1. कृषी व्यवसाय

लघु प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून करा तेलबियांची मूल्यवर्धन

शेतात पिकलेल्या मालावर लघु प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून तसेच विविध तंत्रज्ञानाचा आणि यंत्रांचा वापर करून चांगल्या प्रकारे व्यवसाय स्थापन करता येतो. या लेखात आपण विविध यंत्रे आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तेलबियांपासून तेल निर्मिती आणि विविध प्रक्रिया कसे करतात याबद्दल माहिती घेऊ. अ)सोयाबीन: 1- सोयाबीन स्वच्छ करून, व्यवस्थित पॅक करून तसेच शिजवून उसळी सारखे खाण्यासाठी उपलब्ध केले जाऊ शकते. सर सोयाबीन मधील पोषक तत्वांचा विचार केला तर त्यामध्ये 40 टक्के चांगल्या गुणवत्तेचे प्रथिने असतात. तसेच सोयाबीन मध्ये सोया दूध, सोया पनीर तसेच सोयाबीनचे प्रक्रिया केलेले पीठ इत्यादी उद्योगांमध्ये चांगली संधी आहे. 2- तसेच सोयाबीन वर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करता येते त्या पासून फुटाणे किंवा तळलेले सोयाबीन तुवा सोयाबीनची डाळ ग्राहकांना पसंत असते ती निर्माण करता येते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
processing on oil seed

processing on oil seed

 शेतात पिकलेल्या मालावर लघु प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून तसेच विविध तंत्रज्ञानाचा आणि यंत्रांचा वापर करून चांगल्या प्रकारे व्यवसाय स्थापन करता येतो. या लेखात आपण विविध यंत्रे आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने  तेलबियांपासून तेल निर्मिती आणि विविध प्रक्रिया कसे करतात याबद्दल माहिती घेऊ.

अ)सोयाबीन:

1- सोयाबीन स्वच्छ करून, व्यवस्थित पॅक करून तसेच शिजवून उसळी सारखे खाण्यासाठी उपलब्ध केले जाऊ शकते. सर सोयाबीन मधील पोषक तत्वांचा विचार केला तर त्यामध्ये 40 टक्के चांगल्या गुणवत्तेचे प्रथिने असतात. तसेच सोयाबीन मध्ये सोया दूध, सोया पनीर तसेच सोयाबीनचे प्रक्रिया केलेले पीठ इत्यादी उद्योगांमध्ये चांगली संधी आहे.

2- तसेच सोयाबीन वर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करता येते त्या पासून फुटाणे किंवा तळलेले सोयाबीन तुवा सोयाबीनची डाळ ग्राहकांना पसंत असते ती निर्माण करता येते.

 तसेच भाजलेले किंवा तळलेले सोयाबीनवर बेसन पीठ, साखर, चॉकलेट इत्यादी चा लेप देऊन तळून किंवा शिजवून पदार्थ तयार करता येतो. या पदार्थांना चांगली मागणी असते.

ब) जवस:

1- जवस हृदयाच्या आरोग्यासाठी फारच उपयुक्त आहे. त्यामुळे त्याचे चांगले गुणधर्म लक्षात घेता त्याच्या पदार्थांना बाजारात मागणी वाढत आहे.

2- जवस स्वच्छ करून विकता येते तसेच त्याला भाजून थोडेसे मीठ लावले तर तो एक जेवणानंतर खाण्यासाठी चवदार पदार्थ बनतो.

  • तीळ:
    • आपल्याला माहीतच आहे की ब्रेड, बन इत्यादीवर टीव्ही लावून पॅकिंग ची प्रक्रिया केली जाते.
    • ती स्वच्छ करून पॅकिंगमध्ये विकावा किंवा स्थानिक पातळीवर तिळाची चिक्की, वडी व लाडू यांना मागणे आहे.

ड) भुईमूग:

1- शेंगांची टरफले काढून शेंगदाणे व तुकडे वेगळे करून विकणे हा एक लघु उद्योग होऊ शकतो. जर मोठी मागणी असेल तर शेंगदाण्याची  प्रतवारी करण्याचे यंत्र वापरणे फायदेशीर ठरते. उद्योगासाठी शेंगा फोडणी यंत्र मिळते, त्याची क्षमता 50 ते 60 किलो शेंगा फोडणी प्रति तास असते.

  • जर या क्षमतेचा विचार केला तर आठ तासात साधारण चार क्विंटलशेंगा सहजपणे फोडल्या जाऊ शकतात. तसेच या शेंगा फोडणी कार्यामध्ये स्त्रियांना सुलभता यावी यासाठी लहान क्षमतेचे म्हणजेच 25 ते 30 किलो शेंगा प्रतितास पडू शकेल असे शेंगा फोडणी यंत्र मिळते.
  • तसेच शेंगदाणे भाजून ते पॅक करून खाद्यपयोगासाठी विकता येतात. तसेच आपल्याला माहितीच आहे की खारे शेंगदाण्या ना  देखील बाजारात चांगली मागणी असते.त्याप्रमाणे बेसन पीठ व तिखट, नीट थोड्याप्रमाणात कालवून शेंगदाणे लावून तळल्यास तयार होणारा चविष्ट खमंग  पदार्थ चांगला चालतो.
  • तसेच भाजलेले शेंगदाणे पासून तयार होणारे गोड पदार्थ म्हणजेगुळ शेंगदाण्याची चिक्की, गुळ पापडी तसेच शेंगदाण्याचे लाडू हे सर्व पदार्थ तयार करण्यासाठी जास्त जागा, भांडवले इत्यादीची जास्ती ची गरज नाही. हे सर्व पदार्थ बाजारात विकले जातात.

ई)

सूर्यफूल:

1- सूर्यफुलाच्या बिया स्वच्छ करून ते भाजून विकता येतात. यास देश-परदेशात मागणी असते.

2- सूर्यफुलाच्या बिया स्वच्छ करून यंत्राच्या साहाय्याने त्याचे टरफल काढले जाते. त्यानंतर योग्य उष्णतेवर भाजून त्यात मीठ लावून स्नॅक्स म्हणून बाजारात मागणी आहे.

 

 तेल उद्योग

 रसायनांचा उपयोग न करता तसेच कमी तापमानावर तेलबियांपासून तेल काढून त्याला फक्त गाळून खाद्य उपयोगात वापर वाढला आहे. याचा फायदा घेऊन लहान क्षमतेची तेल घाणी च्या सहाय्याने गावांमध्ये तेल निर्मिती उद्योग करणे शक्‍य आहे. शहरातून घाणी वर तयार केलेल्या तेलाला मागणी वाढत आहे.

English Summary: processing on oil seed Published on: 08 July 2021, 09:19 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters