ज्वारी आपल्याला सर्वांना माहिती आहे. ज्वारीच्या भाकरी चा उपयोग प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रात केला जातो. परंतु आता मागील काही वर्षांपासून ज्वारीच्या लागवड क्षेत्रात देखील घट झालेली पाहायला मिळत आहे व आहारातून देखील ज्वारीचा वापर कमीत कमी होत आहे.
ज्वारी तसे पाहायला गेले तर आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. या बहुउपयोगी ज्वारीवर प्रक्रिया करून विविध प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. याचा एक युनिट स्थापन करून एक चांगला प्रक्रिया उद्योग यामध्ये उभा करता येऊ शकतो व या माध्यमातून चांगला नफा देखील मिळवता येणे शक्य आहे. या लेखामध्ये आपण काही ज्वारीवर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या पदार्थांची माहिती करू.
ज्वारीवर प्रक्रिया युक्त पदार्थ
1- हुरडा- ज्वारीची पेरणी केल्यानंतर 90 ते 95 दिवसांनी दुधाळ अवस्थेत हुरडा तयार होतो. जर खरीप हंगामामध्ये वाणी, अकोला अश्विनी तर रब्बी हंगामामध्ये गुळभेंडी, सुरती या स्थानिक वानांचा हुरड्या साठी वापर करता येतो. राहुरी कृषी विद्यापीठाने उत्तरा हे वान हुरड्यासाठी प्रसारित केले आहे. या वाणाच्या कणसातील दाणे सहज बाहेर पडतात. एका कणसापासून 70 ते 90 ग्रॅम गोड हुरडा सरासरी मिळतो. तसेच या ताटाच्या पानांची ताटे गोड असल्याने जनावरे कडबा चवीने खातात.
2- ज्वारीचा रवा- ज्वारीच्या दाण्यांना पॉलिश केल्यानंतर त्यापासून विविध ब्रेडचा रवा तयार करतात. ज्वारीला पॉलिश किंवा परलिंग केल्याने कोंडा मधील कडवट घटक पदार्थ निघून जातात. अशाप्रकारे तयार करण्यात आलेल्या रव्याचे प्रत आणि चव उत्कृष्ट असते. यापासून उपमा, डोसा, इडली, शेवया, शिरा इत्यादी पदार्थ बनवता येतात. ज्वारीपासून तयार केलेल्या जाड रव्याची साठवणक्षमता प्लास्टिकच्या बॅगमध्ये सर्व साधारण पंचेचाळीस दिवस तर बारीक रव्याचे 30 दिवसांपर्यंत आहे.
3- ज्वारीपासून मिश्र आट्याची निर्मिती- राष्ट्रीय ज्वारी संशोधन संचालनालय, हैदराबाद यांच्यामार्फत 50 ते 60 टक्के ज्वारी, गहू, तांदूळ, मका, रागी, बाजरी व सोयाबीन यांचा समावेश करून मिश्र आट्याची निर्मिती झाली आहे. त्यापासून उत्कृष्ट प्रतीची व चवीची भाकरी / धपाटे तयार करता येतात. तसेच प्रथिनांचे उपलब्धता वाढल्यामुळे पौष्टिकता सुद्धा वाढवली जाते.
4- ज्वारीची बिस्कीटे- ज्वारीच्या माल्ट पिठात नाचणी, सोयाबीनचे माल्ट पीठ, मिल्क पावडर घालून साखर विरहित क्रीम सोबत, प्रथिन युक्त, उच्च तंतुमय आणि कमी कॅलरीज असणारे उत्तम प्रतीची बिस्किट या देखील तयार करता येतात.
5- ज्वारीचे पोहे- ज्वारीच्या धान्यावर जाडसर थर मशीनने काढून टाकून कुकरमध्ये उकडून घेताना त्यात थोडाससायट्रिक आम्ल आणि मीठ घालतात. उकडल्यानंतर बाहेर काढून ते दाणे पोह्याच्या मशिनने चपटे करावेत. ड्रायरने चांगला कुरकुरीतपणा येईपर्यंत सुकवावेतअसे तयार पोहे पॅकिंग करून विकावे.
6- ज्वारीचा उकडा रवा- उघडा रवा तयार करण्यासाठी ज्वारी ऑटोक्लेवमध्ये उच्च दाबाखाली शिजवले जाते. नंतर ते सुकवून जाडसर दडली जाते. चाळुन रवा वेगळा करावा. हा रवा हवाबंद पॅक करून जास्त काळ टिकवता येतो त्यापासून उत्तप्पा, डोसा आणि इडली बनवता येते.
7- मद्यार्क निर्मिती- काळ्या, खाण्यास अयोग्य अशा ज्वारीपासून आधुनिक तंत्राने मशिनच्या साह्याने उर्ध्वपातन पद्धतीने मद्यार्क निर्मिती करता येते. तसेच गोड ज्वारीपासून देखील मद्यार्क निर्मिती करता येते.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचाआता मिळणार मोफत गॅस कनेक्शन; आजच घ्या लाभ, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
Share your comments