अनेक शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय करून चांगले पैसे कमवत असतात. शेतीव्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असला तरी त्यासोबत अनेक व्यवसाय ग्रामीण भागात केले जातात. पशुपालन देखील मोठ्या प्रमाणावर चालणार व्यवसाय आहे. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांना उपयोगी असणाऱ्या व्यवसायाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
आज आपण शेतकऱ्यांसाठी उपयोगी असणाऱ्या व्यवसायाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. शेतीशी संबंधित आणि ग्रामीण भागात चांगले आर्थिक उत्पन्न देऊ शकतील असे व्यवसाय खालीलप्रमाणे...
परतीच्या पावसाचा सुळसुळाट! सोयाबीन, कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान; शेतकरी चिंतेत
1) माती परीक्षण प्रयोगशाळा
ग्रामीण भागात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. विशेषता शेती हा मोठ्या प्रमाणावर चालणारा व्यवसाय आहे. जर आपण शेती संबंधी विचार केला तर माती परीक्षण ही काळाची गरज आहे. चांगल्या उत्पादनासाठी बरेच शेतकरी माती परीक्षण करू लागले आहेत. त्यामुळे भविष्यात याला जास्त मागणी असेल.
त्यामुळे तरुण पिढी किंवा शेतकरी हा व्यवसाय (Business) उभा करून चांगले पैसे कमवू शकतात. माती प्रयोगशाळा अर्थात मृदा प्रयोगशाळा स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना खूप मोठी सोय होईल आणि व्यवसाय देखील चांगला चालेल. या व्यवसायासाठी तुम्हाला सरकारकडून देखील मदत होऊ शकते. अधिक माहितीसाठी तुम्ही कृषी विभागाशी संपर्क साधू शकता.
दिलासादायक! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 132 कोटींचा निधी
2) पशुखाद्य व्यवसाय किंवा उत्पादन
महत्वाचे म्हणजे ग्रामीण भागात ज्या प्रमाणात शेती केली जाते त्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो. जनावरांपासून अधिक दूध उत्पादनासाठी आहार व्यवस्थापन गरजेचे असल्यामुळे अनेक प्रकारच्या पशुखाद्याचे आवश्यकता भासते. त्यामुळे ही गरज ओळखून तुम्ही ग्रामीण भागात पशुखाद्य उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला तर कमी गुंतवणुकीतून हा चांगला व्यवसाय होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या
पावसाचा धुमाकूळ; पालघर जिल्ह्यातील तब्बल 75 हजार हेक्टर शेती संकटात, शेतकरी चिंतेत
आनंदाची बातमी! 50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाच्या याद्या जाहीर; 'या' दिवशी रक्कम जमा होणार
आजचा दिवस वाया घालवू नका, संधीचं सोनं करा; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
Share your comments