केळी हे पीक महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने खानदेश पट्ट्यात म्हणजे जळगाव जिल्ह्यात जास्त करून लावले जाते. केळी हे तसे नगदी पीक असून फळांपैकी सर्वात लोकप्रिय असे फळ आहे.
तसे पाहायला गेले तर केळी मध्ये आरोग्यदायी गुणधर्म देखील तितकेच महत्त्वपूर्ण आहेत. जसे की केळीमध्ये गुलकोज मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला पटकन ऊर्जा देण्याचे काम या ग्लुकोज मार्फत केले जाते. तसेच मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम सारखी घटक देखील मोठ्या प्रमाणात असतात. अशी ही बहुगुणी आणि उपयुक्त केळीचे फळ आहे. परंतु ज्या सद्यस्थितीचा विचार केला तरकेळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. सततचा येणारा अवकाळी पाऊस, हवामानातील बदल या पिकास हानिकारक ठरत असूनफळाचा दर्जा देखील घसरत आहे. त्यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. परंतु आपल्याला माहिती आहे का? जेवढे केळीचे फळ महत्त्वाचे आहे तेवढे तिचे देठ देखील महत्त्वाचे आहे.
नक्की वाचा:वेलवर्गीय भाजीपाल्यासाठी उन्हाळ्यात ठरतील या उपाय योजना फायदेशीर; मिळेल बक्कळ नफा
या देठाचे मूल्यवर्धन करून त्यापासून भरपूर फायदा मिळतो. या लेखामध्ये आपण केळीच्या देठावर प्रक्रिया कशी केली जाते याबद्दल माहिती जाणून घेऊ.
अशा प्रकारे होते केळीच्या देठावर प्रक्रिया
केळीचे पीक निघाल्यानंतर तिचे खोड काढण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात खर्च येतो. ती एक प्रकारची शेतकऱ्यांत समोरील मोठी समस्याच आहे. परंतु या खोडावर प्रक्रियाकरणे हा एक चांगला उपाय ठरू शकतो.यामध्येमूल्यवर्धन करताना केळीच्या खोडाचे दोन भाग केले जातात
नंतर देठाची सालं वेगळी केली जाते. जेव्हा यामधून फायबर काढला जातो त्याच वेळी घनकचरा देखील सोडला जातो. या खोडा मधून निघणारे तंतू धुतले जातात व नंतर वाळवले जातात. त्याच वेळी स्टेम मधून सोडलेला घन कचरा हा मशीनद्वारे दाबला जातो व त्यामुळे पाणी सोडले जाते आणि शेवटी मध्यवर्ती गाभा काढला जातो. यास ते मधून जेव्हा नैसर्गिक फायबर काढले जाते.
त्याचे निरनिराळ्या प्रकारचे फायदे आहेत. या निघणाऱ्या धाग्यापासून कापड, उच्च प्रतीचा कागद आणि थर्माकोल सारखे गोष्टी तयार केल्या जातात.
त्यामुळे शेतकऱ्यांची समस्या असणारे हेच खोड अर्थात स्टेम शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन ठरू शकते. एवढेच नाही तर या खोडामध्ये पाण्यापेक्षा लोह आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामधून शास्त्रज्ञांनी द्रवरूप खत बनवण्याचे तंत्र विकसित केले आहे.
( संदर्भ- शेत-शिवार )
Share your comments