युरीयात ४६ % नत्र असले तरी त्याची उपयोग कार्यक्षमता ( use efficiency) खूपच कमी असते, या हिशोबाने प्रत्यक्ष उपयोगी पडणारा नत्र प्रति किलो भासतो त्यापेक्षा महागच पडतो.
युरियाचे अमोनिफिकेशन होताना हवेशी संपर्क आला, की अमोनिया वायू तयार होऊन तो हवेत उडून जातो. या क्रियेला होलाटीलाईझेशन असे म्हणतात. हे नुकसान सर्वांत जास्त म्हणजे दिलेल्या युरियाच्या जवळपास ५८ ते ६० टक्के असते.जेव्हा युरिया नाइट्रेट स्वरुपात येतो, तेव्हा पिकाची मुळे त्याला कोशिकांमध्ये शोषून घेतात. परंतु, जमिनीत जर ओल खूप जास्त असेल तर
चल नाइट्रेट घटक मुळांपासून दूर खोल जमिनीत पाण्याबरोबर झिरपून जातो. याचे प्रमाण २० ते २२ टक्के आहे.ज्या जमिनीला पाट पद्धतीने पाणी दिले जाते, तिथे चिखल तयार होतो. मातीतील हवेची जागा पाणी घेते. मुळांची अन्न व पाणी घेण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन ही सर्वोत्तम पद्धत आहे.पिकांच्या मुळांबरोबर नत्रासाठी स्पर्धा करणारे काही जिवाणू जमिनीत राहतात. आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी जिवाणू नाइट्रेट शोषून घेऊन सेंद्रिय स्वरुपात रुपांतरीत करतात.
पीक हे नत्र घेऊ शकत नाही याला इंमोबिलायझेशन म्हणतात. युरियामधील फक्त ३० ते ३५ टक्के नत्र पिकाला मिळते.
देशभरात खप होत असलेल्या रा. खतांपैकी युरीयाचा हिस्सा ५० % अधिक आहे, त्यामुळे देशभरात नत्र : स्फुरद : पालाश वापराचे गुणोत्तर गेल्या अनेक वर्षांपासून ७ : ३: १ असे विषम आहे, जे ४: २: १ आदर्श मानले जाते, या विषम N : P : K गुणोत्तरामुळे पिकात अन्नद्रव्यांच्या परस्पर संबंधांचा दुष्परिणाम होऊ शकतो , अजूनही मोठ्या प्रमाणात युरीया पिकात फेकून
आणि पिक अवस्थेचा विचार न करता वापरला जातो, कोणत्याही पिकाची अशी कोणतीच अवस्था नसते ज्यावेळी फक्त नत्राचीच गरज असते, म्हणून युरीया शक्यतो अन्य घटकयुक्त खतासोबत वापरणे हितावह, युरीया व्यतिरिक्त शेणखत, कंपोष्ट, अमो. सल्फेट, संयुक्त खते, विद्राव्य खते अशा माध्यमातून ही नत्राची पूर्तता होत असते, हे युरीयाची मात्रा ठरवतांना विचारात घ्यावे.
एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ
जैविक शेतकरी
शरद केशवराव बोंडे.
९४०४०७५६२८
ध्येय मातीला वाचवणं
Save the soil all together
Share your comments