1. कृषी व्यवसाय

Garlic Processing: या दोन यंत्रांच्या सहाय्याने लसुन प्रक्रिया होते सोपी, वाचतो वेळ आणि पैसा

हाताने लसुन सोलण्यासाठी वेळखाऊ व कष्टदायक ठरू शकतो. त्यासाठी हे लसूण सोलणी यंत्र उपलब्ध आहे. लसणाच्या फ्लेक्सचा वापर भाजी, ब्रेड व वेगवेगळ्या औषधी उद्योगात केला जातो. ड्राय फ्लेक्स ला बाजारामध्ये मागणी आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
two machine important in garlic processing

two machine important in garlic processing

हाताने लसुन सोलण्यासाठी वेळखाऊ व कष्टदायक ठरू शकतो. त्यासाठी हे लसूण सोलणी यंत्र उपलब्ध आहे. लसणाच्या फ्लेक्सचा वापर भाजी, ब्रेड व वेगवेगळ्या औषधी उद्योगात केला जातो. ड्राय फ्लेक्स ला बाजारामध्ये मागणी आहे.

यासाठी आपल्याला स्लायसर व वाळवणी यंत्राचा उपयोग करावा. लसून पावडर चा उपयोग बेकरी पदार्थांमध्ये स्वाद आणण्यासाठी केला जातो. लसूण पावडर बनविण्यासाठी दळण यंत्राचा वापर फायदेशीर ठरतो.

नक्की वाचा:मानलं भावा! "या" नवयुवक शेतकऱ्याने अवघ्या 12 गुंठ्यात कमवले 4 लाख; वाचा या शेतकऱ्याची यशोगाथा

1-लसुन साल काढणारे यंत्र :               

 हाताने लसुन सोलण्यासाठी वेळखाऊ व कष्टदायक ठरू शकते. त्यासाठी हे लसून सोलणी यंत्र( गार्लिक पिलिंग मशीन)उपलब्ध आहे. लसणीच्या पाकळ्या हॉफरमध्ये टाकल्यानंतर फिरत्या स्क्रबर बॅरलच्या सहाय्याने लसणावर घर्षण होते. लसणाची साल वेगळी केली जाते. डी-स्क्रीन च्या सहाय्याने सोललेले लसून हे खालच्या बाजूस कंटेनर मध्ये जमा होतात. लसणाची सोललेली साल प्रायटर च्या साह्याने बाहेर टाकली जातात. प्रायटरची गतीही 1440 फेरे प्रतिमिनिट(आरपीएम) असते.

या यंत्राची अचूकता 90 टक्के पर्यंत असून ताशी 30 ते 40 किलो लसून सोलला जातो. संपूर्ण स्टेनलेस स्टील पासून बनवलेल्या या यंत्राला 220 होल्ट ऊर्जा लागते.यंत्राचे वजन 45 किलो असून, अर्धा एचपीची विद्युत मोटार जोडलेली आहे. यंत्राचा आतील भाग पूर्णपणे फूड ग्रेड स्टील ने बनवलेला असून  यंत्र गरजेनुसार सिंगल फेजकिंवा थ्री फेज उपलब्ध आहे.

2) यंत्राची किंमत 40 हजारापासून पुढे आहेत. या स्वयंचलित यंत्रामध्ये ड्राय पिलिंग व वेट पिलींग असे दोन प्रकार आहेत. ड्राय पिलिंग यंत्राची किंमत ही वेट पिलिंग यंत्राच्या किमतीपेक्षा जास्त आहे.

नक्की वाचा:रोजगार हमी योजनांतर्गत भंडारा जिल्ह्यातील ८५ हजार मजुरांना भेटला रोजगार, कामेही जोरात सुरू

2) लसून पेस्ट यंत्र :                                                                       

1) लसणाची पेस्ट बनविणाऱ्या यंत्राच्या ( गार्लिक पेस्ट मशीन) हॉपरमध्ये लसुन ओले करून टाकले जातात. तो चिरडण्यासाठी दोन रोलर च्या मध्ये दाब दिला जातो.

रोलर उलट्या दिशेने फिरवून चिरडलेला बारीक झालेला लसुन चाळणीकडे पुढे ढकलला जातो.

2) यंत्रामध्ये वेगळ्या व्यासाच्या चाळण्या लावलेल्या असतात. त्याचा आकार हा 2,4,6,8 मी. मी. असतो. त्यातून आपल्या आवश्यकतेनुसार पेस्ट मिळविता येते. तयार झालेली पेस्ट ही चाळणीतून कंटेनर मध्ये जमा होते. पॅक  केली जाते.

3) या यंत्राची क्षमता ताशी 80 ते 100 किलो असून, यंत्राला 220 होल्ट ऊर्जा लागते. यंत्राचे सर्व भाग स्क्रशर, रोलर, कटर हे फूड ग्रेड स्टील चे बनवलेले असते. यंत्र थ्री फेज वर चालते. यंत्राचे वजन 30 ते 40 किलो असून, हे अर्ध स्वयंचलित आहे. यंत्राला 3 एचपी ची मोटार जोडलेली आहे.

4) यंत्र एका जागेवरून दुसर्‍या जागेवर नेण्यासाठी सोय केलेली आहे. या यंत्रामध्ये वेगवेगळ्या चाळण्याच्या मदतीने कांदा,आले,मिरची यांची पेस्ट करता येते. यंत्राची किंमत 15 हजार रुपयांपासून सुरू होते. हे यंत्र हाताळण्यासाठी सोप्प आणि सहज वापरता येईल असे आहे.

English Summary: this is two crucial and useful machinary in garlic processing Published on: 24 March 2022, 07:03 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters