1. कृषीपीडिया

प्रकाश संश्लेषणाची क्रिया आणि सविस्तर माहिती

ज्या रासायनिक क्रियेद्वारे वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात हवेतील कर्बद्विप्राणिद

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
प्रकाश संश्लेषणाची क्रिया आणि सविस्तर माहिती

प्रकाश संश्लेषणाची क्रिया आणि सविस्तर माहिती

ज्या रासायनिक क्रियेद्वारे वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात हवेतील कर्बद्विप्राणिद वायू (Carbon dioxide Gas) व पाणी यांचा वापर करून अन्न तयार करतात त्या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात.प्रकाशसंश्लेषण कुठे घडते :- वनस्पतीची पाने हे वनस्पतींमधील प्रकाश संश्लेषणाचे प्राथमिक उदाहरण आहे. पान हा वनस्पतीचा एक भाग आहे. या भागातून प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती अन्न बनवतात. पान सहसा हिरव्या रंगाचं असते. प्रकाशसंश्लेषण प्रामुख्याने पानांमध्ये घडते, आणि खोडात जवळजवळ घडत नाही. हे हरितलवक

नावाच्या विशेष पेशी घटकात घडते. पानाला एक देठ आणि पाते असते. पाता रुंद असतो, A leaf has a stem and a leaf. Pata is wideत्यामुळे तो प्रकाशसंश्लेषण होत असताना सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो. हरितलवक, ज्यात प्रकाशसंश्लेषण होते, त्यात हरितद्रव्य असते. हरितद्रव्य सूर्याची प्रकाश ऊर्जा शोषून घेते.पर्णछिद्रे नावाची छोटी रन्ध्रे कार्बन डायऑक्साइड पानात यायला आणि ऑक्सिजन बाहेर पडायला मदत करतात.प्रकाश संश्लेषण (photosynthesis):- सूर्यप्रकाशापासून मिळणाऱ्या ऊर्जेच्या उपयोगाने कार्बन डाय-ऑक्साइड(CO2) व पाणी (H2O) यांसारख्या साध्या संयुगांपासून रासायनिक विक्रियेने

ग्लुकोज (C6H12O6), सुक्रोज (C12H22O11), स्टार्च (C6H10O5) इ. गुंतागुंतीच्या संयुगांची निर्मिती होते. ही प्रक्रिया बुरशी, भूछत्रे इ. क्लोरोफिलविरहित (हरितद्रव्यहीन) वनस्पती [उदा. कवक] सोडल्यास इतर सर्व वनस्पतींत आढळते; ह्या प्रक्रियेला ‘प्रकाश संश्लेषण’ म्हणतात. हा शोध लावण्याचे श्रेय डच वैद्य जे. इंगेनहाउस (१७७९) आणि स्विस शास्त्रज्ञ एन्. टी. द सोस्यूर (१८०४) यांना दिले जाते. तत्पूर्वी, जमिनीतील कुजलेल्या (ह्युमस) कार्बनी पदार्थापासून वनस्पतींचे पोषण होते, असे मानले जात असे.

प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया :- जेव्हा हिरवे वनस्पती प्रकाश ऊर्जा वापरून त्याचे रूपांतर कार्बन डायऑक्साइड (CO2) आणि पाणी (H2O) मध्ये करते तेव्हा प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया घडते. वनस्पतीचा प्रकाशसंश्लेषण करणारा रंग, हरितद्रव्य, प्रकाश ऊर्जा शोषून घेतो, आणि कार्बन डायऑक्साइड व ऑक्सिजन असलेली हवा पर्णछिद्रातून आत येते. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेचे सगळ्यात महत्वाचे उप-उत्पादन म्हणजे ऑक्सिजन, ज्यावर बहुतांश जीव अवलंबून असतात.

प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत निर्माण झालेला पिष्ठमय पदार्थ ग्लुकोस हे पाने, फुले, फळे, बीज निर्माण करण्यासाठी ऊर्जा स्रोत म्हणून वापरला जातो. ग्लुकोसचे रेणु मग एकत्र होतात आणि अजून संकुल पिष्ठमय पदार्थ निर्माण करतात, जसे स्टार्च आणि सेल्युलोस. सेल्युलोस हे वनस्पतीच्या पेशी भित्ती निर्माण करण्यासाठी मूलभूत पदार्थ आहे. प्रकाशसंश्लेषण हे जवळ जवळ सर्व जीवांसाठी प्राथमिक ऊर्जा स्रोत असते.

English Summary: Activity of Photosynthesis and detailed information Published on: 31 August 2022, 08:43 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters
News Hub