आपण कधी कधी कुणाकडून किंवा दुकानातून नवं जुनं कांद्याचं बियाणं विकत आणतो, ते कधी उतरतं तर कधी उतरत नाही,कधी कमी जास्त उगवतं, त्या वेळी आपला बहुमूल्य वेळ,पैसा वाया जातो, हंगाम माघे पुढे होतो सर्वच नियोजन बदलुन जाते, आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते, हे सर्व होऊ नये या साठी सोपी पद्धत आहे,आपल्यापैकी बरेचसे ही पद्धत करतही असतील,पण मला चालु पावसाळी हंगामासाठी मागच्या वर्षीचं जुनं बियाणे टाकायचं होतं, मनात थोडी उगवण क्षमते बाबत शंका असल्यामुळे मी अगोदर सोप्या पद्धतीने उगवण क्षमता तपासुन घेतली
कांदे बियाणे उगवण क्षमता तपासण्याची पद्धत, लाल पावसाळी कांदे जुने 2019 चे पुड्याचे हे बियाणे आहे, मंगळवारी बारदान ओलं करुन पुड्यातुन मोजुन 300 दाणे बारदानावर टाकले, पुन्हा थोडं पाणी टाकलं, शुक्रवारी पुन्हा पाणी टाकुन बारदान ओलं केलं, आज रविवारी बारदान उघडून बघितलं तर 300 पैकी 248 बियाण्याचे दाणे उतरले, 50 दाणे उतरले नाही,2 दाणे सापडले नाहीत,एकंदरीत 80 ते 85 % उगवण क्षमता असल्याचे लक्षात आले, त्या हिशोबाने आपण आता शेतात बियाणे टाकतांना कमी जास्त प्रमाण करु शकतो.
कधी कमी जास्त उगवतं, त्या वेळी आपला बहुमूल्य वेळ, पैसा वाया जातो, हंगाम माघे पुढे होतो सर्वच नियोजन बदलुन जाते, आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते, हे सर्व होऊ नये या साठी सोपी पद्धत आहे,आपल्यापैकी बरेचसे ही पद्धत करतही असतील,पण मला चालु पावसाळी हंगामासाठी मागच्या वर्षीचं जुनं बियाणे टाकायचं होतं, मनात थोडी उगवण क्षमते बाबत शंका असल्यामुळे मी अगोदर सोप्या पद्धतीने उगवण क्षमता तपासुन घेतली, या माहितीचा ग्रुपवर शेतकरी बंधूंना फायदा व्हावा हाच उद्देश.
लाल पावसाळी कांदे जुने 2019 चे पुड्याचे हे बियाणे आहे, मंगळवारी बारदान ओलं करुन पुड्यातुन मोजुन 300 दाणे बारदानावर टाकले, पुन्हा थोडं पाणी टाकलं, शुक्रवारी पुन्हा पाणी टाकुन बारदान ओलं केलं, आज रविवारी बारदान उघडून बघितलं तर 300 पैकी 248 बियाण्याचे दाणे उतरले, 50 दाणे उतरले नाही,2 दाणे सापडले नाहीत,एकंदरीत 80 ते 85 % उगवण क्षमता असल्याचे लक्षात आले, त्या हिशोबाने आपण आता शेतात बियाणे टाकतांना कमी जास्त प्रमाण करु शकतो.
Share your comments