विविध प्रकारचे खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसाय हे खूप मागणी असणारे व कमी भांडवलात चांगला नफा देणारे व्यवसाय ठरतात. व्यवसायाची सुरुवात करताना मुळातच छोट्या प्रमाणात आणि कमी गुंतवणुकीतून तसेच त्याला बाजारपेठेमध्ये असणारी मागणी कोणत्या पद्धतीचे आहे या गोष्टींचा विचार करून केली तर यश हमखास मिळते. या लेखामध्ये आपण असाच एका व्यवसायविषयी माहिती घेणार आहोत.
बाजारपेठेत कायम मागणी असणारा मसाले बनवण्याचा व्यवसाय
आता मसाले म्हटले म्हणजे प्रत्येक घरातील प्रत्येक स्वयंपाकघर मसाल्याशिवाय अपूर्णच असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपल्या भारताचा विचार केला तर लाखो टन विविध प्रकारचे मसाले यांचे उत्पादन भारतात होते.
आता मसाले तयार करण्याचा विचार केला तर मध्ये खूप काही रॉकेट सायन्स नाही. परंतु मसाले तयार करताना त्याची चव उत्तम ठेवणे खूप गरजेचे आहे. तुम्ही तयार केलेल्या मसाल्याची चवदार सर्वोत्कृष्ट असेल तर तुमचा मसाला हा शंभर टक्के विकला जाणार यात कुठलीही शंका नाही. यासाठी तुम्हाला बाजारपेठेचे जुजबी ज्ञान असणे गरजेचे असून तुमच्या तयार मसाल्याची मार्केटिंग करण्याची पद्धत खूप उपयोगी आहे.
या व्यवसायासाठी लागणारे भांडवल
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या प्रोजेक्ट रिपोर्टचा विचार केला तर आयोगाकडून ब्लू प्रिंट याबाबत तयार करण्यात आली आहे याचा विचार केला तर त्यानुसार मसाला बनवण्याचा एक युनिट स्थापन करण्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च येतो.
या गुंतवणुकीतून तुम्हाला यासाठी आवश्यक तीनशे चौरस फूट जागा साठ हजार रुपये आणि त्यासाठी लागणारी मशिनरी यासाठी 40 हजार रुपये खर्च येतो. या महत्त्वाच्या बाबीनंतर अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी करण्यासाठी देखील खर्च लागतो आणि उत्पादन सुरू होईपर्यंतचा खर्च इत्यादी मिळून उत्पादन सुरू होईपर्यंत अडीच लाख रुपये लागतात.
भांडवल कुठून उभे करायचे?
आता प्रत्येकाकडे व्यवसाय स्थापन करण्यासाठी संपूर्ण पैसा स्वतःचा असेल असे नाही. यासाठी तुम्ही शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून बँकेकडे कर्जासाठी अर्ज करू शकतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर मसाला व्यवसाय साठी पंतप्रधान रोजगार योजनेच्या माध्यमातून देखील कर्जाची सुविधा मिळू शकते. दुसरे म्हणजे पंतप्रधान मुद्रा योजना देखील तुम्हाला मदत करू शकते.
एकंदरीत नफ्याचे गणित
जर आपण खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाचा अहवालाचा विचार केला तर एका वर्षात तुम्ही 193 क्विंटल मसाल्याचे उत्पादन घेऊ शकतात. प्रति क्विंटल मसाल्याचा भावाचा विचार केला तर तो पाच हजार चारशे रुपये पकडला तर एका वर्षात दहा लाख 42 हजार रुपयांची विक्री शक्य आहे.
यामधून एका वर्षाचा खर्च वजा केल्यावर प्रतिवर्ष दोन लाख 56 चार रुपयांपर्यंत नफा मिळणे शक्य आहे. याचाच प्रतिमहिना विचार केला तर वीस ते 21 हजार रुपये नफा मिळू शकतो.
छोट्या टिप्स नफा वाढवण्यासाठी पडतील उपयोगी
1- तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्यासाठी भाड्याची जागा घेणार ऐवजी तुमच्या घरात हा व्यवसाय सुरू केला तर नक्कीच नफ्यात वाढ होते.
2- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही हा उद्योग घरात सुरू केला तर याला एक गृहउद्योगाचे स्वरूप आल्यामुळे त्याचा एकत्रित प्रकल्प खर्च कमी होतो आणि नफा वाढतो.
3- तुमचे उत्पादन कशा पद्धतीने पॅकिंग केले आहे हे खूप महत्वाचे असून यावर वस्तूंची विक्री अवलंबून असते. यासाठी तुम्ही चांगल्या पॅकेजिंग तज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
4- तसेच तुम्ही आजूबाजूचे कुटुंबे आणि दुकाने यामध्ये तुमचा तयार मसाला देऊन त्यांच्याकडून तुमचे उत्पादन किती आणि कसे चांगले आहे याचा फीडबॅक घेणे देखील गरजेचे आहे व त्या फीडबॅक च्या माध्यमातून आवश्यक बदल करणे देखील महत्त्वाचे आहे.
5- तसेच तुम्ही स्वतःची एक वेबसाईट तयार करून त्या वेबसाइटवर तुम्ही तयार केलेल्या मसाल्याच्या संपूर्ण माहिती देऊ शकता वा एखादे सोशल मीडिया पेज ओपन करून तुम्ही तुमच्या उत्पादनाची माहिती लोकांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचवू शकतात.
नक्की वाचा:चक्क नारळाच्या करवंट्यांला बाजारात प्रचंड मागणी का वाढतेय? काय आहे यामागील सत्य
Share your comments