Poultry Farming: देशातील शेतकरी पारंपरिक शेतीला बाजूला करत आधुनिक शेतीवर (Modern agriculture) अधिक भर देत आहेत. त्यामुळे खर्च कमी आणि नफा अधिक मिळत आहे. तसेच शेतकरी (Farmers) शेतीबरोबर शेतीव्यवसाय (Farming Buisness Idea) करत आहेत. या शेतीव्यवसायामुळे त्यांना अधिक पैसे कमवण्याचा मार्ग सापडला आहे. असे काही शेती व्यवसाय (Agricultural business) आहेत ते करून शेतकरी लखपती बनू शकतात.
तुम्ही कधी विचार केला आहे का की 6 ते 7 रुपयांना विकली जाणारी अंडी 50 ते 60 रुपयांना विकून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. अंडी उबवण्याने हे करणे शक्य आहे. अंडी उबवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रथम हॅचरीची व्यवस्था करावी लागते. शेतकरी बाजारातून हॅचरी देखील खरेदी करू शकतो. मात्र यासाठी त्याला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. अशा परिस्थितीत शेतकरी इनक्यूबेटर किंवा आईस बॉक्स वापरून घरच्या घरी हॅचरी बनवू शकतात.
हॅचरी तयार करण्यासाठी या गोष्टी आवश्यक
हॅचरी (Hatchery) बनवण्यासाठी तुम्हाला इनक्यूबेटर, पोल्ट्री इनक्यूबेटर कंट्रोलर, सेटर, हॅचर, कॉम्प्रेस्ड एअर सिस्टम, आपत्कालीन स्टँडबाय इलेक्ट्रिक प्लांट सेटर आवश्यक आहे. हे सर्व साहित्य बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे त्यांनी हे सर्व साहित्य खरेदी करून घरच्याघरी हॅचरी बनवू शकतात.
या गोष्टी लक्षात ठेवा
हॅचरी बांधताना, त्याचे तापमान, आर्द्रता, वायू वातावरण आणि अंडी फिरवण्याकडे लक्ष द्या. इनक्यूबेटरमध्ये समान तापमान ठेवा. यासाठी 37.2 ° C ते 37.8 ° C सर्वोत्तम अनुकूल आहे. कमी तापमानामुळे अंडी उबवण्याच्या प्रक्रियेस विलंब होतो. इनक्यूबेटरमध्ये कुठेतरी ओलावा राहिल्यास ते अंडी खराब करू शकते.
तज्ञ काय म्हणतात
पशुधन शास्त्रज्ञ आनंद सिंह म्हणतात की शेतकरी 1200 मध्ये घरी बसून हॅचरी बनवू शकतात. हॅचरीत अंडी उबवण्याच्या प्रक्रियेला 20 ते 25 दिवस लागतात. मग ही अंडी बाजारात 40 ते 50 रुपयांना विकली जातात. या अंड्यांतून पिल्लेही बाहेर येतात. ही पिल्ले तुम्ही बाजारात चांगल्या किमतीत विकू शकता. याशिवाय पोल्ट्री व्यवसाय करून शेतकरी कमी खर्चात चौपट नफा मिळवू शकतात.
PM kisan: पीएम किसान लाभार्थ्यांना अलर्ट! यामुळे खात्यात जमा होणार नाही १२वा हफ्ता
हॅचरीचा आकार किती असेल
जर आपण हॅचरीच्या आकाराबद्दल बोललो, तर त्याचा आकार जितका मोठा असेल तितकी जास्त अंडी तयार होतील आणि शेतकऱ्यांना बंपर नफाही मिळेल. एकदा व्यवसाय सुरु झाल्यानंतर, हॅचरी प्रक्रियेचा अवलंब करून तुम्ही दरमहा लाखो रुपये कमवू शकता.
महत्वाच्या बातम्या:
वरुणराजाचा कहर! मुसळधार पावसाने पिके पाण्याखाली, भाताशेतीबरोबर भाजीपाला पिके सडण्याचा धोका
Flower farming: लखपती होण्याची सुवर्णसंधी! पावसाळ्यात या फुलांची लागवड केली तर व्हाल मालामाल; जाणून घ्या...
Share your comments