1. कृषी व्यवसाय

मसाले, औषधे आणि चहामध्ये वापरल्या जाणार्‍या 'या' पिकाची लागवड करा आणि व्हा करोडपती

तुम्हालाही शेतीतून चांगले पैसे मिळवायचे असतील तर आज आपण अशाच एका शेतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ज्यातून तुम्ही घरबसल्या बंपर कमवू शकता. यासाठी तुम्हाला बाजारात कुठेही भटकण्याची गरज नाही.

रूपाली उत्तम कदम
रूपाली उत्तम कदम
Cultivate crop

Cultivate crop

तुम्हालाही शेतीतून (agriculture) चांगले पैसे मिळवायचे असतील तर आज आपण अशाच एका शेतीविषयी (farming) माहिती जाणून घेणार आहोत. ज्यातून तुम्ही घरबसल्या बंपर कमवू शकता. यासाठी तुम्हाला बाजारात कुठेही भटकण्याची गरज नाही.

अनेक सुशिक्षित लोक शेतीकडे वळत आहेत आणि लाखो रुपये कमावत आहेत. आता शेतीशी संबंधित व्यवसायासाठीही सरकार मदत करत आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला आलेच्‍या शेतीबद्दल सविस्तरपणे माहिती सांगणार आहोत.

हिवाळ्यात प्रचंड मागणी असते

आपल्या दैनंदिन जीवनात आल्याचा वापर वेदकाळापासून मसाले, औषधे आणि सौंदर्य (Medicines and beauty) घटक म्हणून केला जातो. चहापासून भाज्या आणि लोणच्यापर्यंत याचा वापर केला जातो. वर्षभर मागणी चांगली राहण्यासोबतच भावही चांगला मिळतो.

हिवाळ्यात त्याला मोठी मागणी असते. यासोबतच याला वर्षभर चांगली मागणी राहते. यामध्ये तुम्ही नोकरीपेक्षा जास्त नफा कमवू शकता. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याच्या लागवडीसाठी केंद्र सरकारकडूनही (central government) मदत मिळणार आहे.

लेसर लेव्हलिंग, सरी वरंबा पद्धतींमुळे बाजरी उत्पादनात भरभराटी; जाणून घ्या प्रक्रिया

लागवड अशी करा

आल्याची लागवड उष्ण व दमट ठिकाणी केली जाते. आल्याच्या गाठी तयार होण्यासाठी पेरणीच्या वेळी मध्यम पावसाची आवश्यकता असते. आल्याची लागवड पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. याची लागवड एकट्याने किंवा पपई आणि इतर मोठ्या झाडांच्या पिकांसोबत करता येते.

एक हेक्टरमध्ये पेरणीसाठी २ ते ३ क्विंटल बियाणे आवश्यक आहे. आल्याची लागवड बेड तयार करून करावी. याशिवाय मधोमध नाले करूनही पाणी सहज वाहून जाते. आल्याची लागवड पाणी साचलेल्या शेतात करू नये. आले लागवडीसाठी 6-7 pH असलेली माती चांगली मानली जाते. आल्याच्या आधीच्या पिकाचे कंद बिया म्हणून वापरले जातात.

आले पेरताना ओळीपासून ओळीतील अंतर 30-40 सेंमी आणि रोप ते रोप अंतर 25 ते 25 सें.मी. ठेवा. आले पीक तयार होण्यासाठी 8 ते 9 महिने लागू शकतात. एका हेक्टरमध्ये आल्याचे उत्पादन 150 ते 200 क्विंटलपर्यंत असते. एका हेक्टरमध्ये आले लागवडीसाठी सुमारे 7-8 लाख रुपये खर्च होऊ शकतात.

मान्सूनचा कहर! पुढील 3 ते 4 दिवस राज्यभर मुसळधार पावसाची शक्यता

फायदा

एका हेक्टरमध्ये आल्याचे उत्पादन 150-200 क्विंटल असू शकते. आले बाजारात 80 रुपये किलोने विकले जात आहे. एक हेक्टरमधून २५ लाखांपर्यंत सहज उत्पन्न मिळेल. बाकी खर्च सोडून 15 लाख रुपयांपर्यंत सहज नफा मिळू शकतो.

महत्वाच्या बातम्या 
गुंठा, एकर, हेक्टरमध्ये शेत जमिनीची मोजणी कशाप्रकारे करतात? जाणून घ्या
'या' वनस्पतीची लागवड करून मिळवा भरघोस उत्पन्न; केंद्र सरकारही करतंय मदत
शेतकरी मित्रांनो 'या' गाईचे करा पालन; दिवसाला देते 12 लिटरपेक्षा जास्त दूध

English Summary: Cultivate crop used spices medicine tea become millionaire Published on: 14 September 2022, 05:17 IST

Like this article?

Hey! I am रूपाली उत्तम कदम. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters