टोमॅटोचा वापर हा यामध्ये मोठ्या प्रमाणावर केल्या जातो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर टोमॅटोचा विचार केला तर त्यामध्ये असणारी अनेक प्रकारचे जीवनसत्वे तसेच कॅल्शियम, फॉस्पेट सारखे पोषक घटक शरीराला खूप महत्त्वपूर्ण आहेत. तसेच टोमॅटोचा वापर हा कोशिंबीर तसेच चटणी, सांबर इत्यादी पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु बऱ्याचदा टोमॅटोच्या दराचा विचार केला तर शेतकरी बंधूंना रस्त्यावर फेकायची वेळ येते. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही.
त्यामुळे शेतकरी बंधूंनी जर टोमॅटो प्रक्रिया करून तयार पदार्थ जर विकले तर नक्कीच त्यांना चांगला नफा मिळू शकतो. टोमॅटो पासून सॉस तसेच केचप, पेस्ट इत्यादी बरेच पदार्थ तयार करता येतात. या लेखामध्ये आपण टोमॅटो पासून केचप कसे तयार करतात व त्याचा शेतकरी बंधूंना होणारा फायदा याबद्दल माहिती घेणार आहोत.
अशाप्रकारे टोमॅटो पासून तयार करा केचप आणि मिळवा चांगला नफा
केचप तयार करण्यासाठी टोमॅटोचा रस तीन किलो तसेच कांदा चाळीस ग्रॅम, लसूण तीन ग्रॅम तसेच लवंग, दालचिनी, जायपत्री, मिरची पूड तसेच काळी मिरी, विलायची प्रत्येकी दोन दोन ग्रॅम, मीठ 30 ग्रॅम, साखर 150 ग्रॅम व 100 एम एल विनेगर वापरावे.
यासाठी प्रथम टोमॅटोचा रस पातेल्यात ओतून त्यामध्ये एकूण साखरेच्या 1/3 साखर टाकावी व सर्व मसाल्याचे पदार्थ जसेच्या तसे मलमल कापडात बांधून त्यांची पुरचुंडी बांधावी. हे बांधलेली पुरचुंडी पातेल्यात रसामध्ये बुडवून तरंगत ठेवावी.
पातेले हे मंद आचेवर ठेवून मूळ रसाच्या तिसऱ्या हिश्यापर्यंत रस आटवावा. रस आटवत असताना पळीने पुरचुंडीला हळुवारपणे अधून मधून सतत दाबत राहावे. यामुळे मसाल्यांचा जो काही अर्क असतो तो रसामध्ये मिसळला जातो व एकजीव होतो.
नक्की वाचा:भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 2022 जळगाव जाणून घ्या कधी, काय आहे खास?
रसामध्ये व्हिनेगर घालून व राहिलेली साखर दोन्ही एकत्र घालून रस पुन्हा मुळ रसाच्या 1/3 आकारमान येईपर्यंत आटवावा व थोडा वेळ तसाच राहू द्यावा. त्यानंतर थंड रिफ्रॅक्टो मीटर च्या साह्याने त्याचा ब्रिक्स मोजल्यास त्याचा 28 अंश सेंटीग्रेड इतका येतो. अशाप्रकारे तयार झालेल्या केचपमध्ये प्रति किलो 300 एम एल ग्रॅम सोडियम बेंजोएट टाकावे व एकजीव करून घ्यावे.
त्याच्या अगोदर निर्जंतुक केलेल्या 500 ग्राम किंवा एक किलो आकाराच्या बाटल्यांमध्ये भरून क्राऊन कॉक मशीनच्या साह्याने झाकून हवा बंद कराव्यात व त्यांना थंड व कोरड्या जागी ठेवावे. अशा साध्या प्रक्रियेने तुम्ही टोमॅटोपासून केचप तयार करून ते विकून चांगला नफा मिळू शकतात.
Share your comments