1. बातम्या

पाच वर्षात नव्हे एवढा भाव! घरातील अत्यावश्यक जिऱ्याचे भाव गगनाला, ही आहेत त्यामागील प्रमुख कारणे

जिरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. स्वयंपाकघरातील हा अत्यावश्यक महत्त्वाचा पदार्थ असून स्वयंपाकात त्याचा वापर केला जातो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.परंतु आता या अत्यावश्यक असलेल्या जिऱ्याने सर्वसामान्यांना घाम फोडला आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
market rate highly growth to cumin seeds due to decrease production

market rate highly growth to cumin seeds due to decrease production

जिरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. स्वयंपाकघरातील हा अत्यावश्यक महत्त्वाचा पदार्थ असून स्वयंपाकात त्याचा वापर केला जातो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे.परंतु आता या अत्यावश्यक असलेल्या जिऱ्याने सर्वसामान्यांना घाम फोडला आहे.

. गेल्या पाच वर्षात नवे इतक्या उच्चांकी पातळीवर सध्या जिऱ्याचे भाव आहेत. काळीमिरी नंतर  संपूर्ण जगात दुसरे लोकप्रियमसाल्याचा पदार्थ आहे. जगातील एकूण उत्पादनापैकी 70 टक्के उत्पादन भारतात होते. परंतु या वर्षी बऱ्याच कारणांमुळे जिऱ्याच्या उत्पादनात घट आली आहे. यामध्ये अवकाळी पाऊस तसेच घटलेले एकूण लागवड क्षेत्र ही प्रमुख कारणे सांगता येतील. यामुळे जवळजवळ 35 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक घट जिरे उत्पादनात आली आहे. भारतामधील ऊंझा बाजारात मार्चमध्ये जिऱ्याचे आवक 60 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. एका महिन्याचा विचार केला तर जिऱ्याच्या किमतींमध्ये 20 टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे. मार्चमध्ये 175 ते 180 रुपये किलो असलेले जिरे या महिन्यात चक्क 215 ते 220 रुपये किलोवर पोहोचले आहे. क्रिसील रिसर्चचे संचालक पुशन शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, जिऱ्याचे एकरी उत्पादन वार्षिक आधारावर सुमारे 20 टक्क्यांनी घटले आहे. जर भारतात विचार केला तर गुजरात आणि राजस्थान ही दोन प्रमुख राज्य जिरे उत्पादक असून गुजरात मध्ये 20 टक्के तर राजस्थानमध्ये 15 टक्के पिकांचे नुकसान झाल्यामुळे यंदा उत्पादनात 35 टक्के घट आली असून ते 5,580 टनावर  आले आहेत.

जिऱ्याचे उपयोग

 याच्या वापरामुळे शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या रूपाने अनेक लोक याच्या सेवन करतात. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास सोबतच वजन कमी करणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा हे लाभदायी ठरू शकते. लठ्ठपणा, हृदय विकार तसेच डायबिटीस इत्यादी आजार देखील याचा फायदा होतो. बऱ्याच वर्षांपासून जिऱ्याचा उपयोग पचनक्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी देखील केला जात आहे. जिऱ्यामध्ये क्षारीय गुण आढळून येत असल्याने पोट फुगल्या नंतर किंवा इतर समस्या च्या वेळी आद्रक अजवाइनच्या बिया, अजवाइनचे फुल आणि बडीशेप चा उपयोग जिऱ्यासोबत केला जातो. तसेच याच्या सेवनाने शरीराला तनावाशी लढण्यासाठी मोठी मदत होते.एका अभ्यासानुसार स्पष्ट झाले आहे की,जिरे स्ट्रेस कमी करू शकतात.जिऱ्याचा अर्काचे सेवन केले असता ताण कमी होतो.

तसेच जुलाब आणि पोटदुखी सारख्या समस्यांमध्ये ही गुणकारी ठरते. हाडे आणि सांधेदुखीचा त्रास पासून दिलासा मिळतो. एनिमीया यापासून बचाव करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Drone : ड्रोन खरेदी आता होणार सोपी; सरकारकडून मिळणार भरघोस अनुदान

नक्की वाचा:खंडपीठात सुनावणी:हंगामाच्या शेवटी 40 टक्के ऊस शिल्लक, केंद्र आणि राज्य सरकारला शपथपत्र दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

नक्की वाचा:Farmers Income : भारतीय शेतकरी शेतीतुन किती कमवतो? नाही माहिती; मग वाचा याविषयी सविस्तर

English Summary: market rate highly growth to cumin seeds due to decrease production Published on: 04 May 2022, 11:08 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters