आंबा हे सर्वांचेच आवडते फळ आहे. महाराष्ट्र राज्यात आंब्याचे फळ हे जास्त प्रमाणात कोकण रत्नागिरी सिंधुदुर्ग अश्या कोकणी भागात जास्त प्रमाणात पाहायला मिळते. आपल्याकडे अनेक वेगवेगळ्या आंब्याच्या जाती आहेत त्यामध्ये हापूस, केशर, कलंबी, राजपुरी इत्यादी विविध जातीचे आंबे पहावयास मिळतात.आंबा हे उन्हाळा ऋतू मध्ये येणारे फळ आहे सोबतच आंब्याचा उपयोग अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी केला जातो. त्यामध्ये आईसक्रिम, मुराब्बे, किसमिस आणि अनेक प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो.
आंबा उत्पादक शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते:
सध्याच्या काही दिवसांमध्ये कोकणा सोबतच मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा केशरसह अन्य जातींच्या आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे.तसेच आंब्यांपासून बनवलेले वेगवेगळे गोड आणि मधुर पदार्थाना बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी सुद्धा आहे.तसेच या पदार्थाना आंतराष्ट्रीय बाजारात आणि परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे . कोकणात पहिल्यापासून आंबा हे एक पारंपरिक फळ आहे. परंतु योग्य नियोजन नसल्याने तसेच वाहतूक आणि साठवून ची ज्ञान नसल्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.म्हणून या सर्व वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी आंबा प्रक्रिया व उद्योग व्यवसायाला चालना दिली जाणार आहे.
शासन अन्न प्रक्रिया उद्योगांना आर्थिक बळ देऊन रोजगारनिर्मिती करणार आहे हाच खरा शासनाचा मुख्य हेतू आहे. या साठी रत्नागिरी जिल्ह्यामधील 141 उद्योजकांना आंबा प्रक्रिया उद्योग उभारणीला बळकटी आणि आर्थिक मदत देण्याचा सरकारच नियोजन आहे.आंबा प्रक्रिया उद्योग या साठी 5 वर्ष एवढा कालावधी दिला जाणार आहे सोबतच वेगवेगळ्या जिल्ह्यात होणाऱ्या आंब्याच्या उत्पादनावर प्रक्रिया केली जाणार आहे. तसेच उद्योजकांना एकूण योजनेच्या 35 टक्के रक्कम दिली जाणार आहे. किंवा तर जास्तीत जास्त 10 लाख रुपयांचे शासकीय अनुदान दिले जाणार आहे.
आंबा उद्योग व प्रक्रिया व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामग्री:-
आंबा प्रकिया करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या यंत्रांची आवश्यकता असणार आहे. प्रकिया साठी आंबा फोडणे किंवा साठवणीनंतर प्रक्रिया करण्यापूर्वी फळे स्वच्छ धुणे, निर्जंतुकीकरण करणे खूप गरजेचे आणि महत्वाचे असते.या यंत्रांमध्ये आंबे टाकून आंब्यावरून नोझलच्या साह्याने पाण्याची फवारणी केली जाते. त्यामुळे आंबे स्वच्छ धुवून निघतात तसेच निर्जंतुकीकरण सुद्धा होतात.नोझलच्या च्या वापरामुळे फळावरील धूळ, डाग आणि काही धोकादायक असलेले रासायनिक अवशेष निघून जातात. हे यंत्र संपूर्णपणे स्टेनलेस स्टिलचे असून, या यंत्राची एकूण क्षमता ही 100 किलो प्रति तास एवढी आहे. या यंत्राला 240 व्होल्ट विजेची आवश्यकता असते आणि कमीत कमी 1 एचपी विद्यूत मोटारेची आवश्यकता असते.या यंत्राचा आकार हा 5 फूट बाय 2 ते 3 फूट एवढा असु शकतो. या यंत्राचे वजन हे 100किलो ते 110 किलो एवढे असते आणि यामध्ये एकूण 300 लिटर पाण्याची साठवणूक सुद्धा करता येते. तसेच हे यंत्र जर सुरवातीला खरेदी करण्यासाठी कमीत कमी 90 हजार रुपयांच्या पुढे गुंतवणूकीची गरज असते.
Share your comments