निसर्गात अनेक आश्चर्यकारक गोष्टी आपल्याला आढळतात. पक्ष्यांच्या अंडय़ाचे कवच हीसुद्धा निसर्गातली अशीच एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर म्हणजे सुमारे साडेतीन कोटी वर्षांपूर्वी उभयचर सजीवांपासून पूर्णपणे जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांची निर्मिती होत गेली. पाण्याबाहेर जगण्यासाठी या प्राण्यांना जमिनीवर अंडी घालता येणे आणि अंडय़ातल्या भ्रूणाची वाढसुद्धा जमिनीवर होणे आवश्यक होते. यासाठीच भ्रूणाच्या भोवती विशिष्ट प्रकारची पातळ आवरणे
आणि सगळय़ात बाहेरच्या बाजूला त्यांच्याभोवती असणारे कॅल्शिअम काबरेनेटचे बनलेले कठीण कवच अशा प्रकारची रचना असणारी अंडी निर्माण झाली
चला जाणून घेऊ नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातील फळबाग लागवडी विषयी
अंडय़ातल्या भ्रूणाचे पोषण त्या अंडय़ात असणाऱ्या बलक म्हणजेच प्रथिनयुक्त पदार्थावर होते.The nutrition of the embryo in the egg depends on the protein content of the egg. अंडय़ात पिल्लाची वाढ होऊन मग ते अंडे फोडून बाहेर पडते.अंड्याचे बाहेरून सहजासहजी फुटू न शकणारे टणक कवच हे कॅल्शिअम काबरेनेटच्या स्फटिकांपासून बनलेले असते. पिल्लाला ते आतल्या बाजूने चोचीने तोडता येण्याइतपत नाजूक असले तरी, ते मादी
पक्ष्याच्या संपूर्ण शरीराच्या वजनाचा दबावदेखील सहन करू शकते. ह्या कवचाला असणाऱ्या असंख्य छिद्रांमधून काही विशिष्ट प्रकारचे रेणूच आरपार जाऊ शकतात. हवा आणि आद्र्रता अंडय़ाच्या छिद्रांमधून जाऊ शकत असल्यामुळे अंडय़ात वाढणारे पिल्लू श्वास घेऊ शकते. पण त्याच वेळी अंडय़ात असणारा प्रथिनयुक्त बलक मात्र छिद्रांमधून बाहेर येऊ शकत नाही. कवचावर असणाऱ्या क्यूटिकल ह्या पातळ आवरणामुळे अंडय़ात सूक्ष्म जीव आणि धूळ शिरण्याला प्रतिबंध होतो.
हे इतके गुणधर्म एकवटलेल्या अंडय़ाच्या कवचाला संशोधकांनी निसर्गातले सिरॅमिक म्हटले आहे. अंडय़ाच्या कवचाचा वापर कॅल्शिअम काबरेनेटचा स्रोत म्हणून औषधात तसेच खत म्हणून केला जातो, हे आपण जाणतो. पण अंडय़ाच्या कवचाचे वैशिष्टय़पूर्ण गुणधर्म लक्षात घेऊन अमेरिकेतील टस्किगी विद्यापीठातील संशोधकांनी (डॉ. विजय रंगारी व अन्य यांनी) त्याचा वापर जैव विघटनशील प्लास्टिकच्या निर्मितीमध्ये केला आहे. त्यासाठी त्यांनी श्राव्यातीत ध्वनिलहरींच्या साहाय्याने
अंडय़ाच्या कवचाचे अतिसूक्ष्म तुकडे केले. कवचाच्या नॅनो कणांचा समावेश असणारे हे वेष्टन अधिक मजबूत, लवचीक आणि सहजासहजी न तुटणारे होते. या नॅनो कणांचा वापर करून तयार केलेल्या विशिष्ट पदार्थाचा वापर मोडलेली हाडे एकसंध करण्यासाठी किंवा दातातले खड्डे भरण्यासाठीसुद्धा होऊ शकते. अशा प्रकारे निसर्गातल्या आश्चर्याची माणसाच्या बुद्धिमत्तेशी सांगड घालून मानवाला कल्याणकारी ठरणारे अधिकाधिक संशोधन होणे आवश्यक आहे.
प्रसारक : दिपक तरवडे, नाशिक
संकलक : प्रविण सरवदे, कराड
Share your comments