शेतीक्षेत्र म्हटले म्हणजे खूप व्यापक असे क्षेत्र असून या क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत. शेतीक्षेत्राचा विचार केला तर याचे स्वरूप खूप व्यापक असून यामध्ये प्रचंड अशा व्यावसायिक संधी दडलेल्या आहेत. शेतीला जे काही जोडधंदे केले जातात त्या संबंधी देखील भरपूर प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर पशुपालनाचा विचार केला तर पशूंना लागणारे खाद्य विक्री किंवा खाद्य तयार करणे हादेखील एक चांगला व्यवसाय होऊ शकतो.
तसाच शेतीला पूरक जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा आता व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जात आहे. या कुक्कुटपालनाशी संबंधित अनेक प्रकारचे व्यवसाय आहेत. त्यातीलच एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे हॅचरी म्हणजेच अंडे उबवण्याची प्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञान होय.
नक्की वाचा:शेतकरी लाल भेंडीची लागवड करून चांगला नफा मिळवू शकतात; दर मिळतोय 500 रुपये किलो रुपये
हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. यामध्ये तुम्ही सहा ते सात रुपयांना विकले जाणारे एक अंडे 50 रुपयांपर्यंत विकु शकतात. यासाठी तुम्हाला प्रथम हॅचरीची व्यवस्था करणे गरजेचे आहे. तुम्ही अगदी इनक्यूबेटर वापरून देखील घरच्या घरी हॅचरी बनवू शकतात.
यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी
जर तुम्हाला हॅचरी बनवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला इन्क्युबेटर,पोल्ट्री इन्क्युबेटर कंट्रोलर,हॅचर, कॉम्प्रेस एअर सिस्टम, इमर्जन्सी स्टँडबाय इलेक्ट्रिक प्लांट सेटर इत्यादी साहित्य आवश्यक आहे. तुम्हाला बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध होते. या साहित्याचा वापर करून तुम्ही घरच्याघरी हॅचरी तयार करू शकता.
नक्की वाचा:Bussiness Tips: भरपूर मागणी असणारा व्यवसाय आणि कमी गुंतवणूक,कमाई मात्र प्रतिमाह लाखात
या गोष्टी पाळणे गरजेचे
हॅचरी बांधतांना आद्रता, त्याचे तापमान व वायू वातावरणातील व अंडी फिरवण्याकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे. इन्क्युबेटरमध्ये समान तापमान ठेवणे खूप महत्त्वाचे असून यासाठी 37.2 अंश सेंटिग्रेड तापमान खूप महत्त्वाचे आहे.
त्यापेक्षा कमी तापमान असेल तर अंडी उबवण्याची जी काही प्रक्रिया होते त्याला उशीर लागतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इन्क्युबेटरमध्ये ओलावा असू नये. ओलावा असल्यास त्या ठिकाणी अंडी खराब होण्याचे शक्यता बळावते व आर्थिक नुकसान होते.
हॅचरी तयार करताना ती किती आकाराची असावी हे देखील महत्त्वाचे आहे. म्हणजेच आकार मोठा असेल तितके जास्त प्रमाणात अंडी तयार होतात व जास्त नफा मिळतो. या माध्यमातून तुम्ही अंड्याच्या माध्यमातून चांगला नफा मिळवू शकतात.
या व्यवसायातील कमाईचे एकंदर स्वरूप
काही शास्त्रज्ञांच्या मते, अगदी बाराशे रुपयांमध्ये तुम्ही घरी बसून हॅचरी तयार करू शकतात. या प्रक्रियेत अंडी उबविण्यासाठी पंचवीस दिवस लागतात.ही अंडी बाजारमध्ये 40 ते 50 रुपयांना विकली जातात व यामधून जे काही चिक्स अर्थात कोंबडीचे पिल्लू बाहेर येतात,ते विकून देखील तुम्ही चांगला नफा मिळवू शकतात.एवढेच नाही तर घरच्या घरी पिल्ले तयार करून पोल्ट्री व्यवसाय करणे खूप महत्त्वाचे ठरते.
Share your comments