1. कृषी व्यवसाय

स्वयंरोजगाराची संधी! केळीवर करा विविध प्रक्रिया आणि बनवा विविध प्रकारचे पदार्थ

केळी पासून अनेक टिकाऊ पदार्थ व लगेच खाण्याचे पदार्थ तयार होऊ शकतात.विशेषत: ज्या वेळेस केळीला जास्त उत्पन्न यामुळे जास्त भाव मिळत नाही त्यावेळेस असे पदार्थ बनवून जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळवता येतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
banana crop

banana crop

 केळी पासून अनेक टिकाऊ पदार्थ व लगेच खाण्याचे पदार्थ तयार होऊ शकतात.विशेषत: ज्या वेळेस केळीला जास्त उत्पन्न यामुळे जास्त भाव मिळत नाही त्यावेळेस असे पदार्थ बनवून जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळवता येतो.

त्यामुळे केळीचे विविध पदार्थ बनवून जास्त आर्थिक फायदा मिळवता येतो.त्यामुळेच केळीचे विविध पदार्थ तयार करण्यास चांगला वाव आहे.

  • केळीचे पीठ :-
  • कच्च्या केळीची साल काढून बारीक काप करावेत.
  • केळीची साल काढल्यानंतर केळी थोडीशी काळी पडतात. याकरिता सर्व अवजारे स्टेनलेस स्टीलची वापरावीत
  • कापलेले काप पोटॅशिअम मेटाबाय सल्फाइड च्या द्रावणात बुडवून उन्हात वाळवून घ्यावेत.
  • वाढलेले कापसामध्ये किंवा ग्राइंडर मध्ये दळून त्याचे पीठ करावे.
  • कच्चा केळी मध्ये स्टार्चचे प्रमाण 70 ते 80 टक्के असते.त्यामुळे विविध पदार्थ त्याचा फिलर म्हणून उपयोग करता येतो. त्याचप्रमाणे उपवासाचे पदार्थ उदा. शेव, चकली, गुलाबजामून इत्यादी पदार्थ तयार करता येतात.

ज्यूस :-

  • पूर्ण पिकलेली केळी पाण्याने स्वच्छ धुऊन त्यावरील साल काढून टाकावी
  • स्क्रू टाइप पल्परच्या साह्याने केळी चा पल्प काढावा.त्यात 100 पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाईट व 0.2 टक्के पेक्टीनेनएन्झाईम मिसळून हे मिश्रण चार तासापर्यंत 30 अंश सेल्सिअस तापमानाला ठेवावे हे मिश्रणसॉट्रीफ्युज मशीन मध्ये चांगले मिसळून त्यातील घनपदार्थ काढून घ्यावेत म्हणजे खाली शुद्ध रस राहील.
  • 15 टक्के साखर आणि 2 टक्केऍसेटिक ऍसिड मिसळावे.
  • रसपाचराईस करण्याकरिता 30 मिनिटापर्यंत 80 अंश सेल्सिअस तापमानाला तापवावा राज खंडा करून निर्जंतुक बाटलीत भर 
  • केळीची बिस्किटे :-

 केळीच्या पिठात ते30 - 40% मैदा, 15टक्के साखर , 5 टक्के वनस्पती तूप 5 टक्के तूप , 5 टक्के दूध पावडर 100 ग्रॅम साठी 2 टक्के, दोन ग्रॅम बेकिंग पावडर,इन्सेस गरजेप्रमाणे मिसळून योग्य प्रमाणात पाणी टाकून त्याचा लगदा तयार करावा.

  • तयार झालेल्या लगदा बिस्किटांच्या साच्यामध्ये टाकून ओहन मध्ये 170 ते 190 अंश सेल्सियस तापमानाला 30 मिनिटे ठेवावीत.
  • साच्यातील बिस्कीटे काढून थंड करावेत आणि प्लास्टिकची पिशवी किंवा काचेच्या बाटलीत साठवावेत.
  • व्हीनेगर :-
  • टाकाऊ पिकलेल्या केळी पासून विनेगर व्हिनेगर तयार करता येते.
  • केळीच्या गरामध्ये मध्ये 16 टक्के साखर व 2 टक्के स्टार्च असते.गरामध्ये पाणी व 10 टक्के साखर मिसळून लापशी तयार करावी.
  • त्यात दोन ग्राम सायक्रोमायसिस सर्वेशया ईस्ट मिसळावे. 48 तासानंतर 30 अंश  सेल्सिअस तापमानाला हि लापशी मसलीन कापडातून गाळून घ्यावे. त्यात दोन टक्के अल्कोहोलिस रस मिसळावा. दोन आठवडा ते मिश्रण तसेच ठेवावे. दोन आठवड्यात केळीपासून पदार्थ व्हिनेगर तयार होतो.( स्त्रोत-चावडी. कॉम )
English Summary: make various product from banana procesing that good employment oopurtunity Published on: 01 March 2022, 08:32 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters