शेतकरी आपल्या शेतीमध्ये नवनवीन पिके घेऊन चांगले उत्पादन मिळवत असतात. आज आपण अशाच एका शेतीविषयी जाणून घेणार आहोत, ज्यामधून शेतकऱ्यांची चांगली कमाई (farmers income) होईल.
सर्वात महत्वाचे म्हणजे तुती लागवड (Mulberry Cultivation) आणि उत्पादन यामध्ये तुतीची रोपवाटिका (Mulberry Nursery) ही सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. महाराष्ट्रात एकूण १४,९०५ एकर तुती लागवड झाली आहे.
यामध्ये मराठवाड्यामध्ये मार्च २०२२ पर्यंत ८,९०५ एकर तुती लागवड आणि २,०७८ मे. टन कोष उत्पादन झाले आहे. तुतीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीमध्ये येत्या काळात तुती रोपांची मागणी वाढत राहणार आहे. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा रोपवाटिकेचे योग्य नियोजन शेतकऱ्यांनी केले पाहिजे. याविषयी आज आपण माहिती जाणून घेऊया.
दिलासादायक! पहिल्या टप्प्यात 37 हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ
तुती रोपवाटिका कालावधी
जय शेतकऱ्यांना जून ते सप्टेंबर या दरम्यान तुतीची लागवड करायची आहे, अशा शेतकऱ्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत रोपवाटिकेचे नियोजन करा. तर ज्यांना डिसेंबर ते जानेवारीमध्ये लागवड (cultivation) करायची आहे, त्या शेतकऱ्यांनी सप्टेंबर महिन्यात रोपवाटिकेचे नियोजन करणे फायद्याचे ठरेल.
रोपवाटिकेसाठी गादी वाफे करणे
सपाट व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करा. दोन ते तीन वेळा जमिनीची नांगरट करून शेतातील ढेकळे फोडून काडी कचरा स्वच्छ करून बेड करा. गादी वाफे करताना दोन भाग मातीमध्ये मुरलेले शेणखत मिसळा. गादी वाफे ८२ फूट लांब व ४ फूट रुंद आकाराचे ४ बेड करा.
३ ते ४ महिने वयाची रोपे आवश्यक असल्यास दोन रोपात १० सेंमी व दोन ओळींत २० सेंमी अंतर ठेवा. प्रत्येक बेड भोवती १.५ फूट रुंद पाण्यासाठी सरी करून घ्या. एक एकर तुती लागवड पट्टा पद्धतीने ५ × ३ × २ फूट अंतरावर करण्यासाठी ५,५५५ रोपे लागतात.
Horoscope: येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
बेणे निवड व लागवड
बागायतीसाठी 'व्ही-१' व कोरडवाहूसाठी 'एस-१३' या तुती वाणाचे बेणे निवडावे. बेणे निवडीसाठी तुतीचे वय ७ ते ८ महिने आणि बेण्याची जाडी पेन्सिल आकाराची असावी. शेंड्याकडील कोवळ्या हिरव्या कांड्या बेण्यासाठी वापरू नये. ३ ते ४ डोळे असलेले करड्या रंगाचे बेणे निवडा.
तुती रोप काढणी व लागवड
1) गादी वाफ्यावर बेणे लावल्यापासून ३ महिन्यांत रोपांची वाढ ३ फूट होते.
2) तयार झालेली रोपे लागवडीसाठी बेडवरून काढण्याआधी १ ते २ दिवस बेडला पाणी द्या. त्यामुळे रोपे काढताना रोपाच्या मुळास इजा होत नाही.
3) रोपांची वाहतूक करायची झाल्यास सकाळी किंवा सायंकाळी करा.
4) जमीन नांगरणी करून शेणखत टाकून पट्टा पद्धतीने ५ × ३ × २ फूट किंवा ६ × ३ × २ फूट अंतरावर लागवड करा.
5) बेणे लागवड करण्यापेक्षा रोपे लावावीत. १०० टक्के रोपे जगतील.
महत्वाच्या बातम्या
मोदी सरकारने आखला मोठा प्लॅन! बी-बियाणे, खते व माती परीक्षणाची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध
धक्कादायक! पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्याकडे पैशांची मागणी
पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; हरभरा आणि गहू बियाणे अनुदानावर मिळणार
Share your comments