
संत्री हे फळ चवीने आंबट गोड स्वरूपाचे असते. या फळाचा रंग प्रामुख्याने नारंगी असतो त्यामुळे त्याला नारंगी या देखील नावाने ओळखले जाते. संत्री हे रसाळ स्वरूपाचे फळ आहे. संत्रीचा समावेश लिंबूवर्गीय फळांमध्ये होतो. हे सर्वाधिक लोकप्रिय फळ आहे. संत्र्याची साल त्वचेसाठी अतिशय उपयुक्त ठरते. संत्रामध्ये जीवनसत्वे फार मोठ्या प्रमाणात असतात.
विशेष जीवनसत्व ‘क’ चे प्रमाण जास्त असते. संत्र्यांचा रस अनेक लोक आवडीने पितात. दररोज एक ग्लास रस पिल्याने शरीराचा तणाव व थकवा दुर होतो. संत्रीच्या दररोज सेवनाने दात आणि हिरड्या सुदृढ राहतात. तसेच दात पांढरे होण्यास मदत होते. संत्र्याच्या सेवनाने मूळव्याध ही बरा होण्यास मदत होते. संत्र्यांच्या दररोज सेवननी केसांची चमक वाढते. तसेच केस लवकर वाढतात. दररोज एक संत्रे खाल्ल्याने आपल्या शरीराला लागणारे जीवनसत्व ‘क’ मिळते व आपली रोगप्रतिकार क्षमता वाढते.
संत्री खाल्ल्याने हृदयरोगाचे आजार बरे होण्यास मदत होते. संत्रीमध्ये असणारे फोलेट आणि फोलिक एसिडमुळे मेंदूचा विकास होण्यास मदत होते. संत्र्याच्या सेवनाने पचनशक्ती वाढते तसेच उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो संत्रीच्या खाल्ल्याने भूक वाढण्यास मदत होते संत्री मध्ये जीवनसत्व ‘अ’ असल्यामुळे (मुबलक प्रमाणात असल्यामुळे) संत्री ही डोळ्यासाठी उपयुक्त ठरते.
संत्री फळांमध्ये प्रति 100 ग्रॅम मध्ये
- पाणी- ८७%
- उष्णता- ४७%
- प्रथिने- ०.९ ग्रॅम
- साखर- ९.४ ग्रॅम
- फॅट- ०.१ ग्रॅम
- फायबर- २.४ ग्रॅम.
संत्री पासून प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मिती
अ) संत्री जॅम
साहित्य: ताज्या पिकलेल्या संत्र्या 500 ग्राम, 500 ग्राम साखर, एक लिंबाचा रस.
कृती:
सर्वप्रथम संत्रा स्वच्छ धुऊन घ्याव्यात. संत्र्याची साल काढून रस काढून घ्यावा. संत्र्याची साल फेकून न देता त्याचे बारीक बारीक काप करून घ्यावेत. नंतर गॅसवर कढई ठेवून त्यांच्यामध्ये तयार संत्र्याचा ज्युस टाकावा आणि संत्र्यांच्या सालेचे कापही टाकावेत. रसाला उकळी आली की त्याच्यामध्ये साखर घालावी आणि सतत ढवळत रहावे साखर घातली की लगेच एका लिंबाचा रस घालावा. मिश्रण घट्ट होत आले की गॅस बंद करावा. तयार जॅम थंड झाला की स्वच्छ धुऊन वाळवलेल्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवावा.
ब) संत्रा बर्फी:
साहित्य: ४ ताज्या संत्र्या, ४०० ग्राम खवा, ४०० ग्राम साखर, ५० ग्रॅम तूप, १०० ग्रॅम काजू, बदाम, पिस्ता प्रत्येकी, ५ ग्रॅम इलायची पावडर.
कृती:
सर्वप्रथम संत्र्याचे साल काढून घेणे. नंतर बिया काढून पाणी न घालता त्याचा रस तयार करून घ्यावा. कमी गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये खवा आणि साखर घालावी. मिश्रण सतत हलवत राहावे आणि चांगल परतून घ्यावे. खव्याचा रंग हलका सोनेरी झाला की त्याच्यामध्ये संत्रीचा घट्टसर काढलेला रस घालावा आणि मिश्रण साखर हलवत रहावे मिश्रण घट्ट झाले की त्याच्यामध्ये तूप आणि विलायची पावडर घालावी आणि चांगले एकत्र करून घ्यावे गॅस बंद करावा व मिश्रण थंड होण्यास ठेवावे एका ताटाला तूप लावून त्याच्यामध्ये हे मिश्रण पसरून घ्यावे पूर्णपणे थंड झाली की हवी त्या आकाराची बर्फी कापावी.
क) संत्रा कँडी:
साहित्य: संत्री ५०० ग्राम, साखर २५० ग्राम, २ लिंबाचा रस.
कृती: सर्वप्रथम संत्रा स्वच्छ धुऊन साफ करून घ्याव्यात. नंतर संत्र्याची साल काढून घ्यावी. पांढरा भाग पूर्णपणे साफ करून घ्यावा. संत्र्याच्या सालीचे बारीक बारीक तुकडे करून घ्यावेत. मध्यम गॅसवर कढई ठेवून त्यात साखर घालावी. साखरेचे पाणी घालू नये. साखर विरघळलेली की, त्याच्यामध्ये दोन लिंबाचा रस घालावा नंतर त्याच्यामध्ये संत्र्यांच्या सालेचे तुकडे आणि संत्री घालून व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. दोन मिनिटे शिजल्यानंतर गॅस बंद करावा. एका ताटामध्ये एक एक संत्रीचा तुकडा ठेऊन ती सुकायला ठेवावे. नंतर सुकलेल्या संत्री वर बारीक केलेली साखर टाकावी आणि कँडी स्वच्छ काचेची भरणीत भरून ठेवावी.
लेखक:
भूषण भगवतराव रेंगे
(आचार्य पदवीचे विद्यार्थी, शुआट्स एग्रीकल्चरल यूनिवर्सिटी, प्रयागराज उत्तरप्रदेश)
9097885555