बरेचसे व्यवसाय आहेत कि, त्यांच्यामध्ये कच्चामाल म्हणून शेतीतून उत्पादित होणाऱ्या मालाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तसे पाहायला गेले तर शेतीशी संबंधित असणारे व्यवसायांमध्ये शेतकरी बंधू लवकर स्थिरस्थावर होऊ शकतात. या लेखामध्ये आपण अशाच एका महत्त्वपूर्ण आणि शेतीशी संबंधित असलेल्या व्यवसायाची माहिती घेणार आहोत. ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो व आर्थिक प्राप्ती होऊ शकते.
बटाट्याशी संबंधित व्यवसाय
बटाटा शेतामध्ये उत्पादित होतो व त्यापासून आपल्याला माहित आहेच की, विविध प्रकारच्या भाज्या, बटाट्यापासून चिप्स, बटाटा पकोडे इत्यादी मोठ्या प्रमाणात बनवले जातात.
परंतु बटाट्यापासून बिस्किट बनते, जरा ऐकायला देखील अवघड आहे. परंतु हे खरे आहे. चला तर मग आपण पाहू बटाट्यापासून बिस्किट कसे बनवतात व त्याची विक्रीतून कशा पद्धतीने लाखोंची उलाढाल करता येईल.
बटाट्यापासून बिस्किट बनवण्याचा व्यवसाय
आपण काही तज्ञांचा मताचा विचार केला तर बटाट्यापासून बिस्किट बनवण्याचा व्यवसाय हा अतिशय सोपा असून या माध्यमातून चांगला नफा मिळवता येणे शक्य आहे.
यासाठी तुम्हाला यंत्राची आवश्यकता भासेल व याची किंमत देखील खूप जास्त आहे. परंतु आपण या लेखाच्या माध्यमातून माहिती घेऊ की तुम्ही कोणत्याही यंत्राच्या मदतीशिवाय बटाट्यापासून बिस्किट बनवण्याचा व्यवसाय कसा सुरु करु शकतात.
नक्की वाचा:Bussiness Idea: शेतीवर आधारित 'हा' उद्योग उभारा आणि कमवा प्रचंड नफा,व्हा उद्योजक..!
अशा पद्धतीने बनवा बटाट्यापासून बिस्कीट
1- लागणारे साहित्य-बटाटा,बेकिंग पावडर,दाणेदार साखर, बारीक मीठ, बेकिंग सोडा, तेल, बडिशोप, बारीक पीठ आणि पॅकिंग करण्यासाठी लागणारे साहित्य इत्यादी.
बनवण्याची प्रक्रिया
1- यासाठी सर्वप्रथम उकडलेले बटाटे चांगले मॅश करणे गरजेचे आहे.
2- त्यानंतर त्यामध्ये मैदा घालावा. तयार झालेल्या या मिश्रणामध्ये थोडी बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ आणि शेवटी साखर घालावी.
3- त्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये किंवा कढई असेल तर उत्तमच. यामध्ये थोडं तेल गरम करावे.
4- वर सांगितलेले मिश्रणाचे गोळे बनवून ते चांगले लाटून घ्यावी व गोल झाकणाच्या मदतीने त्याच्या सारख्या आकाराचे तुकडे करावेत.
5- नंतर एखाद्या काठीच्या सहाय्याने त्यात समान अंतरावर काही छिद्र करावे व नंतर गरम तेलात तळून घ्यावे.
6- तळल्यानंतर तुमची बिस्किटे बाजारात विक्रीसाठी तयार होतात.
बिस्किटांची पॅकिंग
पूर्णपणे तयार केलेली बिस्किटे दर्जेदार व उत्तम प्रतीच्या पॅकेजिंग म्हणजेच पॅकेटमध्ये पॅक करावी. पॅकेजिंग साहित्याचा वापर करताना ते दर्जेदार असावे कारण तुमची आकर्षक पॅकिंगवर तुमची विक्री ठरत असते.
बिस्किटे तयार झाल्यानंतर त्याला एका कागदाच्या पॅकेटमध्ये व्यवस्थित ठेवा व त्यानंतर लहान पॅकेट मोठ्या बॉक्समध्ये पॅक करा आणि घाऊक विक्रेत्यांकडे विक्रीसाठी पाठवा. 100 ग्रॅम बटाट्याचे बिस्किटांच्या पॅकेट ची किंमत बाजारात 50 रुपये आहे म्हणून तुम्ही या माध्यमातून चांगली कमाई करू शकता हे निश्चित.
नक्की वाचा:नका घेऊ टेंशन!कांद्यावर 'ही' प्रक्रिया केली ना तर कमवाल बक्कळ नफा,वाचा सविस्तर माहिती
Share your comments