आज व्यवसाय सुरु करायचा असेल तर खूप भांडवल गुंतवावे लागते. मात्र, आज आम्ही कमी गुंतवणूक करून जास्त नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायाबद्दल माहिती सांगणार आहोत. या व्यवसायाची सुरुवात तुम्ही कमी पैशात करू शकता आणि मोठी कमाई करू शकता.
प्रत्येकाचा आवडीचा नाश्ता म्हणजे पोहे हा असतोच. पोहे हे पौष्टिक अन्न मानले जाते. पोहे बहुतांश नाश्त्यासाठी वापरले जातात. हे बनवायला सोपे आहेत. आज ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागात सकाळी सकाळी पोहे हा नाश्ता आवडीने खाल्ला जातो. पोह्यापासून तयार करण्यात येणारी कांदा पोहे ही डिश सर्वजण अगदी आवडीने खातात.
लग्न ठरवण्याचा कार्यक्रम असो किंवा पाहुण्यांच्या स्वागतासाठी कांदापोहे ही डीश आज सर्व घरात आवडीने बनविली जाते. पोहे पचण्यास हलके असल्याने अगदी लहानापासून मोठयापर्यंत सर्वजण हया डिशचा आनंदाने आस्वाद घेतात.
तुम्ही पोहे उत्पादन युनिट उभारू शकता. हा चांगला व्यवसाय आहे. त्यामुळेच पोह्यांची बाजारपेठ सध्या वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करून तुमचा व्यवसाय सुरू करू शकता.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने तयार केलेल्या प्रकल्प प्रोफाइल अहवालानुसार, पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिट प्रकल्पाची किंमत सुमारे 2.43 लाख रुपये आहे. यासाठी सरकार तुम्हाला 90 टक्के पर्यंत कर्ज देखील देईल. म्हणजेच तुमच्याकडून फक्त 25 हजार रुपये घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.
पोहे मशीन, चाळणी, भट्टी, पॅकिंग मशीन, ड्रम इत्यादींवर 1 लाख रुपये खर्च कराल. अशा प्रकारे, तुमचा एकूण खर्च 2 लाख रुपये होईल, तर खेळते भांडवल म्हणून केवळ 43 हजार रुपये खर्च केले जातील.
पोहे प्रक्रिया करून बनवलेले असतात आणि पोहे प्रक्रिया उद्योग हा ग्रामीण तसेच शहरी तरुण देखील अगदी सहजतेने सुरू करू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात पोहा उद्योग विषयी सर्व माहिती. पोहे निर्मितीच्या दोन पद्धती आहेत. पारंपारिक पद्धत आणि आधुनिक पद्धत.
पोहा निर्मितीची पारंपारिक पद्धत
चांगली पोसलेली व स्वच्छ केलेली साळ रात्रभर गरम पाण्यात भिजवून ठेवा. त्यामुळे साळीतील पाण्याचे प्रमाण 30 प्रतिशत वाढते. भिजलेल्या साळीतील पाणी काढून टाकून ओली साळ चुलनावर ठेवलेल्या कढईत व गरम केलेल्या वाळूत सतत हलवून 1-2 किलोच्या प्रमाणात भाजली जाते.
पुढे भाजलेल्या साळीतील वाळू चाळून वेगळी केली जाते.
भाजलेली साळ उखळामध्ये टाकून किंवा कडा असलेल्या रनरचा उपयोग करून टरफले काढली जातात तसेच साळीवर दाब पडल्याने पोहे तयार होतात. परंतू या प्रक्रियेत पोह्याचे प्रमाण खुपच कमी म्हणजे घेतलेल्या साळीच्या 60-65 प्रतीशत मिळते.
पोहा निर्मितीची आधुनिक पद्धत
पारंपरिक पद्धती मध्ये संशोधन करून म्हैसूरच्या सी.एफ.टी. आर. आय. या संस्थेने पोहे निर्मितीची नविन पद्धत शोधली आहे. या पद्धतीने पोहयाचे उत्पादन व गुणवत्ता वाढते तसेच खर्चही कमी येतो. सुधारीत पद्धतीमध्ये मीलींग प्रक्रिया आणि पोहे तयार करण्याची पद्धत वेगवेगळी करून, हया पद्धती सलग वापरल्या जातात. त्यामुळे पोहयाचे उत्पादन 75 प्रतीशत पर्यंत वाढले जाते. या पद्धतीमध्ये साळ गरम पाण्यात भिजविणे, वाळू मध्ये भाजणे, टरफले काढणे, हवेच्या झोतात वेगळी करणे, पॉलीश करणे, चाळणे वाळविणे इ. सर्व क्रिया सलग केल्या जातात.
पोहा उद्योगासाठी उपलब्ध बाजरपेठ
कोणताही उद्योग सुरू करताना,तयार केलेली वस्तु विक्रीसाठी बाजारपेठ कोणती अथवा ग्राहकवर्ग कोण आहे हे पहाणे अत्यंत महत्त्वाचे असते. शहरी तसेच ग्रामीण भागात पोहयाचा खप हा मोठया प्रमाणावर होतो.पोहयाचा घरगुती पातळीवर जास्त खप आहे, त्यामुळे किराणा मालाची दुकाने ही पोहा विक्रीची मुख्य ठिकाणे आहेत. लाडु, चिवडा इ. तयार करण्यासाठी पोहयांना हॉटेल्स, बेकरी, मिठाईची दुकाने इ. कडून मागणी असू शकते. शॉपींग मॉल, सुपर मार्केट या ठिकाणी सुद्धा पोहा विक्री चांगल्या प्रमाणात होते. याशिवाय आठवडा बाजार, मार्केट, जत्रा, महोत्सव, प्रदर्शन हया ठिकाणी पोहयाची थोडया फार प्रमाणात विक्री होते.
पोहा उद्योगासाठी आवश्यक मनुष्यबळ
पोहे निर्मिती प्रकल्पा साठी जास्त मनुष्यबळ आवश्यक नाही. आपण जर सुरवातीला छोट्या स्वरुपात हा बिजनेस सुरू केला तर आपण अगदी 3 ते 4कामगारांवर देखील तुमचा प्रोजेक्ट उत्तम रित्या चालवू शकता.साधारण पणे एक कुशल कामगार आणि एक किंवा दोन अकुशल कामगार मदतनीस म्हणून व एक विक्रेता असे एकूण 4 कामगार देखील हा पोहे निर्मितीचा प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने सुरू ठेऊ शकतात. महिला देखील या व्यवसाय उत्तमरीत्या करू शकतात.
पोहा उद्योगासाठी आवश्यक कच्चामाल
पोहा निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून साळ वापरावी.साळ खरेदी करताना चांगली पोसलेली व स्वच्छ केलेली साळ निवडावी.साळ चांगली वाळलेली असावी. शिवाय ती चांगल्या पद्धतीने साठविलेली असावी.साळीवर जास्त प्रमाणात रसायनाचा वापर केलेला नसावा.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने तयार केलेल्या प्रकल्प प्रोफाइल अहवालानुसार, प्रकल्प सुरू केल्यानंतर कच्चा माल घ्यावा लागेल. यासाठी तुम्हाला सुमारे 6 लाख रुपये खर्च येईल. याशिवाय तुम्हाला सुमारे 50 हजार रुपये खर्च करावे लागतील. अशा प्रकारे तुम्ही सुमारे 1 हजार क्विंटल पोहे तयार कराल. ज्यावर उत्पादन खर्च 8.60 लाख रुपये येईल. तुम्ही 1 हजार क्विंटल पोहे सुमारे 10 लाख रुपयांना विकू शकता. म्हणजेच तुम्ही जवळपास 1.40 लाख रुपये कमवू शकता.
Share your comments