भातशेतीला जोड मस्त्य उत्पादनाची

Monday, 18 June 2018 09:51 PM

भात शेतीसोबत मत्स्य उत्पादन करण्याची गरज काय?

वाढते जागतिकीकरण आणि लोकसंख्या यामुळे महाराष्ट्रातील शेतीखालचे क्षेत्र कमी होत चालले आहे. त्यामुळे कमी क्षेत्रामध्ये एकापेक्षा जास्त उत्पादन घेण्याची सध्या गरज आहे. एकत्रित मस्य उत्पादन आणि भात शेती हि एक अशी संकल्पना आहे ज्यामध्ये आपण एकाच क्षेत्रामध्ये दोन उत्पादन घेऊ शकतो एक म्हणजे धान्य आणि दुसरे म्हणजे मतस्य म्हणजे मासे.

भातशेतीला साधारणतः दुसऱ्या पिकांपेक्षा जास्त पाण्याची गरज असते. आणि याप्रकारच्या एकत्रित लागवडीमुळे आपण हेच पाणी मत्स्य उत्पादनासाठी वापरू शकतो.

एकत्रित भात व मत्स्य उत्पादनाचे फायदे काय आहेत?

 • याचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना जास्त मोबदला भेटतो कारण एकाच जागेत धान्य आणि प्रथिने या दोन्हीचे उत्पादन भेटते.
 • दुसरी गोष्ट मासे भाताच्या पिकाला हानिकारक असलेली किडी खातात त्यामुळे भातावर किडीचा प्रादूर्भाव येत नाही.
 • तृणाची वाढ होत नाही त्यामुळे तणनाशकाचा खर्च वाचतो.
 • तसेच मासे व्यवस्थितरीत्या पाणी ढवळन्याचे काम करतात जेणेकरून पाण्यामधील किंवा जमिनीतील मुलद्रव्वे पिकाला जास्त प्रमाणात उपलब्ध होतात.

कश्या प्रकारची खबरदारी घ्यावी लागेल ?

 • याप्रकारच्या एकत्रित शेतीमध्ये तुम्ही रासायनिक कीटकनाशकांचा किंवा तणनाशकांचा वापर करू शकत नाही.
 • पाण्याशिवाय माशे जगू शकत नाहीत म्हणून पाण्याचा सतत पुरवठा असणे गरजेचे आहे.
 • स्वच्छ आणि निर्जंतुक पाण्याचा वापर करावा
 • या प्रकारच्या शेतीमध्ये चर घालणे आवश्यक असते

जागेची निवड कशी करावी ?

 • जागेच्या ठिकाणी किमान ७०-८० सेमी पावसाचे प्रमाण असणे गरजेचे आहे.
 • सपाट जमीन तसेच ज्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची जास्त क्षमता असेल अश्या जमिनीची निवड करावी.
 • पाण्याचा व्यवस्थित निचरा असावा.
 • जेथे सतत पूर येतो अश्या जागेची निवड करू नये.

कुठल्या प्रकारच्या माश्यांचा उपयोग करावा ?

माश्याची निवड करताना सर्वात महत्त्वाच म्हणजे अश्या माश्यांची निवड करा जे कमी ऑक्सिजन, ३८c तापमान व उथळ पाण्यामध्ये राहू शकता. माश्यामध्ये मुख्यतः म्रगळ, कटला, थीलापोया, रोहू, क्याटफिश, सिंगडा अश्या माश्यांचे उत्पादन भात शेतीसोबत करता येते. या प्रकारच्या माशांशिवाय कोळंबीचे उत्पादन पण भात शेतीसोबत करता येते.

भात व्यवस्थापन कशे करावे ?

एकत्रित भात शेतीसोबत मत्स्य व्यवस्थापन करावयाचे असेल तर तुम्हाला पारंपारिक भात् शेती मध्ये काही बदल करावे लागतील. मुख्यतः खोल पाण्यामध्ये येणाऱ्या भाताच्या प्रजातींचा जास्त उपयोग करावा. जमिनीमध्ये चर, च्यानल, क्याणल काढावेत. चराची खोली ०.५ मी. रुंदी कमीत कमी १ मी. ठेवणे आवश्यक आहे. जर भाताचे उत्पादन जास्त हवे असेल तर अशी काळजी घ्यावी कि लागवाडीच्या जमिनी पैकी फक्त १० % भाग हा चराखाली असेल. ज्यावेळी तुम्ही माश्याच्या प्रजाती पाण्यामध्ये सोडत असाल त्यावेळेस पाण्याची पातळी १०-१५ सेमी राहील याची काळजी घ्यावी.

खत व्यवस्थापन कसे करावे ?

खतामध्ये शेणखताचा व सेंद्रिय गांडूळ खताचा वापर करावा. प्रति हेक्टरी २५ टन खत टाकावे.

मत्स्य व्यवस्थापन कसे करावे :

मत्स्य उत्पादन २ पद्धतीने करता येते. एक म्हणजे concurrent पद्धत ज्यामध्ये भात शेती व मत्स्य उत्पादन एकदाच केले जाते. आणि दुसरी म्हणजे rotation पद्धत ज्यामध्ये भात शेती व मत्स्य उत्पादन एका नंतर एक केले जाते. Rotation पद्धतीने जास्त उत्पन्न भेटते. साधारणतः २५ सेमी लांबीच्या आणि ३०-४५ सेमी खोलीच्या चरामध्ये मत्स्य उत्पादन केले जाते. १-२ सेमी लांबीचे माशे पाण्यामधे सोडले जाता. १ हेक्टर मध्ये ३०००-४००० घनता राहिल एवढे मासे सोडले जातात. माश्यांचे अन्न म्हणून सोयाबिन मिल (१०%), सुके खोबरे (२०%) आणि भाताचा कोंडा (७०%) याचा वापर केला जातो .

साधारणतः माश्यांच्या वाढीसाठी ७०-१०० दिवस लागतात व भात काढणीच्या १ आठवड्याआधी मासे काढले जातात. १०० दिवसात प्रति हेक्टरी २००-३०० किलो मत्स्य उत्पादन भेटते.  

प्रा. नेहा चव्हाण

(सहाय्यक प्राध्यापक, वनस्पती जैवतंत्रज्ञान विभाग, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

 

Fish Farming Paady Crop Paady Cultivation Addditional Income Different Breeds of Fish

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय


Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2018 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.