणार असल्याची माहिती दिली जात आहे.Information is being given that provision will be made for this in the budget.
हे ही वाचा - आज आपण सगळेच जण परेशान आहे एका किडीने जाणून घ्या सविस्तर
काय आहे मुख्यमंत्री किसान योजना ?मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. आता सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. त्याच योजनेच्या धर्तीवर आता राज्यात
देखील मुख्यमंत्री किसान सम्मान निधी योजना राबवण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक महिन्यात टप्प्या टप्प्यानं शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे. प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचा लाभ या योजनेतून मिळणार आहे.लवकरच मिळणार या योजनेचा लाभ!कृषी विभागाच्या झालेल्या बैठकीत याबाबचा निर्णय घेण्यात आला असला तरी अर्थसंकल्पात
योजनासाठी नेमकी किती रुपयांची तरतूद केली जाणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु सरकार लवकरच याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसंच या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरतील याचे निकषही अजून समोर आलेले नाहीत. मात्र, मागील तीन दिवसांपूर्वी झालेल्या कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
Share your comments