कांदा प्रक्रिया व मूल्यवर्धन

Friday, 28 September 2018 12:18 PM

अन्न पदार्थातील जलांश कमी किंवा पूर्णपणे नाहीसा करून तो अन्नपदार्थ अधिक काळ टिकवता येवू शकतो. महाराष्ट्रातील नाशिक भागात कांद्याचे खूप मुबलक प्रमाणात उत्पादन होत असते. अधिक उत्पादन आणि अत्यंत कमी बाजार भाव या मुळे शेतकरी हताश होतो. उत्पादन खर्च देखील कधी कधी शेतकरी परत मिळवू शकत नाही, अशावेळेस शेतकऱ्याने कमी बाजारभावात कांद्याचे विपणन टाळले पाहिजे आणि आपल्या उत्पादनावर कमी अधिक प्रमाणात प्रक्रिया करून शेतीमाल विकला पाहिजे.

कांदा सुद्धा नाशवंत पदार्थ आहे, पण भारतीय कांद्याचे काही वैशिष्ट्य आहेत. अधिक तिखटपणा, अधिक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट यामुळे भारतीय कांद्याचे पोषणमूल्ये अधिक आहेत. कांद्याचे विविध प्रकारे मूल्यवर्धन करून नेहमी पेक्षा अधिक नफा शेतकरी मिळवू शकतील.

कांद्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ: 

कांदा ग्रेव्ही:

साहित्य: कांदा: 1 किलो, काळीमिरी: 5 ग्रॅम, लवंग: 5 ग्रॅम, दालचिनी: 5 ग्रॅम, तेजपत्ता: 10 ग्रॅम, तेल: 50 ग्रॅम, पाणी: 750 ग्रॅम.

प्रक्रिया:  

 1. सपाट तवा किंवा किंवा काढईत कांद्याचे काप करून भाजून घ्यावे.
 2. भाजलेल्या कांद्याची ग्राइंडर मध्ये पेस्ट बनवावी.
 3. कढईत तेल तापवून त्यात काळीमिरी, लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता टाकावा आणि त्यात कांद्याची पेस्ट परतवून घ्यावी.
 4. या तयार ग्रेव्ही मध्ये 750 मिली मिक्स करून 10-15 मिनिटे साठी संथ अग्नीवर उकळू द्यावे.
 5. गरम ग्रेव्ही 1 किलो किंवा 5 किलोच्या प्याक साईझ मध्ये पॅक करावे.
 6. ग्रेव्हीला हॉटेल्स, रेस्टॉरंटस, ढाबे अशा ठिकाणी प्रचंड मागणी आहे.

वाळलेला कांदा / पावडर:

प्रक्रिया:

 1. कांद्याचे सुमारे 5-6 मिलिमीटर जाडीचे काप करावेत.
 2. काप केलेले कांदे ट्रे ड्रायर मध्ये 55 अंश सेल्सिअस तापमानाला 14 तासापर्यंत वाळवावा.
 3. अशा प्रकारे निर्जलीकरण केलेल्या कांद्याला अधिक काळ टिकवता येते.
 4. वाळवलेल्या कांद्याची ग्राईंडरच्या साहाय्याने पावडर करावी.
 5. या पावडरला चाळणीने गाळून हवाबंद पॅकेटस मध्ये पॅक करावे.
 6. कांदा पावडर मुळे शेतकऱ्यांना खूप नफा मिळवणे शक्य होईल.

प्रा. एस. बी. पालवे.
(के. के. वाघ अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक) 
8275452203

onion processing value addition onion gravy onion powder कांदा प्रक्रिया मूल्यवर्धन कांदा ग्रेवी कांदा पावडर
English Summary: Onion Value Addition through processing

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णयCopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.