कृषी क्षेत्राचा जर व्याप्ती पाहिली तर ती खूप मोठी असल्याकारणाने अनेक उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी यामध्ये संधी आहे. शेतीक्षेत्रातील उत्पादित मालाशी संबंधित देखील अनेक प्रकारचे प्रक्रिया उद्योग आपल्याला उभारता येतात. असाच एक चांगला नफा देणारा व्यवसाय शेतकरी बंधू उभारू शकतात.
कारण आपल्याला माहित आहेच की शेतामध्ये पिकणाऱ्या भाजीपाला आणि फळे हे नाशवंत असल्यामुळे त्यांची साठवण्याची सुविधा असणे खूप गरजेचे असल्याने कोल्ड स्टोरेज त्याच्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. त्यामुळेच कोल्ड स्टोरेजचा व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतो. या लेखात या व्यवसाय विषयी माहिती घेऊ.
कोल्ड स्टोरेज'चा व्यवसाय
जर तुम्हाला हा व्यवसाय चालू करायचा असेल तर यासाठी तुम्हाला तुमच्या परिसरात असणाऱ्या बाजारपेठेचा चांगला अभ्यास करून घेणे खूप गरजेचे आहे.त्यासोबतच तुम्ही राहत असलेल्या दहा ते पंधरा किलोमीटर पट्ट्यात कुठल्या प्रकारच्या फळांची व भाजीपाल्याचे उत्पादन होते तसेच दुग्ध व्यवसाय किती प्रमाणात आहे.
सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांना परतफेडीची ऐपत नसतानाही १ हजार २३ कोटी रुपयांचे कर्ज...
किंवा एखाद्या मत्स्य किंवा चिकन किंवा मटण मार्केट इत्यादी गोष्टींकडे खूप काळजीपूर्वक लक्ष देऊन अभ्यासणे गरजेचे आहे. तसे पाहायला गेले तर कोल्ड स्टोरेजचा प्रामुख्याने उपयोग हा भाजीपाला व फळे तसेच इतर गोष्टी चांगल्या पद्धतीने साठवता याव्यात व त्यात बऱ्याच दिवसापर्यंत टिकाव्यात यासाठी होतो.
सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांना परतफेडीची ऐपत नसतानाही १ हजार २३ कोटी रुपयांचे कर्ज...
बऱ्याचदा एखाद्या शेतमालाचे एकाच वेळी जास्त उत्पादन निघते व बाजारपेठेत भाव पडतात. परंतु कोल्ड स्टोअरेज असेल तर यामध्ये वस्तू साठवून ती टिकवून ठेवणे सोपे जाते त्यामुळे कोल्ड स्टोरेज हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो.
सरकारच्या ‘या’ निर्णयाने शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही, किसान सभेने थेट कारण सांगितले..
शूरवीर' म्हैसला तोडच नाही! वय 4 वर्षे, उंची 5.5 फूट आणि किंमत 15 कोटी, देशभरात प्रसिद्ध
मिल्कोमीटर प्रत्येक दूध संकलन केंद्रावर असणे बंधनकारक करणार, शेतकऱ्यांना होणार फायदा..
Share your comments