शेना पासून बनणाऱ्या गोवऱ्या यांचा उपयोग विविध आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये केला जातो. या कारणामुळे ऑनलाईन बाजारांमध्ये यांची खूप मागणी वाढली आहे.
ऑनलाइन शॉपिंग साइट्स वर गायीच्या शेना पासून बनणाऱ्या गोवऱ्यांनी एक जागा बनवली असून आकर्षक पॅकिंग च्या माध्यमातून ऑनलाइन शॉपिंग साईट च्या माध्यमातून घरपोच डिलिव्हरी यांची केली जात आहे. ईबे, शॉप क्लूज, वेदिक गिफ्ट शोप, अमेझॉन इत्यादी साइटवर या गोवऱ्या विकल्या जात आहेत. या माध्यमातून ऑर्डर दिल्यास काही दिवसातच यांची डिलिव्हरी केली जाते. ग्राहकांना सोयीचे व्हावे म्हणून काही साईटवर या गोवऱ्यांचा आकार आणि वजन या बद्दल देखील तपशीलवार माहिती देण्यात आली असून एक डझन गोवऱ्यांची किंमत शंभर रुपयांपासून ते तीनशे रुपयांपर्यंत आहे. दोन डझन गोवऱ्या मागवला तर यावर खास सूट देखील दिली जात आहे. तसे पाहायला गेले तर हि किंमत जास्त वाटत असली तरी अध्यात्मिक कार्यामध्ये गोवर यांचा होणारा वापर पाहत आहे किंमत काहीच नाही. आपल्याला माहित आहेच की धार्मिक कार्यक्रमांमध्ये गायीच्या शेनापासून असलेल्या जागेला पवित्र केले जाते. गायीच्या शेनापासून बनवल्या गेलेल्या गोवऱ्यांपासून यज्ञाची अग्नी पेटवली जाते. आजही ग्रामीण भागामध्ये महिलावर्ग सकाळी सकाळी उठून गाईचे शेणाच्या गोवऱ्या लिपताना दिसतात. इंटरनेटवर अशा भरपूर साईट्स आहेत ज्याद्वारे फक्त गौ उत्पादने आपल्यापर्यंत पोहोचण्याची सुविधा देतात.
यामध्ये एक आहे गौ क्रांती डॉट ओआरजी या साइटवर तुम्हाला गाईचे शेणापासून बनवल्या गेलेल्या गोवऱ्या, साबण, देवांच्या मुर्त्या, ऑरगॅनिक पॅन्ट, गोमूत्र,धूप इत्यादी साहित्य उपलब्ध होते. कंपनीचे साहित्य गुजरात पासून भोपाल पर्यंत जवळजवळ 15 गो शाळेमार्फत मागवते. गोवऱ्यांच्या हा व्यवसाय आता जागतिक स्वरूप धारण करीत आहे. तसेच किरकोळ विक्रेत्यांकडे जास्त प्रमाणात गायीच्या गोवऱ्यांची ऑर्डर येत आहे. शहरी भागात राहणाऱ्या लोकसंख्या साठी गाईच्या गोवऱ्या तसेच दुर्मिळ आहेत. याच कारणामुळे देशात आणि देशाच्या बाहेर काही खास कार्यक्रमाप्रसंगी या गोवर्यांची मागणी वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या तरुणांसाठी हा व्यवसाय खूप फायदेशीर ठरू शकतो. कारण ग्रामीण भागांमध्ये शेन सहजासहजी उपलब्ध होते. या गोवऱ्यांना ऑनलाइन विकण्यासाठी तुम्ही स्वतःची साईट तयार करू शकता किंवा गौक्रांती डॉट ओआरजी च्या माध्यमातून विकू शकतात.
तसेच लोकप्रिय वेबसाईट जसे की वैदिक गिफ्ट शोप, ॲमेझॉन, शॉप क्लूज, इबे सारख्या साईट च्या माध्यमातून विक्रेते बनवून विकू शकतात.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:अतिशय महत्वाची माहिती! गोबर गॅस प्लांट कसा उभारायचा? याबद्दल घ्या सविस्तर माहिती
Share your comments