1. कृषी व्यवसाय

इकोदीप निर्मिती उद्योगामुळे महिलांना मिळणार रोजगार,

इकोदीप निर्मिती म्हणजेच देशी गाईच्या शेणापासून पणत्या निर्मिती हा प्रकल्प सध्या महाराष्ट्रभरात विविध जिल्ह्यांमध्ये यशस्वीरित्या सुरू आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील कित्येक महिलांना रोजगार मिळाल्याने धेनू कंपनीचा हा खूप महत्वकांक्षी प्रकल्प ठरला आहे. इकोदीप निर्मिती उद्योग आपण कमीत कमी भांडवलात सुरू करू शकतो.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Ekodeep manufacturing industry

Ekodeep manufacturing industry

इकोदीप निर्मिती म्हणजेच देशी गाईच्या शेणापासून पणत्या निर्मिती हा प्रकल्प सध्या महाराष्ट्रभरात विविध जिल्ह्यांमध्ये यशस्वीरित्या सुरू आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील कित्येक महिलांना रोजगार मिळाल्याने धेनू कंपनीचा हा खूप महत्वकांक्षी प्रकल्प ठरला आहे. इकोदीप निर्मिती उद्योग आपण कमीत कमी भांडवलात सुरू करू शकतो.

या उद्योगासाठी लागणारा कच्चामाल, प्रशिक्षण, मशिनरी धेनू कंपनीकडून पुरवली जाते. या प्रकल्पासाठी महिला बचत गट, शेतकरी, महिला पशुपालक, सहभागी होऊ शकतात. इकोदीप निर्मिती उद्योगामुळे महाराष्ट्रातील शेतकरी व महिलांना झालेला फायदा लक्षात घेता मध्यप्रदेशातील महिलांनाही त्याचा फायदा घेता यावा या उद्देशाने लवकरच इकोदीप निर्मिती उद्योग मध्यप्रदेशात सुरू करण्यात येणार आहे.

धेनू कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी श्री. नितीन पिसाळ यांनी मुरेना येथे आयोजित तीन दिवसीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसमवेत आयोजित केलेल्या हितगुज कार्यक्रमात सांगितले. ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला काम मिळावे व छोट्या-मोठ्या उद्योगाच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने धेनू टेक सोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने इकोदीप निर्मिती उद्योग सुरू केला आहे.

जळगाव दूध संघाच्या चेअरमनपदी निवड झाल्यानंतर मंगेश चव्हाणांनी केलं 'हे' काम, एकनाथ खडसे याचा फोटो..

इकोदीप निर्मिती उद्योगाची ठळक वैशिष्ट्ये-
• पर्यावरणपूरक व प्रदूषण विरहित उत्पादन.
• कमीत कमी भांडवलात सुरू करण्याजोगा व्यवसाय.
• घरबसल्या दररोज पाचशे ते हजार रुपये मिळवण्याची संधी.
• इकोदीप निर्मिती उद्योगासाठी वयाची व शिक्षणाची अट नाही.

इकोदीप वापराचे फायदे-
• इकोदीप हा मजबूत आणि टिकाऊ आहे.
• इकोदीप वजनाने हलका असल्याने तो पाण्यावरही तरंगतो.
• इकोदीप जाळल्याने आजूबाजूचे वातावरण प्रफुल्लित होते.

विहिरीसाठी 4 लाख फिक्स! मान्यतेसाठी 'बीडीओ' ना अधिकार, ग्रामसभेत मंजुरी देणे बंधनकारक

• इकोदीपच्या वापरानंतर तुळशीला, कुंड्यांना खत म्हणूनही वापर करता येतो.
• इकोदीपचा वापर दिवाळी, दसरा, होळी, वाढदिवस व लग्न समारंभासाठी करता येतो.
• इकोदीपच्या पॅकिंगचा उपयोग मंदिरामध्ये नैवेद्य ठेवण्यासाठी करता येतो.

इकोदीप निर्मिती उद्योगाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क - 9130233557
नितीन रा. पिसाळ

महत्वाच्या बातम्या;
वन्यप्राण्यांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी केला जुगाड! शेतकरी ठरले शास्त्रज्ञांवर भारी
'शेतकरी कर्जाच्या ओझ्याने कोलमडला आहे, दररोज तीन आत्महत्या होत आहेत, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा'
ड्रोन विकत घेण्यासाठी सरकार 4 लाख रुपये देणार, शेती करणे होणार सोपे

English Summary: Ekodeep manufacturing industry will provide employment to women. Published on: 20 December 2022, 12:07 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters