गांडूळ खत उपलब्ध सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत मानले जाते. गांडूळखत निर्मितीचे तंत्र सोपे असून महिला सहजरित्या हे तंत्रज्ञान आत्मसात करून शेतावर गांडूळ खताची निर्मिती करू शकतात.
- गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती:-
- ढीग/बिछाना पद्धत
- खड्डा पद्धत
- टाकी पद्धत
- खड्डा भरण्याची पद्धत :-
- गांडूळ खत तयार करण्यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
- गांडूळाचे कडक उन्हापासून संरक्षण होण्यासाठी बिछान्यावर छप्पर घालावे. छप्पर सिमेंटच्या पत्र्याचे किंवा शेतीमध्ये उपलब्ध असलेल्या तुराट्या, ज्वारीचे ताठे, गवत, पाचट इत्यादी किंवा बांबू वापरून करता येईल.
- छप्पर दोन्ही बाजूंना उताराची असावे. जेणेकरून पावसाचे पाणी सहज निघून जाईल. व दोन्ही बाजूंनी होऊन येणार नाही.यासाठी छपरा तील मधील उंची 2.5 मीटर व बाजूची उंची 1.5 मीटर असावी. रुंदी 5 मीटर व लांबी 3 मीटर किंवा आवश्यकतेनुसार आणि सेंद्रिय पदार्थाच्या उपलब्धतेप्रमाणे असावे.
- जमिनीवर सर्वात खाली तळाला 15 सेमी जाडीचा सेंद्रिय पदार्थाचा (उदा. गव्हाचे काड, उसाचे पाचट, सोयाबीन- तूर, पालापाचोळा व शेतातील इतर वाया जाणारे सेंद्रिय पदार्थ इ.) थर द्यावा.
- त्यावर अर्धवट कुजलेले शेणखत व माती 3:1 प्रमाणात मिसळून त्यांचा 15 सेमी जाडीचा थर द्यावा.( या थरामुळे उष्णता थांबविण्याचे काम करील.)
- पाण्यामध्ये शेन कालवून त्याचा 10 सेमी जाडीचा तिसरा थर द्यावा.शेणामध्ये सेंद्रिय पदार्थ कुजण्याची प्रक्रिया चालू होईल. व गांडूळास खाद्य म्हणून उपयोगात आणता येईल.
- शेवटी बिछान्यावर सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन घालावेहे आच्छादन 15 सेमी पेक्षा जास्त000 जाडीचे नसावे.
- बिछाना पाण्याने ओला करावा.( आवश्यकतेनुसार दररोज किंवा दिवसाआड बिछान्यावर पाणी शिंपडावे)
- बिछान्यातील उष्णता कमी झाल्यावर एक दोन आठवड्यांनी वरील सेंद्रिय पदार्थांचा थर बाजूला करून कमीत कमी1000 प्रौढ गांडुळे सोडावी.
- गांडूळ बिछान्यात सोडल्यावर परत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे व बिछान्यासनियमित पाणी द्यावे.
- गांडूळांच्या संख्येनुसार गांडूळ खत निर्मिती दीड ते दोन महिने लागतात.
- गांडुळखत तयार करताना घ्यावयाची काळजी :-
- बिछान्यावर पाणी टाकताना जास्त पाणी साचणार नाही व ओलावा 40 ते 50 टक्के राहील याची काळजी घ्यावी.
- बिछान्यात तील तापमान 20 अंश ते 30 अंश सेल्सियस दरम्यान ठेवावे.व त्यावर सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्यावी.
- गांडूळ खताचा बेड जवळ वाळवी, बेडूक, साप, मुंग्या, गोम, उंदीर व कोंबड्या येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
- गांडूळ खत काढण्याची पद्धत:-
खताचा रंग काळसर तपकिरी झाल्यावर खत तयार झाले असे समजावे खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे.वरचा थर थोडा कोरडा झाला की बिछान्यावर पूर्ण गांडूळ खत गांडुळांसकट बाहेर काढावे व त्यांचा बाहेर ताडपत्रीवर किंवा गोणपाटावर शंकूच्या कृती ढीग करावा.
म्हणजे उन्हामुळे गांडुळे तळाला जातील. दिघा च्या वरचे गांडूळ खत काढून घ्यावे.3-4 तासात सर्व गांडूळे खत तयार करण्यासाठी बिछान्यात / खड्ड्यात सोडावे. अशाच पद्धतीने खड्डा, कुंडी किंवा टाकी पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते.(स्रोत-अग्रोवन)
Share your comments