कवठापासून प्रक्रियायुक्त पौष्टिक पदार्थ

04 April 2020 09:00 AM


कवठ हे फळ मधुर व आम्लरसाचे असते. दररोज कवठाच्या सेवनाने रोग प्रतिकार क्षमता वाढते. कवठा प्रमाणेच कवठाची पाने ही बरेचसे आजार दूर करण्यासाठी वापरली जातात. कवठ हे अतिशय पौष्टिक व शीतल फळ आहे. त्याच्या सेवनाने रक्ताचे शुद्धीकरण होते तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत होते आणि म्हणून मधुमेह असणाऱ्या माणसांसाठी कवठ हे उपयुक्त फळ आहे.

कवठातील पोषक घटक

कवठाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण:

 • जलांश ६१.१ %
 • प्रथिने १८ %
 • कार्बोदके ३१.८ %
 • लोह २.६ मिली
 • जीवनसत्व 'क' २ मिली
 • कॅल्शियम ८५ मिली
 • तंतुमय पदार्थ २.९ %.

कवठाचे प्रक्रियायुक्त पदार्थ:

1) जॅम

 • साहित्य: १०० ग्रॅम पिकलेल्या कवठाचा गर, १०० ग्रॅम साखर.
 • कृती: सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवून त्यात एक ग्लास पाणी टाकावे. त्यामध्ये कवठाचा गर घालून चांगले शिजवून घ्यावे. शिजवल्यानंतर मिश्रण गाळून घ्यावे. गाळलेला गर दुसर्‍या भांड्यात काढून ते भांडे गॅसवर ठेवावे. आणि त्यात साखर घालावी. मिश्रण सतत हलवत रहावे.मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करावा आणि तयार जाम थंड होण्यास ठेवावा जॅम थंड झाला की स्वच्छ भरणीत भरून ठेवावा.

2) सरबत

 • साहित्य: १०० ग्रॅम कवठाचा गर, ५० ग्रॅम गूळ, विलायची पूड.
 • कृती: कवठाचा गर, गुळ  पातेल्यात घेऊन चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित एकत्र करून घ्यावा. त्यात थोडीशी विलायची पूड आणि गरजेनुसार पाणी घालावे. मिश्रण व्यवस्थित एकत्र करून गाळून घ्यावे. आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये बर्फाचा तुकडा घालू शकता. असे हे कावठाचे सरबत उन्हाळ्यामध्ये तुम्ही शीतपेय म्हणून घेऊ शकता.

3) बर्फी

 • साहित्य: ५० ग्रॅम सुक्या खोबर्‍याचा कीस, ५० ग्रॅम गूळ, ५० ग्रॅम कवठाचा गर, काजू-बदामाचे तुकडे.
 • कृती: सर्वप्रथम कवठाचा गर मिक्सर मधून बारीक करून घ्या. नंतर कढई गॅस वर  ठेवून त्यात कवठाचा गर, गूळ, खोबरे एकत्र करून चांगले परतून घ्या. त्यात विलायची पूड काजू बदामाचे  तुकडे घाला. व मिश्रण चांगले घट्ट झाले की गॅस बंद करा. ताटाला तुपाचा हात फिरवून त्यात हे मिश्रण पसरवा. आणि थंड झाले की त्याच्या वड्या पाडा.

लेखक:
गोपाल मदन सोळंके आणि भूषण भगवतराव रेंगे
शुआट्स एग्रीकल्चरल यूनिवर्सिटी, प्रयागराज उत्तरप्रदेश
9518984241/9097885555
                                                  

kavath wood apple कवठ मधुमेह Diabetes wood apple barfi wood apple sarbat wood apple jam कवठ बर्फी कवठ सरबत कवठ जॅम
English Summary: Processed nutritious products from wood apple

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.