‘भारतीय बाजारपेठेतील कृषि रसायने’ हे पुस्तक म्हणजे प्रत्येक शेतकरी, कृषी सेवा केंद्र चालक आणि शेतीविषयक मार्गदर्शन करण्याऱ्या तज्ञांच्या संग्रही असावे असेच आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे. यात कुठल्याही कंपनीच्या प्रोडक्ट्सचे मार्केटिंग करणे हा हेतू नसून केंद्रीय कीटकनाश मंडळ, फरिदाबाद यांच्या मार्गदर्शन व शिफारशीनुसार करावयाच्या औषधांचा वापर आणि त्यासंबंधी विस्तृत माहिती
यात दिलेली आहे. पिकांसंबंधी करावयाचा औषधांचा वापर तसेच कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशके यांच्याबद्दल सविस्तर माहिती आणि वापराबद्दल योग्य मार्गदर्शन आहे.There is detailed information on fungicides and herbicides and proper guidance on their use. कीटकनाशाकांचे व्यापारी नाव, वापरण्याची शिफारस याबद्दल माहिती देण्यात आली आहे. या पुस्तकात कीडीचे व्यवस्थापन करताना पीकनिहाय कीटकनाशक वापरण्याची मात्रा, पाण्याचे प्रमाण आणि
फवारणीनंतर पीक काढणीपूर्व कालावधी याबाबत माहिती प्रामुख्याने देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कीड व्यवस्थापनासंबंधीची माहिती, कीटकनाशकांचे वर्गीकरण, त्यांची वापरण्याची पद्धत इ. बद्दल महत्वपूर्ण माहिती या पुस्तकात आहे. रासायनिक, मिश्र आणि जैविक कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके इ. वर्गीकरण करून त्याबद्दलची संपूर्ण माहिती या पुस्तकात आहे. इतकी
विस्तृत माहिती एकाच पुस्तकात असणे ही खरोखरच दुर्मिळ बाब आहे. म्हणूनच हे पुस्तक शेतकरी बांधवांसाठी ज्ञानाचे भांडार आहे.या पुस्तकाचे लेखक प्रा.डॉ. बाळासाहेब भगवानराव भोसले हे एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचे तज्ञ म्हणून ओळखले जातात. पीक संरक्षण सल्ला आणि मार्गदर्शन यात त्यांची हातोटी आहे. पीक संरक्षण
आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन या महत्वाच्या विषयासंबंधी त्यांच्या अनेक वर्षांच्या समृद्ध अनुभवातून तयार झालेले हे पुस्तक म्हणजे शेती आणि शेतकऱ्यांसाठी जणू एक सकल ग्रंथच आहे, या शंकाच नाही!
पुस्तक मागवण्यासाठी संपूर्ण पत्ता द्यावा
नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिन कोड, मोबाईल नंबर
919011076709
Share your comments